North Korea News Marathi : प्योंगयोंग : एक मोठी बातमी समोर येत आहे. जगापासून अलिप्त, दूर आणि अज्ञात असलेल्या उत्तर कोरियात पर्यटकांसाठी अद्भुत असा समुद्रकिनारा खुला करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठीही हा समुद्रकिनारा खुला होण्याची शक्यता आहे. २४ जून रोजी उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी वोनसन कलमा समुद्रकिनारा जनतेसाठी खुला केला आहे. हा समुद्रकिनारा देशाच्या उत्तरेकडील भागात आहे. रशियाचे पुतिन यांनी हा किम जोंग उन यांच्यासाठी बांधला असल्याचे म्हटले जात आहे.
या किनाऱ्याचे सौंदर्य अतिशय अकल्पनीय, दुर्मिळ आहे. सध्या याची जगभरात चर्चा सुरु आहे. याशिवाय आणखी एका मोठ्या शहराविषयी आणि प्रभावशाली व्यक्तीची या समुद्रकिनाऱ्याच्या उद्घाटनादरम्यान चर्चा सुरु आहे. म्हटले जात आहे की, या समुद्रकिनाऱ्यावर एका मोठ्या रिसॉर्टचे बांधकाम अनेक वर्षांपासून सुरु होते. पंरतु कोव्हीडमध्ये हे थांबवण्यात आले. यानंतर २०२४ मध्ये रशियाने या कामात उत्तर कोरियाला मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन युद्धातील उत्तर कोरियाच्या मदतीने पुतिन यांनी आभार म्हणून बांधकामात मदत केली.
उत्तर कोरियाचे हुकूमशाह यांनी युक्रेन युद्धादरम्यान रशियाला हजारो सैनिकांची तुकडी पाठवली होती. यामुळे या पर्यटन स्थळाच्या उद्घाटन समारंभात रशियाचे राजदूत आणि दूतावासातील विशेष सदस्य देखील उपस्थित होते. हा समुद्रकिनारा १ जुलैपासून पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. परदेशी पर्यटकांमध्ये केवळ रशियाच्या नागरिकांसाठी हा खुला करण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये रेल्वे सेवा देखील पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
यासोबतच किम जोंग उनच्या मुलीची देखील सध्या चर्चा सुरु. किम जोंग उन उत्तर कोरियाची सुत्रे आता त्यांची मुलगी किम जू एकडे सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे. किम जोंग उनची मुलगी वोनसन कलमा समुद्रकिनारी तिच्या वडिलांसोबत दिसून आली. तसेच यापूर्वी देखील एका कार्यक्रमात ती दिसून आली होती. तेव्हापासून किम जोंग उन आपली सत्ता आपल्या लेकीच्या हाती सोपवणार असल्याची चर्चा आहे.
वोनसोन-कालमा कोस्टल टुरिस्ट एरिया हे उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहे. हे एक भव्य आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. किम जोंग उन यांनी जागतिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र या ठिकाणी केवळ रशियन पर्यटकांना येण्याची परवानगी आहे. या ठिकाणी एक आधुनिक हॉटेल, बॉटरपार्क आणि २० हजार पाहुण्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्यात आली आहे. हा प्रेदश नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि आधुनिक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.






