तुर्की आणि सीरियामध्ये (Turkey-Syria Earthquake) झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 7800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 30 हजारांहून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. सीरियामध्येही भुकंपामुळे मृत्यचं तांडव सुरू आहे. अशा विनाशकारी भूकंपाच्या परिस्थितीत एका महिलेने बाळाला जन्म दिला. (Baby Born In Earthquake) बचाव पथकाला ढिगाऱ्याखाली गाडलेल्या एक बाळ आढळलं ज्याची नाळ तिच्या आईशी जोडलेली होती. त्या बाळाची नाळ कापून त्याला बाहेर सुखरुप काढण्यात आलं आहे मात्र, दुर्देवाने तिच्या आईचा मृत्यू झाला आहे.
[read_also content=”जगभरात आघाडीच्या कंपन्यावर मंदीचा परिणाम, Dell नतंर आता ‘ही’ कंपनी 1300 कर्मचाऱ्यांना देणार नारळ! https://www.navarashtra.com/world/after-dell-zoom-will-lay-off-1300-employees-nrps-368154.html”]
तुर्कस्तानच्या सीमेला लागून असलेल्या सीरियातील जिंदरीस या छोट्याशा गावात झालेल्या भुंकपात ही घटना घडली आहे. इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेतून वाचलेले हे बाळ तिच्या कुटुंबातील एकमेव सदस्य आहे. रमजान स्लेमन या तिच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सीरियातील जिंदरेस शहरात भूकंपामुळे त्याच्या भावाचे घरही उद्ध्वस्त झाले. संपूर्ण इमारत ढिगाऱ्याखाली गेली. त्याचा भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांना शोधण्यासाठी तो ढिगाऱ्यातून खोदत होता. यादरम्यान, त्यांना एक सुंदर मुलगी दिसली, ज्याची नाळ तिच्या आईशी जोडलेली होती. लगेच त्यांनी नाळ कापली. मुलगी रडायला लागली. त्याला बाहेर काढले ढिगारा पूर्णपणे हटवला असता मुलाची आई मृत झाल्याचे दिसून आले. मुलगी अजूनही रुग्णालयात असून सुरक्षित आहे. ती खूप गरोदर होती आणि एक-दोन दिवसांनी ती प्रसूत होणार होती, परंतु भूकंपानंतर झालेल्या धक्क्यामुळे तिने ढिगाऱ्याच्या आत बाळाला जन्म दिला. सुमारे 30 तासांनंतर मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 7800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 30 हजारांहून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतातून मदत आणि बचाव पथक तुर्कस्तानला पोहोचले आहे. वैद्यकीय पथकही आहे. अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांचे बचावकार्य वेगाने सुरू आहे.