Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धाच्या भडक्यात भारताला मोठा दिलासा! होर्मुझमधून दोन जहाजे सुखरुप बाहेर; गॅसची टंचाई संपणार?

Strait of Hormuz : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव आता शिगेला पोहोचला आहे. यामुळे जगभरात तेल आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे. मात्र यामध्ये भारताला काहीसा दिलासा मिळाल आहे. दोन गॅस जहाजे लवकरच भारतात येतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 02:15 PM
India flagged LPG tankers nanda devi and shivalik crosses strait of hormuz safely

India flagged LPG tankers nanda devi and shivalik crosses strait of hormuz safely

Follow Us
Follow Us:
  • गॅसची टंचाई संपणार?
  • होर्मुझमधून जहाजे सुखरुप बाहेर
  • भारताला मोठा दिलासा
LPG tanker crosses Strait of Hormuz for India : नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे सध्या जगभरात इंधन आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अनेक देशांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी सागरी मार्ग होर्मुझ स्ट्रेट इराण(Iran) ने बंद केल्यामुळे जागतिक उर्जा पुरठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र भारताला यामधून काहीसा दिलासा मिळाला आहे. भारताच्या कूटनीतिक प्रयत्नांमुळे भारतीय जहाजांना देशात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

US Iran War : पेट्रोल-डिझेलचे भाव भडकणार? अमेरिकी हल्ल्यानंतर इराण संतापला; तेल-गॅसचे साठे पेटवण्याचा इशारा

भारताचा कूटनीतीक विजय

मिळालेल्या माहितीनुसार, दोन मोठी गॅसवाहू जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून होर्मुझ स्ट्रेटमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. इराणने होर्मुझ खाणीत अमेरिका(America)-इस्रायल (Israel) आणि आखीत देशांची जहाजे अडवून धरली आहेत. पण याच वेळी भारताच्या जहाजांना सुरक्षित जाण्याची परवानगी दिली आहे. हा भारताचा मोठा कूटनीतीक विजय मानला जात आहे.

भारतीय गॅसवाहू जहाजे मायदेशी सुखरुप रवाना

मिळालेल्या माहितीनुसार, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) ची भारताच्या ध्वजाखालील दोन LPG टँकर जहाजे भारताकडे आज रवाना झाली आहे. भारताच्या इराणसोबतच्या उच्चस्तरीय चर्चेनंतर, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी(१३ मार्च २०२६) भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना रोखले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. यानंतर नंदा देवी आणि शिवालिक ही दोन महत्त्वाची LPG टँकर्सने सुरक्षितपणे होर्मुझ खाडी पार केली आहे.

भारताचे कुटनीतीक हालचाल

गेल्या काही दिवसांपासून भारताने इराणशी सतत संपर्कात राहून आपली जहाजे सुरक्षित केली आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी २८ फेब्रुवारी, ०५ मार्च, १० मार्च, आणि १२ मार्च असे चार वेळा संपर्क साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी गुरुवारी (१२ मार्च २०२६) फोनवरुन चर्चा केली होती.

भारताची गॅस टंचाई दूर होणार?

नंदा देवी आणि शिवालिक जहाजांवर सुमारे ४६,००० मेट्रिक टन लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) आहे. भारताच्या घरगुती आणि औद्योगिक ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ही खेप अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या जहाजांनी शुक्रवारी रात्री उशिरा होर्मुझ स्ट्रेट सुरक्षितपणे ओलांडला असून भारतीय नौसेनेच्या युद्धनौका या जहाजांना संरक्षण देत आहेत.

या जहाजांना मुंबई किंवा कांडला बंदरावर आणण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत ही जहाजे भारतीय किनाऱ्यावर पोहचण्याची शक्यता आहे. भारत LPGसाठी मोठ्या प्रमाणावर आखाती देशांवर अवलंबून आहे. युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस टंचाई निर्माण झाली होती. परंतु जहाजे सुरक्षित परतत असल्याने भारताची गॅस टंचाई दूर होणार आहे. सध्या इतर अनेक देशांची जहाजे होर्मुझ खाडीत अडकली आहेत. यामुळे जागतिक बाजारात इंधन आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे.

किम जोंगने पुन्हा डिवचलं! Israel-Iran युद्धादरम्यान ‘या’ देशाच्या सीमेजवळ डागले क्षेपणास्त्र, जगाचं टेन्शन वाढणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुज स्ट्रेट पार केलेले भारतीय LPG जहाज भारतात कधी पोहोचणार?

    Ans: सरकारी सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदा देवी आणि शिवालिक हे दोन गॅसवाहू जहाजे पुढील दोन दिवसांत मुंबई किंवा कांडला बंदरावर पोहोचतील.

  • Que: होर्मुझमध्ये अडकेल्या जहाजांना आणण्यासाठी भारताने काय केले?

    Ans: होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय जहाजांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेल्या काही दिवसांपासून इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या संपर्कात होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला होता. या राजनैतिक हालचालीमुळे भारताची जहाजे सुखरुप बाहेर पडली आहेत.

Web Title: Middle east israel us vs iran war india flagged lpg tankers nanda devi and shivalik crosses strait of hormuz safely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • LPG
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा
1

El Nino Threat : एल निनोमुळे पुढील सहा महिन्यांत 450,000 मृत्यू होण्याची शक्यता; भारतासह ‘या’ देशांना गंभीर इशारा

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
2

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी

Trump-Xi Jinping : कोण आहे ही महिला? जिच्या भूकंपशास्त्रज्ञ पतीला चिनी कैदेतून सोडवण्यासाठी ट्रम्प-जिनपिंग करणार वाटाघाटी
3

Trump-Xi Jinping : कोण आहे ही महिला? जिच्या भूकंपशास्त्रज्ञ पतीला चिनी कैदेतून सोडवण्यासाठी ट्रम्प-जिनपिंग करणार वाटाघाटी

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
4

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.