Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबई-ठाण्यात १७ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार
मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागात मान्सूनचा ट्रफ (Monsoon Trough) सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या १७ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची ही स्थिती कायम राहणार असून, घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
12 Aug 2026 05:58 PM (IST)
मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि एकात्मिक करण्याच्या दिशेने ‘मुंबई वन’ ॲपने मोठा डिजिटल टप्पा गाठला आहे. एमएमआरडीएने विकसित केलेल्या या सामायिक मोबिलिटी ॲपवर आतापर्यंत १,०४,११,८२४ तिकिटांचे बुकिंग झाले आहे. या ॲपच्या माध्यमातून मेट्रो, उपनगरीय रेल्वे, मोनोरेल आणि विविध महापालिका बस सेवांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले आहे.
12 Aug 2026 05:45 PM (IST)
महाराष्ट्रातील तसेच देशभरातील युवकांना क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’ या तीन दिवसीय भव्य युवा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.देशभरातील युवकांना एकत्र आणणारा हा दुवा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
12 Aug 2026 05:30 PM (IST)
भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. धनंजय डी सिल्वाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला जवळपास तीन वर्षांनंतर श्रीलंकेच्या कसोटी संघात परतला आहे. ३३ वर्षीय डिकवेला शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना २०२३ मध्ये खेळला होता. पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळवली जाईल. दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवली जाईल.
12 Aug 2026 05:13 PM (IST)
जिल्ह्यात २२१ शासकीय आणि १३९ खाजगी कंपन्या व कार्यालये, अशा एकूण ३६० कार्यालयांची तपासणी करण्यात आली. यापैकी, पॉश कायद्याच्या आवश्यक तरतुदींची पूर्तता न केल्यामुळे ९ शासकीय आणि ८ खाजगी अशा एकूण १७ कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी असलेल्या पॉश कायदा, २०१३ मधील सुधारणा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी राज्यव्यापी चौकशी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत, जून महिन्यापासून राज्यातील शासकीय आणि खाजगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांची तपासणी अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जात आहे.
12 Aug 2026 04:57 PM (IST)
जागतिक राजकारणात आणि जागतिक महासत्तेच्या पटावर सध्या एक अभूतपूर्व आणि अत्यंत नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. एके काळी संपूर्ण जगाच्या सागरी मार्गांवर आणि व्यापारावर आपले वर्चस्व गाजवणारी महासत्ता आज पर्शियन आखातात (Persian Gulf) पूर्णपणे अडकलेली आणि असहाय्य दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड लष्करी ताकद दाखवूनही आणि इराणला मोठ्या विनाशाच्या धमक्या देऊनही होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) उघडण्यात यश आलेले नाही. वाचा सविस्तर...
12 Aug 2026 04:47 PM (IST)
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी २०१८ मधील पक्षघटनेशी संबंधित कागदपत्रांचा संदर्भ देत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. आयोगाकडे आवश्यक कागदपत्रे आणि पक्षाच्या रचनेबाबतची माहिती उपलब्ध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. वाचा सविस्तर...
12 Aug 2026 04:37 PM (IST)
भिवंडीतील Amazonच्या वेअरहाऊसमधील मुदतबाह्य आणि खराब झालेला माल आता महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) सोपवावा लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने Amazon Retail Indiaला याबाबत निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, वेअरहाऊसमध्ये असलेल्या मुदतबाह्य आणि खराब मालाची यादी तयार करून तो संबंधित FDA अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा लागणार आहे. त्यानंतर हा माल कायद्यानुसार वैज्ञानिक पद्धतीने नष्ट केला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी येणारा खर्च Amazonलाच करावा लागणार आहे.
12 Aug 2026 04:27 PM (IST)
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे २०२७ चे आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक आयोजित केले जाणार आहे. यावेळी या विश्वचषकाच्या स्वरूपात केलेल्या बदलांवरून वाद निर्माण झाला आहे. क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशनने (KNCB) या बदलांवर तीव्र टीका केली आहे. हे बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेटची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात आणतील, असे म्हटले आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांनी केवळ नवीन स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर इतके मोठे बदल कोणत्या प्रक्रियेअंतर्गत आणि कसे लागू करण्यात आले, असाही प्रश्न विचारला आहे.
