दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली 'ही' गुप्त तयारी (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
रिपोर्टनुसार, चीन (China) भविष्यात तैवानविरोधी मोहिमेची तयारी करत आहे. अमेरिका मध्यपूर्व आशियात जेवढी व्यस्त राहिल , याचा फायदा चीनलाच मिळणार आहे. पेकिंग युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्युट ऑफ मिडिवल ईस्ट स्टडीज चे संचालक झू झाओयी यांच्या रिपोर्टनुसार, चीनसाठी इराण अमेरिका संघर्ष मोठा धडा आहे.चीनकडे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आहे, परंतु त्यांना प्रत्यत्र युद्धाचा अनुभव नाही. अमेरिकन सैन्य मैदानात उतरले असल्याने चीनला त्यांच्या युद्धनिती आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळत आहे. ज्याच्या भविष्यात तैवानविरोधी युद्धाता फायदा होऊ शकते.
चीन मध्यपूर्वेतील तणावाकडे केवळ एक संघर्ष म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहत आहे. अमेरिकेची लष्करी ताकद समजून घेण्यासाठी इराण युद्ध चीनच्या फायद्याचे ठरत आहे. चीन स्वतला तैवानविरोधात युद्धासाठी सज्ज करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय अमेरिका इराण युद्धात गुंतून राहिल्याने तैवानकडेही त्याचे दुर्लक्ष होत आहे. ज्याचा फायदा चीन उचलत आहे.






