Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marco Rubio India Visit : इराणशी युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकन मंत्री भारतात; काय आहे कारण?

Marco Rubio India Visit : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वॉड समितीचे लवकरच आयोजन करण्यात येणार असून या बैठकीसाठी ते उपस्थित राहतील. मात्र, इराणी मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर हा दौरा होत असल्याने खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 10:07 AM
Marco Rubio India Visit

Marco Rubio India Visit

Follow Us
Follow Us:
  • इराणशी युद्धादरम्यान अमेरिकन परराष्ट्र मंत्री भारतात
  • काय आहे नेमकं कारण?
  • जाणून घ्या
Marco Rubio India Visit : नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतातील अमेरिकन दूतावासाने मंगळवारी(९ मे) याची माहिती दिली. भारत लवकरच क्वाड राष्ट्रांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे. यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारत दौऱ्यावर येतील. २३ मे ते २६ मे या दरम्यान ते भारताला भेट देणार आहेत.

PM Modi Italy Visit : ‘स्वागत आहे, माझ्या मित्रा’ , PM मोदी इटलीत दाखल; जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केलेला सेल्फी क्षणात व्हायरल

चीनच्या हालचालींवर भारताची नजर?

इराणशी तणावादरम्यान रुबियो यांचा हा दौरा होत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी भारताला भेट दिले होती. या दौऱ्यानंतर रुबिया यांचा दौरा होत असल्याने अमेरिका इराण युद्धात भारत मध्यस्थी करत आहे का? असा प्रश्न उपस्थि केला जात आहे.

परंतु तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, क्वाडचे देश चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी एकत्र येत आहे. या परिषदेत ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका (America)आणि भारत या देशांचा समावेश आहे. अमेरिका-इराण वाद (US Iran Conflict) आणि युक्रेन युद्धावरुन या देशांमध्ये मतभेद असले तरी, चीनला रोखण्यासाठी हा दौरा होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे या दौऱ्याचा मुख्य उद्देश ?

हिंद-प्रशांत महासागरात चीन(China)च्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याचा या बैठकीचा उद्देश आहे. तसेच जुलै २०२५ नध्ये सुरु करण्यात आलेल्या  क्वॉड क्रिटिकल मिनर्लस एनिशिएटिव्ह या मोहिमेला गती देण्यावरही या परिषदेत चर्चा होऊ शकते.

सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणाऱ्या ग्रेफाइटसाठी अनेक देशांना चीनवर अवलंबून रहावे लागते. परंतु ही मक्तेदारी मोडून काढण्यावर आणि पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावर चर्चा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुबिया यांच्या दौऱ्यात भारताच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उच्चस्तीरय बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. भारत-अमेरिकेतील संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा केली जाणार आहे. तसेचे दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार सहाकार्यावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

काय आहे क्वॉड?

भारत, अमेरिका, जपान (Japan) आणि ऑस्ट्रेलिया या लोकशाही देशांचा एक धोरणात्मक गट म्हणजे क्वॉड समिती आहे. ही समिती जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी मांडली होती. मात्र, चीनने या समितीवर सतत टीका केली आहे. ही समिती चीनला घेरण्यासाठी बनवण्यात आली असल्याचा आरोप चीनने केला आहे.

PM Modi Norway Visit : नॉर्वेमध्ये पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावरुन PM मोदींनी काढला पळ? VIDEO व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो भारत दौऱ्यावर कधी येणार आहेत?

    Ans: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो २३ ते २६ मे दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत.

  • Que: रुबियो यांच्या भारत दौऱ्याचा काय उद्देश आहे?

    Ans: या दौऱ्याचा उद्देश नवी दिल्लीत होणाऱ्या क्वॉड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणे आहे. तसेच भारत आणि अमेरिकेतील उर्जा सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार यांसारख्या विषयांवर चर्चा करणे आहे.

  • Que: इराण तणाव आणि चीनचा प्रभाव या बैठकीसाठी महत्त्वाचा का मानला जात आहे?

    Ans: सध्या मध्यपूर्वेत अमेरिका इराण तणाव वाढला असून याचा थेट परिणाम जागतिक उर्जा पुरवठेवर होत आहे. होर्मुझची खाडी बंद असल्याने तेल पुरवठा विस्कळीत झाला असून इंधन दर गगनाला भिडले आहेत. तसेच चीनची वाढती मक्तेदारी रोखण्यासाठी देखील ही समिट महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: Marco rubio india visit us secretary visiting india amid escalating iran conflict why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ
3

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
4

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.