12 Aug 2026 04:17 PM (IST)
NEET-UG Paper Leak: नीट यूजी (NEET-UG) पेपर लीक प्रकरणाच्या तपासात आता एक नवीन आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सीबीआयच्या चार्जशीटनुसार, लातूरमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूट संचालकाच्या मुलाने तपास संस्थेला सांगितले की, परीक्षेपूर्वी त्याला एका रुग्णालयात ‘स्पेशल क्लास’साठी बोलावले होते, जिथे कथितरीत्या नीटशी संबंधित महत्त्वाचे केमिस्ट्रीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगण्यात आली होती. या जबाबाने तपासाला आता एक नवीन वळण दिले आहे. वाचा सविस्तर...
12 Aug 2026 04:07 PM (IST)
पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात आणि जागतिक पातळीवर एक अत्यंत खळबळजनक बातमी चर्चेत आली आहे. पाकिस्तानचे (माजी पंतप्रधान आणि ‘तहरीक-ए-इन्साफ’ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांचा रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात मृत्यू झाल्याचा दावा वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार वजाहत एस. खान यांनी केला आहे. पाकिस्तानी लष्कर आणि अंतर्गत सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दाव्यानंतर केवळ पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
12 Aug 2026 04:00 PM (IST)
Nashik News: नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्यावर भाष्य करणारा एक उपरोधिक राजकीय लेख सध्या चर्चेत आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास या पार्श्वभूमीवर लेखात थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, या लेखातील ट्रम्प यांच्यावरील आरोप हे उपरोधिक आणि काल्पनिक मांडणीचा भाग आहेत. नाशिकच्या रस्त्यांच्या प्रश्नासाठी ट्रम्प यांना थेट जबाबदार धरण्याची कल्पना लेखातून विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे.
12 Aug 2026 03:55 PM (IST)
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे २०२७ चे आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक आयोजित केले जाणार आहे. यावेळी या विश्वचषकाच्या स्वरूपात केलेल्या बदलांवरून वाद निर्माण झाला आहे. क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशनने (KNCB) या बदलांवर तीव्र टीका केली आहे. हे बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेटची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात आणतील, असे म्हटले आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांनी केवळ नवीन स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर इतके मोठे बदल कोणत्या प्रक्रियेअंतर्गत आणि कसे लागू करण्यात आले, असाही प्रश्न विचारला आहे.
12 Aug 2026 03:50 PM (IST)
चंद्रपूर: राज्य शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेलाच पुरवठ्याच्या नियोजनाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही मध्यान्ह भोजनासाठी अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी नव्या शैक्षणिक वर्षाचा करारनामा पूर्ण झाला नसल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमधील तांदूळ, कडधान्य आणि इतर साहित्याचा साठा संपुष्टात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना नियमित भोजन देण्यासाठी शिक्षकांना उधारीचा आधार घ्यावा लागत असून, काही शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांकडून तात्पुरती व्यवस्था केली जात आहे.
12 Aug 2026 03:45 PM (IST)
UPSC CDS 2 Exam 2026: युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (UPSC) ‘कंबाइंड डिफेंस सर्विसेज २ परीक्षा २०२६’ (CDS 2 Exam 2026) ची तारीख आणि परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकृत सूचनेनुसार, सीडीएस २ परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी रविवारी घेतली जाईल. ही परीक्षा एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होईल, ज्यामध्ये उमेदवारांची इंग्रजी, जनरल नॉलेज आणि एलिमेंट्री मॅथेमॅटिक्स (प्राथमिक गणित) या विषयांची परीक्षा घेतली जाईल. उमेदवार या परीक्षेची माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात.
12 Aug 2026 03:40 PM (IST)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईदरम्यान संतप्त जमावाने केलेल्या धक्काबुक्कीमुळे महापालिकेच्या एका गर्भवती महिला अधिकाऱ्याला बाळ गमवावे लागल्याची माहिती मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारकडे पोलिसांची भूमिका आणि संबंधितांवरील कारवाईबाबत स्पष्टीकरण मागितले. नवी मुंबईतील चार हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणी अॅड. किशोर शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी ३० जुलै रोजीच्या कारवाईची माहिती दिली.
12 Aug 2026 03:35 PM (IST)
NEET-UG Paper Leak: नीट यूजी (NEET-UG) पेपर लीक प्रकरणाच्या तपासात आता एक नवीन आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सीबीआयच्या चार्जशीटनुसार, लातूरमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूट संचालकाच्या मुलाने तपास संस्थेला सांगितले की, परीक्षेपूर्वी त्याला एका रुग्णालयात ‘स्पेशल क्लास’साठी बोलावले होते, जिथे कथितरीत्या नीटशी संबंधित महत्त्वाचे केमिस्ट्रीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगण्यात आली होती. या जबाबाने तपासाला आता एक नवीन वळण दिले आहे.
