बांगलादेशनंतर आता सीरियात सत्तापालट; राष्ट्रपतींनीच केलं पलायन
दमास्कस : गेल्या काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये राजकीय परिस्थिती बिघडली होती. तेथील पंतप्रधानांनी देश सोडून पलायन केले होते. असे असताना आता सीरियात सत्तापालट झाले आहे. मध्य पूर्वेतील सीरियावर बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. राष्ट्रपती बशर अल-असद यांची राजवट संपुष्टात येताच ते देश सोडून पळून गेले आहेत.
हेदेखील वाचा : रशिया-इराणशी मैत्री, सौदीपासून दुरावा; सत्ताबदलानंतर सीरियातील समीकरणे बदलणार का?
सीरियात बंडखोरांनी पब्लिक रेडियो आणि टीव्ही बिल्डिंगवर नियंत्रण मिळवले आहे. बंडखोर संपूर्ण शहरात जल्लोष करत असून हवेत गोळीबार करताना दिसत आहेत. काही बंडखोरांनी असद यांच्या वडिलांच्या पुतळ्यावर चढून तोडफोड केली. आम्ही बऱ्याच काळापासून या दिवसाची वाट पाहत होतो. सीरियात एका नव्या युगाची सुरुवात होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इस्लामी हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) या बंडखोर गटाला तुर्कस्तानचा पाठिंबा आहे. दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा अलेप्पो ताब्यात घेतले होते. यानंतर एक-एक करून शहरे जिंकून दमास्कसला पोहोचले. 50 वर्षांच्या अत्याचारानंतर बाथची राजवट संपुष्टात आली आहे, असे बंडखोर गटाने टेलिग्रामवर म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांत अनेकांना सोडावे लागले आपले घर
गेल्या काही वर्षांत अनेकांना आपले घर सोडावे लागले आहे. बंडखोरांनी दमास्कस ताब्यात घेतल्याची घोषणा केली आहे. रस्त्यांवर लोक जल्लोष करताना दिसत असून असद पळून गेल्याने आता दमास्कस मुक्त झाल्याचे बंडखोरांनी सांगितले. कारागृहातील सर्व कैद्यांची सुटका करण्यात यावी, असे बंडखोरांनी दूरचित्रवाणीवरील निवेदनात म्हटले आहे.
बंडखोर हवेत गोळीबार करून जल्लोष
२०१८ नंतर पहिल्यांदाच बंडखोर दमास्कसच्या आत दाखल झाले. अनेक वर्षांच्या वेढ्यानंतर २०१८ मध्ये सीरियन सैन्याने पुन्हा राजधानीच्या बाहेरील भागावर ताबा मिळवला. दमास्कस विमानतळ रिकामे करण्यात आले असून सर्व उड्डाणे थांबविण्यात आली आहेत. बंडखोरांनी राजधानीच्या उत्तरेकडील सैदनाया लष्करी कारागृहात घुसून कैद्यांची सुटका केल्याचेही जाहीर केले.
नव्या सरकारसाठी बंडखोरांना प्रस्ताव
सीरियाचे पंतप्रधान मोहंमद अल जलाली यांनी सरकार निवडण्यासाठी सीरियन जनतेला सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स रामी अब्देल रहमान यांनी सांगितले की, ते दमास्कसा विमानतळमार्गे सीरिया सोडून गेले आहेत. एएफपीने मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
जगभरातून अनेक देशांमधून विधानं
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सीरियात लष्करी कारवाई टाळावी. ही आमची लढाई नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी कॅलिफोर्नियातील सभेत सांगितले की, सीरियातील यादवी युद्धात अमेरिका लष्करी हस्तक्षेप करणार नाही.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारत सोडा, अमेरिकाही नाही टिकणार, 4 दिवसांत कोलकाता काबीज करू’ ; बांगलादेशच्या रिटायर्ड मेजरचे वक्तव्य