Republic Day २०२६: प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर अमेरिकन 'अपाचे'चा थरार; ट्रम्प म्हणाले, 'आमचे भारताशी ऐतिहासिक बंध' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आज देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी आणि सांस्कृतिक सामर्थ्याचे दर्शन घडत असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एक विशेष शुभेच्छा संदेश पाठवला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारावरून सध्या ठिणगी पडलेली असताना, ट्रम्प यांनी आपल्या संदेशात भारताचे ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही’ म्हणून केलेले कौतुक जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे.
नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने समाजमाध्यमांवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा संदेश प्रसिद्ध केला आहे. ट्रम्प म्हणाले, “अमेरिकन जनतेच्या वतीने, मी भारत सरकार आणि तिथल्या जनतेला ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. अमेरिका ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे आणि भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे; आपल्या दोन्ही देशांमध्ये एक ऐतिहासिक बंध (Historic Bond) आहे.” ट्रम्प यांनी आपला हा संदेश केवळ सरकारी नसून तो सर्व अमेरिकन जनतेच्या वतीने असल्याचे स्पष्ट केले.
हे देखील वाचा : Republic Day 2026: कर्तव्यपथावर भारताचा ‘रुद्रावतार’! 21 तोफांची सलामी, 29 फायटर जेट अन् जग पाहणार महासत्तेच्या शक्तीचे भव्य दर्शन
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका कठीण टप्प्यातून जात आहेत. ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर ५०% आयात शुल्क लादल्याने आणि भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने वॉशिंग्टनमध्ये नाराजी होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अमेरिकन डाळींवर कर वाढवले होते. अशा स्थितीत ट्रम्प यांनी ‘ऐतिहासिक बंध’ असा शब्दप्रयोग वापरल्याने, दोन्ही देश आगामी काळात व्यापाराबाबत तडजोड करण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.
“On behalf of the people of the United States, I extend my heartfelt congratulations to the government and people of India as you celebrate your 77th Republic Day. The United States and India share a historic bond as the world’s oldest and largest democracies.” – President… pic.twitter.com/oC9x3Qs9y3 — U.S. Embassy India (@USAndIndia) January 26, 2026
credit – social media and Twitter
केवळ शुभेच्छा संदेशापर्यंतच हे मर्यादित नव्हते. आजच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये अमेरिकन बनावटीच्या विमानांनी लक्ष वेधून घेतले. भारतीय हवाई दलाची C-130J सुपर हर्क्युलिस विमाने आणि अपाचे (Apache) अटॅक हेलिकॉप्टर्स जेव्हा कर्तव्यपथावरून आकाशात झेपावली, तेव्हा अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी त्याचे वर्णन ‘मजबूत भागीदारीचे प्रतीक’ असे केले. “भारतीय आकाशात अमेरिकन बनावटीची विमाने झेपावताना पाहणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असे गोर यांनी नमूद केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindoor: पाकिस्तानची ‘ती’ काळी रात्र! राफेलपुढे इस्लामाबादची शरणागती, कमांड सेंटर्स केले उद्ध्वस्त; जागतिक अहवाल सादर
केवळ ट्रम्पच नव्हे, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही भारताला शुभेच्छा पाठवल्या आहेत. युरोपियन युनियनचे नेते यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, ट्रम्प यांनी ज्या आत्मीयतेने पंतप्रधान मोदींचे मित्र आणि भारताच्या लोकशाही मूल्यांचा उल्लेख केला, त्याकडे ‘ट्रम्प २.०’ प्रशासनाचे भारताप्रती असलेले धोरण म्हणून पाहिले जात आहे.