12 Aug 2026 03:30 PM (IST)
राज्यात मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कुणबी-मराठा बांधवांच्या जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांकडूनही जरांगे यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी कुणबी नोंदींबाबत महत्त्वाची आकडेवारी मांडत जरांगे पाटील यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
12 Aug 2026 03:25 PM (IST)
भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या नावाची सध्या जागतिक कायदेशीर वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine war) यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान निर्माण झालेल्या एका अत्यंत हाय-प्रोफाईल कायदेशीर वादात रशियाने न्यायमूर्ती चंद्रचूड यांची आपले लवाद (Arbitrator) म्हणून निवड केली आहे. युक्रेनची प्रमुख सरकारी बँक असलेल्या ‘ओशादबँक’ (Oschadbank) आणि रशियन सरकार यांच्यातील अब्जावधी डॉलरच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कराराच्या वादावर तोडगा काढण्यासाठी ही विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
12 Aug 2026 03:20 PM (IST)
मिनिमलने त्यांचा लेटेस्ट फोन Minimal Phone 2 लाँच केला आहे. कंपनीने हा फोन QWERTY की-बोर्डसह लाँच केला आहे. यासोबतच लो-डिस्ट्रक्शनसाठी मिनिमलने या फोनचा डिस्प्ले अपडेट करत ग्रे-स्केल ई-इंक (ई-पेपर) स्क्रीन रिप्लेस करून ओएलईडी डिस्प्ले पॅनल वापरला आहे. कंपनीने हा फोन प्रिमियम रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि त्याचे फीचर्स जाणून घेऊया.
वाचा सविस्तर : टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर
12 Aug 2026 03:15 PM (IST)
द्रपूर : मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेला विद्यार्थी गोसेखुर्द कालव्यात वाहून गेला. ही घटना सावली शहरानजीक मंगळवारी उघडकीस आली. नैतिक विठ्ठल शेडमाके (वय १५, रा. सावली) असे वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. नैतिकचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. घटनास्थळापासून 10 किमी अंतरावर मुलाचा मृतदेह सापडला. सोमवारी दुपारी नैतिक हा दोन मित्रांसह गोसेखुर्द कालव्यावर अंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने नैतिकचा पाण्यावरील तोल सुटला आणि तो प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला. मित्राने डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहिल्याने दोन्ही मित्र घाबरले आणि तेथून निघून गेले. घाबरलेल्या मित्रांनी या घटनेची माहिती तत्काळ कोणालाही दिली नाही.
12 Aug 2026 03:10 PM (IST)
आर्थिक डबघाईला आलेला आणि आंतरराष्ट्रीय कर्जाच्या जीवावर चालणारा शेजारील देश पाकिस्तान पुन्हा एकदा जागतिक पातळीवर मोठ्या अडचणीत सापडला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (US Department of State) नुकताच आपला अधिकृत ‘फिस्कल ट्रान्सपरन्सी रिपोर्ट २०२६’ (Fiscal Transparency Report 2026) जाहीर केला आहे. या अहवालात पाकिस्तानच्या आर्थिक धोरणांमधील आणि अर्थसंकल्पीय कारभारातील अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेने पाकिस्तानचे शक्तिशाली लष्कर (Pakistani Military) आणि त्यांची कुप्रसिद्ध गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) यांच्या गुप्त अर्थसंकल्पांवर आणि अफाट खर्चांवर कडक नागरी तसेच संसदीय देखरेख ठेवण्याची थेट शिफारस केली आहे.
12 Aug 2026 03:05 PM (IST)
उरण : चार दशके झाली आश्वासनांवर आश्वासने मिळाली, पण हक्काची जमीन काही मिळाली नाही, पुनर्वसनाच्या नावाखाली ४० वर्षे गावकऱ्यांना झुलवत ठेवणाऱ्या प्रशासनाविरोधात आता नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा एकत्र आले आहे. आता आश्वासन नको, कागदावरचा हक्क नको, प्रत्यक्ष जमीन हवी या मागणीसाठी येत्या १५ ऑगस्टपासून जेएनपीए प्रशासन भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार दोन्ही गावांनी केला आहे. जेएनपीए बंदराच्या उभारणीसाठी आपल्या जमिनी गमावून विस्थापित झालेल्या या गावकऱ्यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. रविवारी नवीन शेवा येथील शांतेश्वरी देवी मंदिरात झालेल्या संयुक्त ग्रामसभेत दोन्ही गावांचा संताप अक्षरशः उफाळून आला. मंदिराचा सभागृह नागरिकांनी खचाखच भरला होता. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ ‘अरे कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
12 Aug 2026 02:59 PM (IST)
अक्कलकोटमध्ये झेडपी शाळेचा स्लॅब कोसळला. शाळेच्या पोर्चमधील स्लॅबचा थर कोसळला. स्लॅब कोसळल्यानं 13 विद्यार्थी, 2 शिक्षक जखमी झाले आहेत. शाळेची इमारत जुनी झाल्यानं स्लॅब कोसळला असल्याचं सांगितलं जात आहे. अक्कलकोटच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
12 Aug 2026 02:50 PM (IST)
विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलीये.. विद्यार्थी आंदोलनावर चर्चेची सरकारची तयारी आहे मात्र विरोधक चर्चेसाठी तयार नाहीत.. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन गृहमंत्री अमित शाहांनी केलंय.. अधिवेशन सुरु झाल्यापासून दररोज संसदेत येतोय.. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे असही अमित शाह यावेळी म्हणालेत.. दरम्यान गेल्या 20 दिवसांपासून अमित शाह कुठे होते.. असा सवाल राहुल गांधींनी विचारला असून विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आणि गोळीबाराचे आदेश कोणी दिले याची उत्तरं आम्हाला हवीत असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय..
