पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा उघड! भारताच्या 'या' शत्रूंना देतोय आश्रय, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी
अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM)सारख्या पाकिस्तानी दहशतावादी संघटना कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले दहशतावीद नेटवर्क चालवत आहे. या अहवालात आणखी १५ प्रमुख दहशतावदी संघटनांची नावे सांगण्यात आली आहेत.
रिपोर्टनुसार, २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद तुरुंगात असल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. परंतु अहवालानुसार पाकिस्तानचा हा दावा खोटा ठरत आहे. शिवाय त्याचे जमात-उद-दावा सारखे नवीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संस्था सक्रिय असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
याच वेळी मसूद अजहरची जैश-ए-मोहम्मद ही संघटना देखील जम्मू-काश्मीरला पाकिस्तानमध्ये शामील करुन घेण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. या संघटनेमध्ये ५०० शसस्त्र दहशतवादी असून हे भारत आणि अफगाणिस्तान(Afghanistan) विरोधात कट रचत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय हिज्बुल मुजाहिद्दीनचेही दहशतवादी काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा डाव रचत आहेत.
अहवालानुसार, पाकिस्तानने या दहशतवाद्यांना मदरशांमध्ये आश्रय दिला आहे. मदरशांमधून हे दहशतवादी भारतविरोधी विचारधारा पसरवत आहेत, असे अहवालात सांगण्यात आले आहे. २०१४ मध्ये या पाकिस्तानने दहशवादी संघटनांना संपवण्यासाठी ‘नॅशनल ॲक्शन प्लॅन’ मोहिम राबवली होती. मात्र हा प्लॅन अपयशी ठरला असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान जगासमोर विरोधाभास तयार करत आहे. एकीकडे पाकिस्तान स्वत:ला दहशतवादाचा बळी म्हणावून घेत आहे, तर दुसरीकडे त्याच दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहे. या अहवालामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून भारताची पाकिस्तानविरोधी भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे.






