PM मोदींची नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा; भारताच्या DPI मॉलेडवर सविस्तर चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पंतप्रधान मोदींनी एक्सवर याबाबत पोस्ट करत या भेटीची माहिती दिली. त्यांनी राणी मॅक्सिमा यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या मदतीने भारताने आर्थिक सेवांमध्ये मोठा बदल घडवला आहे. याचा लाभ इतर देशातील लोकांनाही मिळावा अशी इच्छा भारताने व्यक्त केली.
Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर
नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीस यांच्या वित्तीय आरोग्यविषयक विशेष प्रतिनिधी म्हणून भारत दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा दौरा वित्तीय समावेशनला प्रोत्साहन देण्यासाठीच्या दोन्ही देशांच्या समान बांधिलकीचे प्रतीक आहे.
डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधण्यात भारताने केलेल्या कामाचा अभ्यास करण्यासाठी त्या या दौऱ्यावर आल्या आहेत. राणी मॅक्सिमा यांनी भारतातील विविध स्तरावरील नागरिकांशी संवाद साधून आर्थिक सेवांचा वापर करताना येणाऱ्या अडचणी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अनुभवांची माहिती घेतली.
याशिवाय त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागाताली डिजिटल व्यवहार, बँकिंग सेवा आणि सरकारी योजनांचा लाभ लोकांनी कसा घेतला यावरही नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
याशिवाय राणी मॅक्सिमा यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री योजनेच्या लाभार्थ्यांचीही भेट घेतली. या योजनेमुळे लाखो भारतीयांना पहिल्यांदाच बँकिग सेवा उपलब्ध झाल्या आहेत. लोकांचे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. या डिजिटल व्यवहार सेवांमुळे भारतीय नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. सध्या भारताच्या या डिजिटल विकासाची जागतिक स्तरावर वाढ होत असून याची दखल घेतली जात आहे.
Delighted to meet Her Majesty Queen Máxima of the Netherlands, who is also the UN Secretary General’s Special Advocate for Financial Health and a long-standing global voice for financial inclusion. We discussed how India’s Digital Public Infrastructure led revolution is making… pic.twitter.com/xlbqHwHqBf — Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026
Hormuz Attack : होर्मुझमध्ये पुन्हा खळबळ! मालवाहू जहाजाला ड्रोनने लक्ष्य; अमेरिकेचा इराणवर संशय






