
pok protests shaukat mir peoples action committee banned pakistan police killed
Shaukat Ali Kashmiri leader Shaukat Mir : पाकिस्तानच्या राजकारणात सध्या इम्रान खान यांच्या अटकेची आणि त्यांच्या पक्षावरील बंदीची चर्चा सुरू असतानाच, आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (PoK) एका नव्या नेत्याने थेट इस्लामाबाद सरकारला आव्हान दिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील अत्यंत लोकप्रिय आणि डॅशिंग नेते शौकत मीर आणि त्यांच्या ‘पीपल्स ॲक्शन कमिटी’वर (PAC) पाकिस्तान सरकारने अचानक बंदी घातली आहे. या एका निर्णयामुळे रविवारी (७ जून) संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसेचा वणवा पेटला. संतप्त आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या जोरदार चकमकीत तब्बल ४ पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले, तर प्रशासनाच्या लाठीमार आणि गोळीबारात ५० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला असून, परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून आता शहबाज शरीफ सरकारने आंदोलकांसमोर झुकण्याची तयारी दर्शवली आहे.
शौकत मीर हे पाकव्याप्त काश्मीरमधील एक सुशिक्षित आणि तळागाळातील नेते म्हणून ओळखले जातात. काश्मीर विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी थेट सामाजिक कार्यात उडी घेतली. सुरुवातीला त्यांनी कामगार संघटनांच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. विशेषतः पाकव्याप्त काश्मीरमधील राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या ‘व्हीआयपी संस्कृती’ (VIP Culture) विरोधात त्यांनी उघडलेले युद्ध तिथल्या तरुणांना प्रचंड भावले. शौकत मीर आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांचा वाढता आलेख आणि लोकप्रियता पाहून घाबरलेल्या पाकिस्तानी सरकारने निवडणुकीच्या तोंडावरच त्यांच्यावर दहशतवादाचा खोटा ठपका ठेवत त्यांच्या संघटनेवर बंदी लादली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SUPARCO : भारताच्या प्रत्येक इंच जमिनीवर शत्रूची नजर; चीनच्या मदतीने पाकिस्तानने 16 महिन्यांत सोडले 6 Spy Satellites
शौकत मीर यांनी २०२४ मध्ये ‘पीओके पब्लिक ॲक्शन कमिटी’ची स्थापना केली होती. त्या काळात पाकिस्तानातील आर्थिक संकटामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पिठाचे आणि विजेचे दर गगनाला भिडले होते. तिथल्या जनतेला खायला अन्न मिळेनासे झाले होते. या अन्यायाविरुद्ध शौकत मीर यांनी सामान्य जनतेला सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे केले. सरकारने सुरुवातीला हे आंदोलन दडपण्यासाठी अमानुष बळाचा वापर केला, पण शौकत मीर यांच्या चिकाटीपुढे प्रशासनाला नमावेच लागले. या यशामुळे लाखो नागरिक या समितीचे सदस्य बनले. पुढे सप्टेंबर २०२५ मध्ये जेव्हा पुन्हा महागाई वाढली, तेव्हा शौकत यांच्या एका आवाहनावर हजारो नागरिक मुझफ्फराबादच्या ऐतिहासिक लाल चौकात जमा झाले. त्यावेळीही लष्कर तैनात करूनही सरकारला आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या.
🇵🇰🗻|<“In the name of the Kalma, they looted us and killed us.” In this protest, Pakistani forces have martyred nearly half of the participants who were present. O tyrants! A court will surely be held in the court of Allah.> This is a raw, painful cry from the people of Azad… pic.twitter.com/wqIU8i2lva — Aprajita Nafs Nefes 🦋 Ancient Believer (@aprajitanefes) June 8, 2026
credit – social media and Twitter
बीबीसी उर्दूच्या हवाल्यानुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. इम्रान खान यांचा पक्ष आधीच बाद झाला असताना, शौकत मीर यांची समिती निवडणूक जिंकून सत्ता काबीज करेल अशी भीती इस्लामाबादमधील सत्ताधाऱ्यांना होती. म्हणूनच, सरकारने कपट कारस्थान रचून या लोकशाही मार्गाने लढणाऱ्या समितीला थेट ‘दहशतवादी संघटना’ घोषित केले. या बंदीमुळे समितीला आता निवडणूक लढवता येणार नाही आणि सरकारला त्यांच्या सदस्यांवर ‘अँटी-टेररिझम ऍक्ट’ अंतर्गत कठोर कारवाई करता येणार आहे. हाच अन्याय सहन न झाल्याने रविवारी जनतेचा संयम सुटला आणि आंदोलनाचे रूपांतर भीषण दंगलीत झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये 8.2 तीव्रतेचा प्रलयकारी भूकंप; कोसळल्या इमारती, त्सुनामीच्या 10 फुटी लाटांचा हाय-अलर्ट
पाकव्याप्त काश्मीर सरकारचे प्रवक्ते जावेद मीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीने ९ जून रोजी संपूर्ण क्षेत्रात कडकडीत बंदची हाक दिली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार या बंद दरम्यान संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार आणि सरकारी मालमत्तेची तोडफोड होण्याची दाट शक्यता आहे. हा धोका ओळखून आणि ४ पोलिसांचा बळी गेल्याचा धक्का बसल्यामुळे, आता पाकिस्तान सरकारने आपली ताठर भूमिका सोडली आहे. प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, ते शौकत मीर यांच्या कमिटीसोबत तातडीने संवाद साधून हा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आधी बंदी घालणे आणि नंतर चर्चेचे नाटक करणे, या पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणामुळे काश्मिरी जनतेमधील संताप अजुनही कायम आहे.