Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Weapons: भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक अण्वस्त्रे, अण्वस्त्रांच्या बाबतीत कोणता देश जास्त धोकादायक? वाचा संपूर्ण यादी

Nuclear Weapon India: जगात युद्धे सुरु असताना आता अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांची सिद्धता आणि अण्वस्त्रांवर वाढती भिस्त चर्चेत आली आहे. यामध्ये कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्र धोकादायक आहेत जाणून घेऊया...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2025 | 10:50 AM
भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक अण्वस्त्रे, अण्वस्त्रांच्या बाबतीत कोणता देश जास्त धोकादायक? वाचा संपूर्ण यादी (फोटो सौजन्य-X)

भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक अण्वस्त्रे, अण्वस्त्रांच्या बाबतीत कोणता देश जास्त धोकादायक? वाचा संपूर्ण यादी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Nuclear Weapon India In Marathi : युद्ध म्हटलं की देशांकडे अण्वस्त्राची चर्चा सुरुच होते. जगातील अनेक देशांकडे अण्वस्त्र आहेत. यामध्ये रशिया, अमेरिका, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल, चीन, फ्रान्स,उत्तर कोरिया आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. अशातच जगात अण्वस्त्रांची शर्यत तीव्र होत आहे. SIPRI म्हणजेच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान फक्त ९ देश अजूनही या शर्यतीत सहभागी आहेत आणि जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान सर्वांनी अण्वस्त्र आघाडीवर स्वतःला बळकट केले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, फक्त रशिया आणि अमेरिकेकडे जगातील सुमारे ९० टक्के अण्वस्त्रे आहेत.

पंतप्रधान मोदी कॅनडात दाखल; जॉर्जियो मेलोनींसह इतर राष्ट्राध्यक्षांशी होणार बैठक

कोणत्या देशांकडे अण्वस्त्रे

अमेरिका आणि रशिया वगळता यादीत ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल यांचा समावेश आहे. अहवालानुसार, जगात एकूण १२ हजार २४१ अण्वस्त्रे होती. त्यापैकी ९ हजार ६१४ लष्करी साठ्यात होती. विशेष म्हणजे क्षेपणास्त्रे आणि विमानांसह सुमारे ३ हजार ९१२ अण्वस्त्रे देखील तैनात आहेत.

कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे?

  1. अमेरिकेकडे एकूण ५१७७ अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी १४७७ निवृत्त वॉरहेड्स आहेत. ३७०० लष्करी साठ्यात आहेत. त्यापैकी १७७० तैनात आहेत आणि १९३० साठवलेले आहेत.
  2. रशियाकडे एकूण ५४५९ अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी ४३०९ लष्करी साठ्यात आहेत. येथे १७१८ वॉरहेड्स तैनात आहेत आणि २५९१ साठवलेले आहेत. रशियाने ११५० वॉरहेड्स निवृत्त केले आहेत.
  3. ब्रिटनने १२० वॉरहेड्स तैनात केले असून १०५ साठवलेले आहेत. त्यांचा लष्करी साठा २२५ शस्त्रांचा आहे. ब्रिटनकडे एकूण २२५ शस्त्रे आहेत.
  4. फ्रान्सकडे एकूण २९० अण्वस्त्रे आहेत. यापैकी त्यांनी २८० तैनात केले आहेत आणि १० साठवले आहेत.
  5. चीनकडे सुमारे ६०० अण्वस्त्रे आहेत. त्यांनी २४ अण्वस्त्रे तैनात केली आहेत आणि ५७६ साठवून ठेवली आहेत.
  6. भारत यादीत सहाव्या स्थानावर आहे. भारताकडे एकूण १८० अण्वस्त्रे आहेत आणि ती सर्व साठवून ठेवली आहेत.
  7. पाकिस्तानकडे १७०, उत्तर कोरियाकडे ५० आणि इस्रायलकडे ९० अण्वस्त्रे आहेत आणि ती सर्व या देशांमध्ये लष्करी साठ्यात आहेत.

कोणता देश जास्त धोकादायक

SIPRI चा अंदाज आहे की, चीनकडे किमान ६०० अण्वस्त्रे आहेत. अहवालानुसार, चीनने इतर कोणत्याही देशांपेक्षा आपला अण्वस्त्रांचा साठा अधिक वेगाने वाढवला आहे. निरीक्षकांच्या मते, चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांच्या साठ्याचा भारतावरही परिणाम होईल. कारण बीजिंगचा जवळचा मित्र पाकिस्तान देखील आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाला गती देत ​​आहे. SIPRI अहवालावर प्रतिक्रिया विचारली असता, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की चीनला या अहवालावर कोणतीही टिप्पणी करायची नाही.

Iran-Israel War : इराण-इस्त्रायल देशांच्या संघर्षादरम्यानच अमेरिकेचं मोठं पाऊल; इंधन देणारी टँकर विमानं…

Web Title: Nuclear weapon countries india russia britain china pakistan usa russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • india
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

आता ऑस्ट्रेलियातूनही अवैध प्रवासी होणार हद्दपार; ‘या’ देशासोबत केला २२१६ कोटींचा डिपोर्टेशन करार
1

आता ऑस्ट्रेलियातूनही अवैध प्रवासी होणार हद्दपार; ‘या’ देशासोबत केला २२१६ कोटींचा डिपोर्टेशन करार

दहशतवादापासून ते सीमेवरील शांततेपर्यंत… India-China मध्ये ‘हे’ महत्वाचे करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
2

दहशतवादापासून ते सीमेवरील शांततेपर्यंत… India-China मध्ये ‘हे’ महत्वाचे करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

ChatGPT मुळे केला जन्मदात्या आईचा खून? अमेरिकेमध्ये तरुण ठरला तंत्रज्ञानाचा बळी
3

ChatGPT मुळे केला जन्मदात्या आईचा खून? अमेरिकेमध्ये तरुण ठरला तंत्रज्ञानाचा बळी

Hockey Asia Cup मध्ये चीननंतर जपानचाही उडवला धुव्वा, भारताचा सलग दोन विजयांसह ‘सुपर-४’ मध्ये प्रवेश!
4

Hockey Asia Cup मध्ये चीननंतर जपानचाही उडवला धुव्वा, भारताचा सलग दोन विजयांसह ‘सुपर-४’ मध्ये प्रवेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.