Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक

PM Modi CCS Meeting: दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांनंतर, पंतप्रधान बुधवारी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या चौकशीवर चर्चा केली जाईल, ज्यामुळे 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ची शक्यता निर्माण झाली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 12, 2025 | 09:00 AM
pm modi ccs meeting after bhutan visit operation sindoor update

pm modi ccs meeting after bhutan visit operation sindoor update

Follow Us
Follow Us:
  1. दिल्लीतील कार बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सज्ज; पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावरून परतताच घेणार आपत्कालीन CCS बैठक.
  2. बैठकीत स्फोटाच्या तपासावर व भविष्यातील सुरक्षा रणनीतीवर उच्चस्तरीय चर्चा होणार.
  3. “ऑपरेशन सिंदूर भाग-२” पुन्हा सुरू होण्याची शक्यता; पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत.

PM Modi CCS Meeting : राष्ट्रीय राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आहे. सोमवारी( दि. 11 नोव्हेंबर 2025) झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर( Delhi Bomb Blast) देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  भूतानच्या दौऱ्यावर असून, ते परतल्यानंतर स्वतः या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीत स्फोटाच्या तपासाची सद्यस्थिती, सुरक्षा संस्थांचे अहवाल आणि भविष्यातील रणनीतीवर चर्चा अपेक्षित आहे.

या स्फोटाने देशाच्या राजधानीतील सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उभे केले आहेत. प्रारंभी हे स्थानिक अपघात असल्याचे वाटले, परंतु तपास पुढे सरकताच त्याचे धागेदोरे पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलकडे जात असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासात “जैश-ए-मोहम्मद”शी संबंधित असलेल्या ‘शाहीन ग्रुप’ चा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच सरकार पुन्हा “ऑपरेशन सिंदूर भाग-२” ( Operation Sindoor 2.0) सुरु करण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 “ऑपरेशन सिंदूर” पुन्हा रंगणार?

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या CCS बैठकीनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध “ऑपरेशन सिंदूर” चालवले होते. या अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर राजनैतिक आणि माहितीविषयक दबाव निर्माण करण्यात आला होता. सरकारने त्या वेळी स्पष्ट सांगितले होते की “हे ऑपरेशन संपलेले नाही” आणि भारतावर होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कारवाईला युद्ध समजले जाईल. त्यामुळे दिल्लीतील ताज्या स्फोटांनंतर पुन्हा एकदा त्याच ऑपरेशनचा पुढील टप्पा सुरु होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळात चर्चिली जात आहे.

हे देखील वाचा : World Pneumonia Day : एक श्वास… अनेक धोके! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू

 पाकिस्तानमध्ये चिंता, भारत ठाम भूमिकेत

भारताच्या संभाव्य प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळात चिंता वाढली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच विधान केले की, “देश सध्या युद्धात आहे.” त्यांचे हे विधान जरी इस्लामाबाद न्यायालय संकुलातील आत्मघाती स्फोटाच्या संदर्भात केलेले असले, तरी भारताशी वाढत्या तणावाची पार्श्वभूमी स्पष्ट जाणवते.
याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर या हल्ल्यांसाठी थेट आरोप ठेवले. मात्र भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना म्हटले की,

“भारताचा कोणत्याही दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पाकिस्तानमधील लष्कर-प्रेरित अराजकतेपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताविरुद्ध खोटे कथानक रचले जात आहे.”

 देशभरात उच्चस्तरीय सुरक्षा

दिल्ली, मुंबई, हैदराबाद, जयपूर आणि जम्मू-कश्मीरसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा संस्थांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपास यंत्रणांकडून स्फोटात वापरलेल्या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि विस्फोटकाच्या नमुन्यांचा सखोल अभ्यास सुरु आहे.

हे देखील वाचा : भारतीय डॉक्टर अन् नर्सला जगातिक स्तरावरुन मागणी! तरी देशातील आरोग्य सेवेचे मोडले कंबरडे

 राष्ट्र सुरक्षेचा निर्णायक क्षण

या पार्श्वभूमीवर मोदी सरकारसमोर मोठे आव्हान उभे आहे. एकीकडे शांततापूर्ण संवादाचा मार्ग खुला ठेवायचा आहे, तर दुसरीकडे देशाच्या सार्वभौम सुरक्षेशी तडजोडही करता येणार नाही. त्यामुळे “ऑपरेशन सिंदूर २.०” हा केवळ लष्करी प्रतिसाद न राहता, भारताच्या राजनैतिक सामर्थ्याचा नवा अध्याय ठरू शकतो. भविष्यातील दिशा ठरवणारी ही CCS बैठक म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक क्षण ठरू शकते. आता संपूर्ण देशाचे डोळे पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर खिळले आहेत.

Web Title: Pm modi ccs meeting after bhutan visit operation sindoor update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • Bhutan
  • Delhi blast
  • Operation Sindoor
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
4

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.