'2025च्या अखेरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका होतील'; बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे BNP ला आश्वासन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्त्तापालट झाले आणि मोहम्मद युनूसचे अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, सध्या देशातील परिस्थिती पाहता हे सरकार अपयशी ठरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारच्या विरोधात उफाळलेले विद्यार्थी आंदोलन, तसेच 1971 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशातून पाकिस्तानी लष्कराची माघार, अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंविरुद्ध सतत होणारा हिंसाचार असो, किंवा शेख मुजीबुर्रहमान उर्फ ‘बंगबंधू’ यांच्या ढाका येथील धनमंडी-32 घरावर हल्ला असो. सध्याचे सरकार कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.
याच दरम्यान BNP चे सरचिटनीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखांसी बैठक झाली. या बैठकीत मोहम्मद युनूस यांनी डिसेंबर पर्यंत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिल्याचे आलमगीर यांनी एक पत्रकार परिषदेत सांगितले. बांगलादेशचे मुख्ख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या पक्षाला बीएनपीला 2025 च्या अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी अंतरिम सरकारने तयारी देखील सुरु केली आहे.
वाढत्या महागाईबद्दलही चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान पक्षाचे स्थायी स्दस्य सलाहुद्दीन अहमद आणि मेजर ( निवृत्त) हाफिज उद्दीन अहमद,आलमगीरसह मुख्य सल्लागारांच्या बैठकीत उपस्थित होते. आलमगीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशातील वाढत्या महागाईचा मुद्दा देखील बैठकीत मांडला. त्यांनी म्हटले की, सरकारच्या अपयशामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तथापि, या लवकरात लवकर तोडगा काढण्यात आला पाहिजे असे त्यांनी म्हटले.
कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता
याशिवाय, बांगलादेशचे संस्थापक आणि शेख हसीना यांचे वडिल शेख मुजबीर रहमान यांच्या घरावर जमावाने केलेल्या घटनांबद्दही आलमगीर यांनी तीव्र टीका केली. त्यांनी युनूस सरकार या घटनांची जबाबदारी टाळू शकत नाही आणि यामुळे कायदाव सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. तथापि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतरिम सरकारमने प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले.
सरकारच्या धोरणांवर टीका
तसेच आलमगीर यांनी सुरक्षा ऑपरेशन, डेव्हिल हंटबद्दलही चिंता व्यक्त केली.आलमगीर यांनी सरकारला निष्पाप लोकांना यापासून दूर ठेवण्याची विनंती केली आहे. आलमगीर यांनी राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी बीएनपी कोणत्याही स्थानिक निवडणुका स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, नजरुल इस्लाम खान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपीने निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त एएमएस नासिर उद्दीन यांची भेट घेतली.