Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या ‘त्या’ नेत्याने केला विश्वासघात? 

Khamenei Secret Location Leaked : इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. याच वेळी एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणमधीलच एका अधिकाऱ्याने त्यांच्या गुप्त ठिकाणाची इस्रायलला माहिती दिली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 02:44 PM
Mossad intelligence operation

Mossad intelligence operation

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादला खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळाली अन्..
  • इराणमधील त्या नेत्याने दिली खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाची माहिती
  • संपूर्ण जगभरात खळबळ
Mossad intelligence operation : जेरुसलेम : मध्यपूर्वेत सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अंतही झाला आहे. यामुळे संपूर्ण इराणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र याच वेळी इस्रायलला खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा सुगावा कसा लागला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Khamenei Death : एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! खामेनेईंसह संपूर्ण कुटुंबाचा खात्मा? सॅटेलाईट फोटोंना उडवली खळबळ

अमेरिका-इस्रायलची संयुक्त कारवाई

शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुरुवातीला तेहरानमध्ये सर्वोच्च नेत्यांच्या मुख्यालयाला आणि अणु केंद्रांना लक्ष करण्यात आले. इस्रायलने इराणच्या तेहरानसह, कोम, इस्फाहान, शिराज, तब्रिझ आणि केरमानशाह यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये इस्रायलने एकामागून एक स्फोट केले. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला होता.

इराणचे प्रत्युत्तर

इस्रायली हल्ल्याला इराणने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने ७० हून अधिक बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा केला आहे. तसेच अनेक अमेरिकेच्या लष्करी तळांवरही हल्ला केला. यामुळे अमेरिका-इस्रायलने पुन्हा प्रतिहल्ला करत इराणवर एकामागून एक हल्ले केले.

कसा लागला सुगावा?

या भीषण हल्ल्यांमध्ये खामेनेई आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झाला आहे. इराणी सरकार आणि माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. परंतु इस्रायलला खामेनेईंच्या अत्यंत गुप्त ठिकाणांची माहिती नेमकी कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित होतो. अहवालांनुसार, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला इराणच्या सरकारमधूनच खामेनेई यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळाली होती.

खरे तर खामेनेई यांची सुरक्षेत अत्यंत कडक बंदोबस्त करण्यात आला होता. त्यांना इस्रायली हल्ल्यानंतर तातडीने गुप्त ठिकाणी हलवण्यात आले होते.  त्यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती काही वरिष्ठ सल्लागारांना देण्यात आली होती. परंतु याच सल्लागारांमधील एका अधिकाऱ्याने अचून माहिती इस्रायलच्या मोसादला दिली. माहिती मिळताच इस्रायलने तातडीने हल्ला केला. सध्या या गुप्त अहवालाने जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप अधिकाऱ्याचे नाव स्पष्ट झालेले नसून इराण सरकारडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Iran-Israel War 2026: तेहरानमध्ये स्मशान शांतता! खामेनींचा मृतदेह सापडला; इस्रायली हल्ल्यात ‘हे’ मुख्य 7 सर्वोच्च अधिकारीही संपले

💡

Frequently Asked Questions

  • Que: खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा सुगावा इस्रायलला कसा लागला?

    Ans: दावा केला जात आहे की, इराणच्या सरकारमधीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाची माहिती इस्रायली गुप्त संस्था मोसादला दिली होती.

  • Que: इस्रायलने खामेनेईंच्य गुप्त ठिकाणाची माहिती मिळताच काय केले?

    Ans: इस्रायलने इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळताच इराणवर भीषण हल्ल्यास सुरुवात केली.

  • Que: इस्रायलने इराणवर कधी आणि कुठे हल्ले केले?

    Ans: इस्यालने शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) सकाळी इराणची राजधानी तेहरानसह कोम, इस्फाहान, शिराज, तब्रिझ आणि केरमानशाह यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये एकामागून एक हल्ले केल.

Web Title: Middle east crisis mossad intelligence operation khamenei secret location

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.