PM Modi Italy Visit : 'स्वागत आहे, माझ्या मित्रा' , PM मोदी इटलीत दाखल; जॉर्जिया मेलोनी यांनी शेअर केलेला सेल्फी क्षणांत व्हायरल (फोटो सौजन्य: एक्स/@GiorgiaMeloni)
जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी पंतप्रधान मोदी इटलीत दाखल होताच त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक सेल्फी शेअर केली आहे. ही सेल्फी शेअर करताना त्यांनी Welcome to Rome, my friend! (स्वागत आहे, माझ्या मित्रा) असे कॅप्शन दिले आहे. मेलोनी यांच्या निमंत्रणावरुनच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा इटलीचा पहिलाच अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे.
सध्या पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांची ही सेल्फी सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाली आहे. पण पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२३ मध्ये दुबई येथे आयोजित एका परिषदेदर्मायन मेलोनी यांनी माझे चांगले मित्र म्हणून केलेला फोटोही व्हायरल झाला होता. तसेच २०२४ मध्ये इटलीत अपुलिया येथे आयोजित जी-७ परिषदेदरम्या त्यांनी टीम मेलोनीकडून नमस्कारचा व्हिडिओ जगभरात चर्चेचा विषय ठकला होता.
दरम्यान पंतप्रधान मोदी इटलीत दाखल होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. इटलीतील हॉटेलवर पोहोचताच उपस्थित भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना वाराणसीच्या घाटांचे चित्रण करणारे एक विशेष पेंटिग भेट म्हणून देण्यात आले.
पंतप्रधान मोदींचा इटली दौरा हा धोरणात्मक आणि राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ते इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान मेलोनी यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा होणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयालाही पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत.
भारत आणि इटलीतील व्यापार, संरक्षण, हरित उर्जा, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रांमध्ये संबंध आधीचपासूनच दृढ आहेत. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण करारही झाले आहे. या भेटती या सर्व मुद्द्यांवर सविस्तर आढाव घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
Welcome to Rome, my friend! 🇮🇹🇮🇳 pic.twitter.com/mUjFL4HIqY — Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) May 19, 2026






