फोटो सौजन्य - JioHotstar Reality
बिग बाॅस 19 चा खेळ हा दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे, स्पर्धकांनी मागिल 3 आठवड्यापासून घरामध्ये धूमाकुळ घातला आहे. सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ सध्या चर्चेत आहे. अलिकडेच शोमधील स्पर्धकांमध्ये कॅप्टनसी टास्क पाहायला मिळाला. या टास्कमध्ये पुन्हा एकदा घरातील सदस्यांची ताकद बदलली आहे. बसीर अली खाननंतर बिग बॉसच्या घराला एक नवीन कॅप्टन मिळाला आहे. कुनिका आणि बसीरनंतर आता घरात अमल मलिकची सरकार दिसणार आहे.
सोशल मीडिया वापरकर्ते अमलच्या कॅप्टनसीवर खूप खूश आहेत. त्याच वेळी कॅप्टनसी टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये बरीच भांडणे पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरातील आता आणखी एक प्रोमो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये आता बसीर अली आणि आवेज खान हे दोघे एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. कॅप्टन्सी दावेदारीसाठी बिग बाॅसने घरातल्या सदस्यांसाठी टास्क दिला होता. यामध्ये बसीर अली आणि आवेज खान यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला आहे.
जिओहाॅटस्टार शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सुरुवातीला बसीर हा येतो आणि तुला पक्षपात करायची नाही आहे, त्यानंतर आवेज खान म्हणतो की मला माहिती आहे तु मला नको सांगू. त्यानंतर बसीर आवेजवर ओरडतो आणि म्हणतो की, तुला राहावे लागणार आहे. यावर आवेज संतापतो आणि म्हणतो कि माझ्यावर ओरडून दाखवू नको हे सगळे दुसऱ्यासमोर कर. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला आहे.
बिग बॉसच्या फॅन पेज बिग बॉस लाईफ फीडनुसार, घरात झालेल्या कॅप्टनसी टास्कमध्ये अमाल मलिक घराचा नवा नेता बनला आहे. घरात झालेल्या बीबी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कॅप्टनसी टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळाली. या टास्कमुळे, बिग बॉसने घरातील सदस्यांना ब्लू आणि रेड अशा दोन संघात विभागले.
Bigg boss ke ghar mein barse angaar, Awez aur Baseer ke beech hui badi takraar! 🫣
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @colorstv par.
Watch Now: https://t.co/53fP5xc5bp pic.twitter.com/Fg3X3ceoX2
— JioHotstar Reality (@HotstarReality) September 11, 2025
टीम रेडमध्ये मृदुल, प्रणित, अभिषेक, तान्या, अवेज, अमल, अशनूर आणि फरहाना यांचा समावेश होता. दुसरीकडे टीम ब्लूमध्ये नीलम, कुनिका, बसीर, शाहबाज, झीशान, गौरव, नगमा, नेहल आणि नतालिया यांचा समावेश होता. या टास्कचे घरामध्ये चार फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीत, एका टीम सदस्याला बोर्डवर बनावट स्पर्धकाचे नाव लिहायचे होते आणि दुसऱ्या टीम सदस्याला बोर्डवर लिहिलेली टिप्पणी पुसून टाकायची होती. ब्लू टीमने बोर्डवर तान्याचे नाव लिहिले होते परंतु रेड टीमने ही फेरी जिंकली.