12 Aug 2026 02:41 PM (IST)
"संजय राऊत हे फेकूचंद आहेत. त्यांनी आजपर्यंत किती गौप्यस्फोट केले आहेत. मी त्यांना नेहमी उत्तर देतो, त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग आहे. त्यांचा राग मी समजू शकतो. त्यांना तिकीट जाहीर करत नव्हते, तेव्हा रश्मी वहिनींबाबत राऊत किती शिव्या घालत होते, हे सगळ्या शिवसेनेला माहीत आहे भावाला मंत्री केले नाही, माझे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पारदर्शकपणे घ्या, असे म्हणत कोण पवईच्या हॉटेलमागे बैठक घेऊन कुभांड रचत होते, हे मी पाहिले आहे. मी जिल्हाप्रमुख होतो आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिलो.", अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर केली.
12 Aug 2026 02:30 PM (IST)
मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या तीन वर्षांत तब्बल 839 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, एवढा मोठा निधी खर्च होऊनही शहरातील खड्ड्यांची समस्या कायम आहे. महापालिकेकडे 3,500 हून अधिक खड्डयांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मुंबईकर खड्डेमुक्त रस्त्यांची प्रतीक्षा करत आहेत.
12 Aug 2026 02:21 PM (IST)
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि अपघातांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, खड्डयांमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे १३ ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असून, ते शहरातील खड्डयांची पाहणी करणार आहेत. तसेच १७ ऑगस्ट रोजी संजय राऊत यांच्या आदेशाने नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शालिमार येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होऊन महापालिकेवर धडक देण्यात येणार असल्याचे केशव पोरजे यांनी सांगितले.
12 Aug 2026 02:10 PM (IST)
गडचिरोली येथे अनुदानित आश्रमशाळेत अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना घडली. तीन मुलींचा मृत्यू झाला असून, तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी नागपूर मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलीची भेट घेणार असून, त्यानंतर गडचिरोली येथे शाळेला भेट देणार आहे. १९९२ पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू असताना आतापर्यंत मुलींसाठी झोपण्याच्या बेडची व्यवस्था नसणे, ही चिंतेची बाब आहे. याबाबत चिंता आणि चिंतन करण्याची गरज आहे. गडचिरोलीचे खासदार आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारलेल्या आश्रमशाळेच्या संचालकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता, असं अशोक उईके यांनी म्हटलं आहे.
12 Aug 2026 02:00 PM (IST)
भारतासोबत क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या बांगलादेशच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) टीम इंडियासोबत क्रिकेट मालिका आयोजित करण्याच्या प्रयत्नात होते. बीसीबीच्या योजनेनुसार, त्यांना सप्टेंबरमध्ये टीम इंडियासोबत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची होती. दोन्ही बोर्डांमध्ये चर्चा सुरू झाली होती, परंतु पूर्वनियोजित वेळापत्रकामुळे ही मालिका आता होण्याची शक्यता कमी आहे.
12 Aug 2026 01:55 PM (IST)
चेन्नई विमानतळावर मंगळवारी (11 ऑगस्ट 2026) रात्री इंडिगोच्या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगमुळे काही काळ खळबळ उडाली. कोलकाताहून चेन्नईकडे येणाऱ्या इंडिगोच्या 6E-723 विमानाच्या लँडिंगपूर्वी डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. विमानात 224 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर पायलटने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. त्यानंतर विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी चेन्नई विमानतळ प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्था सक्रिय केली.
