Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टॅरिफमुळे समस्या सुटत नाही’; मेक्सिकोच्या ‘या’ श्रीमंत व्यक्तीची डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या मुद्द्यावरुन जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहे. त्यांच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध होत असून ट्रम्प यांनी अनेक देशांशी व्यापार युद्ध सुरु केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2025 | 02:38 PM
Mexico’s richest businessman Carlos Slim on Trump's Policies

Mexico’s richest businessman Carlos Slim on Trump's Policies

Follow Us
Close
Follow Us:

मेक्सिको: सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या मुद्द्यावरुन जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहे. त्यांच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध होत असून ट्रम्प यांनी अनेक देशांशी व्यापार युद्ध सुरु केले आहे. दरम्यान मेक्सिकोच्या एका श्रीमंत आणि महत्त्वपूर्ण व्यक्तीनेही ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर टीका केली आहे. मेक्सिकोचे सर्वात श्रीमंत उद्योजक आणि जगातील नामांकित उद्योगपती कार्लोस स्लिम यांनी टॅरिफवर आणि अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले आहे.

कार्लोस स्लिम यांनी आपल्या वार्षिक परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळतील त्यांच्या टॅरिफ धोरणावर टीका केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘2025च्या अखेरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका होतील’; बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे BNP ला आश्वासन

ट्रम्प यांच्यासमोर मोठी आव्हाने

डोनालल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबद्दल कार्लोस यांना विचारले असता, त्यांनी “ट्रम्प यांना अजून खूप काम आहे. चार वर्षांची मुदत फार कमी आहे” असे म्हटले आहे. तसेच त्यांनी असेही म्हटले की, ट्रम्प यांच्यासमोर अनेक गुंतागुंतीच्या समस्या आहेत. अमेरिकेने आपले जागतिक नेतृत्त्ल पुन्हा मिळवावे, यासाठी त्यांना योग्य दिशा निवडण्याची गरज आहे.

कार्लोस यांनी 2016 मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेसोबत केलेल्या मुक्त व्यापार कराराविषयी चर्चा केली होती. मेक्सिको आणि अमेरिका यांच्यात व्यापर आणि औद्योगिक संबंध मजबूत रहावेत यासाठी त्यांनी ट्रम्प प्रशासनाशी संवाद साधला होता, असे त्यांनी सांगितले.

टॅरिफ धोरणावर टीका

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर टीका करताना स्लिम यांनी स्पष्टपणे सांगितले की, “टॅरिफ प्रभावी उपाय नाहीत. ते केवळ महागाई वाढवतात आणि व्याजदरांवर कोणताही परिणाम करत नाहीत. टॅरिफ समस्यांचे समाधान करू शकत नाहीत.” ट्रम्प प्रशासनाच्या स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादने यांच्यावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णयावर प्रतिक्रिया देताना कार्लोस, याचा मेक्सिकोवर फारसा परिणाम होणार नाही असे म्हटले. त्यांनी सांगितले की, काही मेक्सिकन स्टील उत्पादकांचे स्वतःचे अमेरिका बाजारात व्यवसाय आहेत, यामुळे टॅरिफचा मोठा फटका बसणार नाही.

अमेरिकेच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम? 

कार्लोस यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांची परिस्थिती चांगली नाही. अमेरिकेने स्वत:चे उत्पादन कमी केले आहे आणि अनेक उद्योग परदेशी कंपन्यांना आऊटसोर्स केले आहे. यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम होत आहे. त्यांच्या या वक्तव्याने स्पष्ट होते की, अमेरिकेच्या टैरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होत आहे आणि भविष्यात दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांमध्ये अधिक समतोल साधण्याची गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘झुकेगा नहीं साला…’, हार्ट ॲटकनंतरही कामाचा उत्साह कायम; पठ्ठ्याने डॉक्टरांनाही मारले फाट्यावर

Web Title: Mexicos richest businessman carlos slim on trumps policies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • New Mexico
  • World news

संबंधित बातम्या

US Mexico Conflict: ट्रम्पची युद्धघोषणा! मेक्सिकोच्या सीमांवर अमेरिकन ‘नाईट स्टॉकर्स’ तैनात; रात्रीच्या अंधारात होणार मोठी कारवाई
1

US Mexico Conflict: ट्रम्पची युद्धघोषणा! मेक्सिकोच्या सीमांवर अमेरिकन ‘नाईट स्टॉकर्स’ तैनात; रात्रीच्या अंधारात होणार मोठी कारवाई

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा
2

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
3

इम्रान खान नव्हे, ईमान मजारीन, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल
4

परदेशी उद्योजकांना मिळणार UAE चे नागरिकत्व? सरकारने कायद्यात केला ‘हा’ नवा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.