लष्कराकडून आपल्याच देशातील गावावर एअर स्ट्राइक; हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू
म्यानमारच्या लष्कराने आपल्याच देशातील पश्चिम भागात असलेल्या एका गावावर एअर स्ट्राइक केला असून यात ४० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी आहेत. या गावावर सशस्त्र वांशिक अल्पसंख्याक गटाचं नियंत्रण आहे, अशी माहिती गटाचे अधिकारी आणि स्थानिक धर्मादाय संस्थेने दिली.
लष्काराकडून करण्यात आलेल्या हल्ल्यातून लागलेल्या आगीत शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. पश्चिम राखीन राज्यातील अरकान आर्मीच्या नियंत्रणाखाली असलेल्या रामरी बेटावरील क्यौक नी माव गावावर बुधवारी हल्ला करण्यात आल्याची माहिती गटाचे अधिकारीने दिलीय. मात्र याबाबत लष्कराकडून या भागात कोणत्याही हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली नाहीये. दरम्यान गावातील परिस्थिती काय आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.
मात्र या भागातील इंटरनेट आणि सेलफोन सेवा बंद आहेत. लष्कराने फेब्रुवारी २०२१ मध्ये निवडून आलेल्या आँग सान स्यू की यांच्या सरकारची हकालपट्टी केल्यानंतर म्यानमारमध्ये हिंसाचार सुरू झालाय. शांततापूर्ण निदर्शने दडपण्यासाठी लष्कराने प्राणघातक शक्तीचा वापर केल्यानंतर लष्करी राजवटीच्या अनेक विरोधकांनी शस्त्रे हाती घेतली आहेत. देशाचा मोठा भाग हतबल झाला आहे. संघर्षात अडकले.
म्यानमारच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याची माहिती आरकन दलाचे प्रवक्ते खैईंग थुखा यांनी दिलीय. जेट फायटर विमानांनी बुधवारी गावावर बॉम्बचा वर्षाव केला. यात ४० नागरिकांचा जीव गेला आहे तर २० पेक्षा जास्त जण जखमी झालेत. मृत झालेल्या सर्व जण नागरिक होते. तर जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर एअर स्ट्राइकमुळे गावातील घरांना आग लागली. यात ५०० पेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत, अशी माहितीही खैईंग थुखा यांनी दिलीय.
भारताचा शेजारी देश मान्यमारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून काही भागांमध्ये यादवी माजली आहे. युनायटेड लीग ऑफ अराकान (यूएलए) आणि तिची लष्करी शाखा अराकान आर्मीसाठी तीन महिन्यांपूर्वी या भागावर नियंत्रण मिळवणं अशक्य वाटत होतं. ती आराकान आर्मी आता संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात अराकान आर्मीने म्यानमार संघराज्यातील राखीन राज्यातील (पूर्वीचे अराकान) १८ पैकी १५ शहरांवर आणि एका प्रमुख लष्करी मुख्यालायावर कब्जा केला आहे. त्यामुळे भारताच्या सीमेवर नवा देश निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र, तीन महत्त्वाची ठिकाणे अजूनही म्यानमारच्या लष्कराच्या ताब्यात आहेत. ही ठिकाणे बंगालच्या उपसागरात स्थित सितवे बंदर आहेत. कलाधन मल्टीमोडल प्रकल्पांतर्गत या बंदरासाठी भारताकडून वित्तपुरवठा करण्यात आला आहे. तर दुसरं ठिकाण चीनच्या मदतीने बांधलेले Kyaukphyu पोर्ट आणि Muanang शहर आहे.2024 च्या शेवटच्या दिवशी अराकान आर्मीने ग्वा शहर ताब्यात घेतलं. गेल्या आठवड्यात बंडखोर अराकान आर्मीने अन शहर ताब्यात घेतलं होते. सैन्याच्या पश्चिम प्रादेशिक कमांडचे हे मुख्यालय आहे, यावरून या शहराचे सामरिक महत्त्व लक्षात येतं. काही दिवसांपूर्वीच अराकान आर्मीने मांगडॉ शहर लष्कराच्या हातून हिसकावून घेतले होते आणि याशहारसह अरकान आर्मीने बांगलादेशच्या सीमेवर पूर्ण ताबा मिळवला आहे.