सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन, आणि ओमर याघी (फोटो सौजन्य: एक्स/@NobelPrize)
Nobel Prize in Chemistry 2025 : नवी दिल्ली : नोबेल समितीने बुधवारी (०८ ऑक्टोबर) रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक (Nobel Prize) जाहीर केले आहे. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने २०२५ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन, आणि ओमर याघी यांना प्रदान केल आहे. या शास्त्राज्ञांनी धातू-सेंद्रियांच्याविकासावर केलेल्या कामगिरीवर त्याना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्यात आला आहे.
आतापर्यंत रसायन शास्त्रातील, वैद्यक शास्त्रातील आणि भौतिक शास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या विजेत्यांना १० डिसेंबर २०२५ मध्ये स्टॉकहोम मध्ये अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ आयोजित एका कार्यक्रमात स्वीडिनच्या राज्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2025 #NobelPrize in Chemistry to Susumu Kitagawa, Richard Robson and Omar M. Yaghi “for the development of metal–organic frameworks.” pic.twitter.com/IRrV57ObD6 — The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2025
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. पुढील पुरस्कार कधी जाहीर होणार
या पुरस्कारानंतर अजून तीन पुरस्कार राहिलेले आहेत. यामध्ये ०९ ऑक्टोबर रोजी साहित्य क्षेत्रातील, तर १३ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. तसेच शांतता नोबेल पुरस्कारही जाहीर करण्यात येणार आहे.
प्रश्न २. भारतात कोणाला मिळाला आहे रसायनशास्त्रातील पुरस्कार ?
भारतात रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचे सन्मानक हे व्यंकटरमन रामकृष्णन आहेत. त्यांनी २००९ मध्ये थॉमस ए. सीट्झ आणि एडा ई. योनाथ यांच्यासह राइबोसोमची रचना आणि कार्यप्रणालीवर केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
नोबेल पुरस्कार विजेत्याला काय बक्षिस मिळते?
दरवर्षी रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस रसायशास्त्रातील इत्कृष्ट संशोधनांसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करते. यामध्ये विजेत्यांना ११ दशलक्ष स्वीडीश क्राउन म्हणजे १२ दशलक्ष डॉलर्स मानधन म्हणून मिळते. एकापेक्षा अधिक जास्त शास्त्रज्ञांमध्ये ही रक्कम वाटून दिली जाते.