Maharashtra Breaking News
18 Nov 2025 09:25 AM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये मालिका सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 21 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्हि संघ हे क्रिकेट विश्वामधील मजबूत संघ आहेत, यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 चा उपविजेता संघ आहे. आता हि मालिका कोण जिंकणार हे तर मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये समजणार आहे. त्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपेल, एक सामना अनिर्णित राहिला आहे, असे भाकीत केले आहे.
18 Nov 2025 09:18 AM (IST)
आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 मध्ये रविवारी पाकिस्तानने भारताला 8 गडी राखून पराभूत केले. ग्रुप-B मधून पाकिस्तानने सेमीफायनलसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र दुसऱ्या सेमीफायनल स्लॉटसाठी भारत, ओमान आणि यूएई यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.
ग्रुप-B ची पॉइंट्स टेबलनुसार, पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. भारत 2 सामन्यांत 1 विजयासह 2 गुणांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ओमान आणि यूएई अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. भारत आणि ओमान यांच्याकडे प्रत्येकी समान 2 गुण आहेत.
18 Nov 2025 09:15 AM (IST)
अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची शक्यता वाढल्यानं भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ऑटो क्षेत्राच्या दमदार कामगिरीच्या जोरावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील 30 शेअरांचा सेन्सेक्स 388 अंकांनी, म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 84,950.95 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील निफ्टी 50 मध्ये देखील 103 अंकांची वाढ झाली आणि 0.4 टक्क्यांच्या तेजीसह 26,013.45 अंकांवर बंद झाला.
18 Nov 2025 09:10 AM (IST)
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे भरभरुन मतांचे दान मिळाल्यानंतर, महायुती सरकारने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एका योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा मुहूर्त जवळ येत असल्यामुळे, राज्य सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी ‘कर्जव्याज परतावा’ योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत या तिन्ही समाजातील निवडक, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी दरवर्षी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
18 Nov 2025 09:07 AM (IST)
बॅटल रॉयल मोबाईल गेम फ्री फायर मॅक्सच्या प्लेअर्सची संख्या प्रचंड आहे. या गेममध्ये रँक वाढवण्यासाठी आणि जास्त काळ टिकून राहण्यासाठी प्लेअर्सना शत्रूंना मारावे लागते. मात्र प्रो प्लेअर्ससमोर टिकून राहणं अत्यंत कठिण आहे. यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मॅचमध्ये अगदी सहज विजय मिळवू शकता. काही सोप्या टिप्स तुम्हाला फ्री फायर मॅक्समध्ये विजय मिळवून देऊ शकतात.
18 Nov 2025 09:06 AM (IST)
काही चित्रपट आणि वेब सीरिज त्यांच्या दमदार कथानकामुळे सतत चर्चेत राहतात, आणि आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच रिलीज झालेल्या ‘महारानी सीझन 4’ ची भरभरून प्रशंसा केली आहे.
रविवारी केजरीवाल यांनी सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ‘महारानी सीझन 4’ “नक्की पाहावी” अशी शिफारस केली आणि संपूर्ण टीमच्या धैर्याचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “सोनी लिव्हवर ‘महारानी 4’ वेब सीरिज जरूर पहा. आजच्या राजकारणाची कुरुप सत्य या सीरिजमध्ये अगदी स्पष्टपणे दाखवली आहे. सत्य दाखवण्याची हिम्मत केल्याबद्दल संपूर्ण टीमला सलाम.”
राजकारणावर आधारित या वेब सीरिजमध्ये दाखवलेल्या सत्तासंघर्ष, भ्रष्टाचार आणि बॅकडोअर स्ट्रॅटेजींच्या कथानकाकडे केजरीवाल यांनी विशेष लक्ष वेधले. बिहार निवडणुकांनंतर केलेले हे ट्विट विशेष लक्षवेधी ठरले आहे.
18 Nov 2025 09:03 AM (IST)
उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आणि अमानुष अत्याचारांचे आरोप केले आहेत. विशेषत: तिच्या पतीने जुगार खेळताना पत्नीला ‘दाव’ म्हणून लावले आणि त्यात हरल्यानंतर ८ पुरुषांकडून तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने पोलिसांकडे केला आहे. आरोपींमध्ये तिच्या सासऱ्यांसह दोन दीर आणि इतर नातेवाईकांचाही समावेश असल्याचे तिने सांगितले
18 Nov 2025 08:57 AM (IST)
भारतात 18 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,541 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,496 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,406 रुपये आहे. भारतात 18 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,960 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,410 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,060 रुपये आहे. भारतात 18 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 166.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,66,900 रुपये आहे. भारतातील सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशातच सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने खरेदी कशी करावी, असा प्रश्न आता सर्वसामान्यांपुढे निर्माण झाला आहे.
Marathi Breaking news live updates- राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ गेल्या सोमवारी (दि.10) एक मोठा बॉम्बस्फोट झाला. यामध्ये जीवितहानीसह वित्तहानीही झाली. या बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान पोलिसांनी काही धक्कादायक पुरावे शोधून काढले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनहरी बाग पार्किंग लॉट आणि बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण 68 संशयास्पद मोबाईल नंबर सक्रिय होते. हे 68 मोबाईल नंबर आता तपासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या नंबरवर पाकिस्तान आणि तुर्कीमधून कॉल आले होते.






