दिल्लीतील कार्यक्रमात ट्रम्प यांचा थेट व्हिडिओ कॉल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Rubio-Modi Meet : मार्को रुबियो यांच्याकडून PM मोदींनी व्हाईट हाऊस भेटीचे आमंत्रण; नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
सध्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. दरम्यान रविवारी (२४ मे) त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तसेच त्यांनी परराष्ट्र मंत्री ए.स जयशंकर यांचीही भेट घेतली. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर देखील उपस्थित होते.
ट्रम्प यांचा थेट व्हिडिओ कॉल
या कार्यक्रमात अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी ट्रम्प यांचा व्हिडिओ कॉल उपस्थितांना ऐकवला. ट्रम्प यांनी दिल्लीत उपस्थित असलेल्या सर्वांना संबोधित केले. तसेच भारत आणि अमेरिक्या मजबूत संबंधावर शिक्का मोर्तब केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक उत्तम नेते आहे आणि माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. आय लव प्राइम मिनिस्टर मोदी! – अशा शब्दात कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध आतापर्यंत कधीच एवढे चांगले नव्हते. पण आता चित्र बदलले आहे. कोणत्याही परिस्थिती भारत अमेरिकेवर १००% विश्वास ठेवू शकतो असे त्यांनी म्हटले. भारताला कधीही, कोणतीही मदत लागली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
ट्रम्प यांनी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यावर विश्वास व्यक्त केला. रुबियो हे अमेरिकेचे उत्तम प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास दाखवला. तसेच पंतप्रधान मोदींना माझा आदरपूर्वक नमस्कार सांगा आणि त्यांचा किती मोठा फॅन आहे, हे नक्की कळवा असाही संदेश त्यांनी दिला.
#WATCH | Delhi | US President Donald Trump says, “…India can count on me 100%. If they ever need help, they know where to call. They call right here. We’re doing well. We’re setting records. We have a record economy, a record stock market and anything India wants to get. I am a… pic.twitter.com/EhbgguUiTm — ANI (@ANI) May 24, 2026






