
nepal pm balen shah border statement rsp chief rabi lamichhane delhi visit 2026
Rabi Lamichhane Delhi Visit June 2026 : भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून त्याचे पडसाद आता दिल्लीतही उमटू लागले आहेत. नेपाळचे (nepal) नवनवीन पंतप्रधान बालेन शाह यांनी संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात भारत-नेपाळ सीमेबाबत एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक दावा केला आहे. या विधानामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये अचानक तणाव निर्माण झाला आहे. या मोठ्या वादाच्या पार्श्वभूमीवर, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नेपाळच्या सत्ताधारी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (RSP) अध्यक्ष रवी लामिछाने आज, १ जून २०२६ रोजी, भारताच्या ५ दिवसांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान बालेन शाह यांनी संसदेला संबोधित केले. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी थेट भारत-नेपाळ सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. शाह म्हणाले की, “भारतावर नेहमीच नेपाळी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला जातो, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार केवळ भारतानेच नाही, तर नेपाळनेही भारतीय भूभागावर अतिक्रमण केले आहे.” त्यांनी पुढे सुचवले की, दोन्ही देशांनी आता जुने वाद उकरण्यापेक्षा एकत्र बसून हा प्रश्न सामंजस्याने सोडवला पाहिजे. पंतप्रधानांच्या या अनपेक्षित विधानामुळे नेपाळच्या संसदेत आणि राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Namhkam Blast: म्यानमारच्या ‘नामखाम’मध्ये बंडखोरांनी साठवलेल्या जिलेग्नाइट स्फोटकांचा कारखाना हवेत उडाला; 100 हून अधिक घरांची राख
पंतप्रधान बालेन शाह यांच्या या वक्तव्यामुळे भारत जितका सतर्क झाला आहे, त्याहून अधिक तीव्र पडसाद नेपाळमध्ये उमटत आहेत. नेपाळी काँग्रेस आणि नेपाळी कम्युनिस्ट पार्टी (UML) यांसारख्या प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. विरोधी नेत्यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनी भारतावर आणि स्वतःच्याच देशावर असा गंभीर आरोप करण्यापूर्वी संसदेत ठोस पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांनी हे बेजबाबदार वक्तव्य तात्काळ मागे घ्यावे. विरोधी पक्षांनी हे विधान संसदेच्या अधिकृत रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणी लावून धरली आहे, ज्यामुळे बालेन शाह यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Nepal Prime Minister Balen Shah has come under fire after saying both Nepal and India had encroached on each other’s territory. His remarks in Parliament revived debate over the long-running Lipulekh, Limpiyadhura and Kalapani border dispute, prompting backlash from opposition… pic.twitter.com/hzeG2MPbin — IndiaToday (@IndiaToday) June 1, 2026
credit – social media and Twitter
नेपाळमध्ये बालेन शाह यांचे सरकार आल्यानंतर सत्ताधारी आघाडीतील कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते नितीन नवीन यांच्या निमंत्रणावरून रवी लामिछाने हे उच्चस्तरीय शिष्टमंडळासह भारतात आले आहेत. या शिष्टमंडळात त्यांच्या पत्नी निकिता पौडेल, पक्षाचे सरचिटणीस बिपिन आचार्य आणि खासदार दीपक बोहरा यांचा समावेश आहे. लामिछाने यांचा हा दौरा पूर्वनियोजित असला, तरी पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर या दौऱ्याला प्रचंड राजकीय आणि राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Masoud Pezeshkian: सत्तेच्या भिंती हादरल्या! इराणच्या राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचा राजीनामा; समोर आले धक्कादायक वास्तव
नवी दिल्लीतील आपल्या ५ दिवसांच्या वास्तव्यादरम्यान रवी लामिछाने भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्याशी अत्यंत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी आणि भारतासोबतचे व्यापारी व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी लामिछाने हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मिळवण्याचाही प्रयत्न करत आहेत. याशिवाय ते भाजप मुख्यालयाला भेट देऊन दोन्ही देशांमधील सत्ताधारी पक्षांमध्ये समन्वय वाढवण्यावर भर देतील. बालेन शाह यांच्या विधानामुळे बिघडलेले संबंध सुधारण्यात लामिछाने कितपत यशस्वी होतात, याकडे आता संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.