लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हबीबुल्ला ठार, पाकिस्तानात अज्ञात लोकांच्या हल्ल्यात मारला गेला!

पाकिस्तानच्या खैबर पख्तनख्वा प्रांतातील टँक जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हबीबुल्लाला अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले. तो लष्कर-ए-तैयबामध्ये दहशतवाद्यांची भरती करत होता.

    पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे.  पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हबीबुल्ला (Lashkar-e-Taiba terrorist killed) याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील टँक जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हबीबुल्लावर अनेक गोळ्या झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यालात्यांना भोला खान किंवा खान बाबा म्हणूनही ओळखलं जात होतं आणि तो नवीन दहशतवाद्यांची भरती करण्याचं काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

    कोण होता हबीबुल्ला

    हबीबुल्ला हा कुख्यात दहशतवादी होता. तो लष्कर-ए-तैयबामध्ये नवीन दहशतवाद्यांची भरती करत असे. रविवारी सायंकाळी एकच गोंधळ उडाला. रविवारीच भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याला अज्ञात हल्लेखोरांनी विषप्रयोग केल्याची घटना समोर आली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी कराचीमध्ये दहशतवादी अदनान अहमद मारला गेला होता. तो लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या जवळचा होता.  अलीकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये 20 हून अधिक हाय-प्रोफाइल दहशतवादी मारले गेले आहेत.