फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये मालिका सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 21 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्हि संघ हे क्रिकेट विश्वामधील मजबूत संघ आहेत, यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 चा उपविजेता संघ आहे. आता हि मालिका कोण जिंकणार हे तर मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये समजणार आहे. त्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपेल, एक सामना अनिर्णित राहिला आहे, असे भाकीत केले आहे.
मायकेल वॉन म्हणतात की बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ पर्थमध्ये मालिकेतील पहिला सामना जिंकेल, कारण ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना या सामन्यातून वगळण्यात आले आहे. मायकेल वॉनने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “जर बेन स्टोक्स तंदुरुस्त राहिला तर मला वाटते की मालिका २-२ अशी बरोबरीत राहील. पॅट किंवा जोशच्या अनुपस्थितीत इंग्लंड पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकेल. जर मालिकेच्या पहिल्या कसोटीपूर्वी कोणताही खेळाडू जखमी झाला नाही, तर हा माझा शेवटचा अंदाज आहे.”
पॅट कमिन्स सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे, तर वेगवान गोलंदाज हेझलवूडला न्यू साउथ वेल्सकडून व्हिक्टोरियाविरुद्ध शेफील्ड शिल्ड सामन्यात खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. शनिवारी, इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाले की जोश हेझलवूड बाहेर असल्याने, पाहुण्या इंग्लंडचा संघ पहिल्या अॅशेस सामन्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. वॉन म्हणाले होते की, “ऑस्ट्रेलियन खेळाडू हेझलवूड आणि कमिन्स पहिल्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. मोठी मालिका जिंकण्यासाठी आवश्यक असलेली वेगवान गोलंदाजी इंग्लंडच्या बाजूने जात असल्याचे हे सुरुवातीचे लक्षण आहे. पर्थमध्ये त्यांच्यासाठी एक गुण पुढे जाण्याची मोठी संधी आहे.”
Technique, temperament, and pure Test-match toughness, the stage is set as Australia and England lock horns once again in cricket’s #OldestRivalry. Will the urn stay, or will it travel? 👀🔥 Drop your series scoreline predictions below! 👇#AUSvENG | 1st Test 👉 FRI, 21–25… pic.twitter.com/XXYHO5Bzby — Star Sports (@StarSportsIndia) November 18, 2025
ऑस्ट्रेलियन संघात मिचेल स्टार्क हा एकमेव पूर्णपणे तंदुरुस्त पहिल्या पसंतीचा वेगवान गोलंदाज आहे, ज्याचा बॅकअप म्हणून स्कॉट बोलँड आहे. हेझलवूड दुखापतग्रस्त असल्याने, ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज म्हणून अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन आणि ब्यू वेबस्टर या दोघांचाही वापर करण्याचा विचार करू शकते. कमिन्स, अॅबॉट आणि हेझलवूड जखमी झाल्यामुळे, दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी दोन वेळा पाच बळी घेणारा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज ब्रेंडन डॉगेट पर्थमध्ये कसोटी पदार्पण करू शकतो.






