Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर पुन्हा चर्चेत आला हाफिज सईद; लाहोरचं काय आहे कनेक्शन? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Delhi Bomb Blast News in Marathi : नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ घडलेल्या घटनेने (Delhi Blast) संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या स्फोटात १३ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेनंतर देशाच्या मुख्य शहरांमध्ये सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच भारताच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून घटनेची चौकशी केली जात आहे. सध्या या घटनेचा संबंध लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख कमांडरशी हाफिज सईशी जोडला जात आहे.
Delhi Bomb Blast प्रकरणातील मोठी बातमी! NIA आता तपास करणार; डॉ. शाहीन शाहीदलाही अटक
घडले असे की या घटनेपूर्वी लष्कराच्या कमांडर सैफुल्लाह याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये सैफुल्लाहने, हाफिज सईद आता गप्प सईद गप्प बसणार नाही. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली होती. शिवाय गुप्तचर सुत्रांनी हाफिज बांगलादेशमधून भारतावर हल्ल्याच्या तयारी करत असल्याचा दावाही केला होता. यामुळे हाफिज सईदवर संशय अधिक वाढला होता. परंतु अद्यार तपास यंत्रणांना याबाबत कोणताही थेट हाफिज सईदच्या थेट सहभगाचा पुरावा आढळलेला नाही.
लष्कर-ए-तैयबा ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे. या संघटनेची स्थापना १९८७ मध्ये झाली होती. या दहशतवादी संघटनेने भारतावर अनेक भीषण हल्ले केले आहेत. २००८ मध्ये मुंबईवरील हल्ला सर्वात भयानक दहशतवादी हल्ला होता. यामध्ये १६६ नागरिकांचा बळी गेला, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. लष्करत-ए-तैयबाने, जैश-ए-मोहम्मद आणि द रेसिडेंट फ्रंट या दहशतवादी संघटनांशी मिळून हल्ल्याचा कट रचल्याचे आरोप आहे. शिवाय नुकत्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आणि बांगलादेशातून सईद भारतावर हल्ल्याची तयार करत असलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दक्षिण आशिया टेररिझम पोर्टने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लष्कर-ए-तैयबाचे ५००० दहशतवादी सक्रिय आहे. या दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. मे २०२५ भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मोहीम राबवली होती. यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या अनेक दहशतवादी तळांना उद्ध्वस्क करण्यात आले होते. यामध्ये मुरीदकेमधील संघटनेची मुख्यालये आणि मस्जिद नष्ट करण्यात आल्या होत्या. भारताच्या पहलगाम झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हे ऑपरेशन राबवण्यात आले होते.
ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) हाफिज सईद गायब झाला होता. भारतीय तपास यंत्रणा हाफिजचा शोध घेतले होत्या. यामुळे कारवाईच्या भीतीने हाफिज अंडरग्राऊंड झाला असल्याचा दावा केला जात होता. पण हाफिजचा मुलगा तल्हा सईद याने आपले वडील सुरक्षित असल्याचा दावा केला. त्याने एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की, लाहोरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना तल्हाने याबाबत माहिती दिली. माझे वडील भारताच्या रडारवर आहेत, भारत सरकार दररोज त्यांच्याविरोधात काही ना काही मोहीम राबवते.
मात्र त्यांना कोणी काही करू शकत नाहीत. यानंतर हाफिज जूनमध्ये एका व्हिडिओमध्ये आजारी अवस्थेत दिसून आला होता. यानंतर हाफिज पुन्हा गायब झाला. पण याच वेळी पाकिस्तानने तो अफगाणिस्तानमध्ये पळाल्याचा दावा केला होता.सध्या हाफिज लाहोरमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. कारण २ नोव्हेंबर रोजी लाहोरच्या एका कार्यक्रमात तो सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु कार्यक्रम अचानक रद्द झाले होते.या सर्व घटनांमुळे हाफिद सईद पुन्हा सक्रिय झाला असून दहशतवादाचे जाळे पुन्हा उभारत असल्याचे म्हटले जात आहे.