12 Aug 2026 01:50 PM (IST)
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू नयेत, यासाठी पवईतील हॉटेलमध्ये संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना बैठक घ्यायला लावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंना विरोध करा, माझे नाव पुढे करा, असा आग्रह राऊत यांनी आमदारांपुढे धरला होता. राऊत यांनी याच बैठकीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज केला. एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारींचे एकतर पत्र दाखवा नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान खासदार म्हस्के यांनी राऊत यांना दिले.
12 Aug 2026 01:45 PM (IST)
प्रत्येक पालकांसाठी आपल्या मुलांनी मिळवलेलं यश हा अभिमानाचा क्षण असतो. लोकप्रिय मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची मुलगी सई गोडबोले हिनेही आपल्या करिअरमध्ये महत्त्वाचं यश मिळवलं आहे. ‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेमुळे किशोरी गोडबोले घराघरांत लोकप्रिय झाल्या. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता त्यांची लेक सई हिनेही मनोरंजन आणि जाहिरातविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
12 Aug 2026 01:40 PM (IST)
लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने 2006 मध्ये युट्यूब पार्टनर प्रोग्राम लाँच केला होता. आता 2026 मध्ये या प्रोग्रामला 20 वर्षे पूर्ण झाली आहे. या 20 वर्षांच्या कालावधीत युट्यूबने त्यांच्या पार्टनर प्रोग्रामच्या पॉलिसी अपडेट केल्या आहेत आणि प्लॅटफॉर्मवर क्रिएटरसोबत रेवेन्यू शेअर करण्याची पद्धत देखील बदलली आहे.
12 Aug 2026 01:35 PM (IST)
पती-पत्नीच्या परस्पर संमतीने बारामती न्यायालयाने १८ दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर केला. प्रथमेश आणि स्नेहा (दोघांचीही नावे बदललेली) यांचा १९ मे २०२० रोजी विवाह झाला होता. काही काळ एकत्र नांदल्यानंतर दोघांचेही विचार एकदम भिन्न असल्याचे एकमेकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण विचारांती एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता दोघेही १३ जून २०२२ पासून विभक्त राहत होते.
12 Aug 2026 01:30 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार आणि वेगळ्या आशयाच्या कथांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दिशेने पॅनोरमा स्टुडिओजने मोठं पाऊल उचललं आहे. पॅनोरमा स्टुडिओजने कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्ससोबत धोरणात्मक भागीदारी केली असून, या भागीदारीअंतर्गत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या दोन महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करण्यात येणार आहे. ‘तुझ्या आयला’ आणि ‘रक्तफळ’ अशी या दोन चित्रपटांची नावं आहेत.
12 Aug 2026 01:25 PM (IST)
१५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाच्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा केला जाईल. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवतील. मात्र, यंदाचा सोहळा ऐतिहासिक असणार आहे, कारण स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी राष्ट्रीयगीत ‘वंदे मातरम्’ गायले जाईल. स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पारंपरिक प्रोटोकॉलमधील या मोठ्या बदलाची घोषणा १० ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र/संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केली.
12 Aug 2026 01:20 PM (IST)
आशिया खंडातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ‘डॉल्फिन’ (Typhoon Dolphin) चक्रीवादळाने चीनमध्ये प्रवेश करताच प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या आणि तब्बल ६,००० किलोमीटरचा दीर्घ सागरी प्रवास पूर्ण करून आलेल्या या वादळाने चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर आता देशाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्व आणि मध्य चीनमधील अनेक प्रांतांमध्ये मुसळधार पाऊस, नदी-नाल्यांना आलेला महापूर आणि धोकादायक भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
12 Aug 2026 01:15 PM (IST)
देशात आताच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. पोल ट्रॅकर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. याच सर्वेक्षणाच्या निकालाचे ट्विट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एक व्हिडीओ ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
12 Aug 2026 01:08 PM (IST)
आशिया खंडातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ‘डॉल्फिन’ (Typhoon Dolphin) चक्रीवादळाने चीनमध्ये प्रवेश करताच प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या आणि तब्बल ६,००० किलोमीटरचा दीर्घ सागरी प्रवास पूर्ण करून आलेल्या या वादळाने चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर आता देशाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्व आणि मध्य चीनमधील अनेक प्रांतांमध्ये मुसळधार पाऊस, नदी-नाल्यांना आलेला महापूर आणि धोकादायक भूस्खलनामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राष्ट्रीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून संपूर्ण प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
12 Aug 2026 12:58 PM (IST)
वसई-विरार शहरातील बहुतांश रस्त्यांची सध्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे हा महत्त्वाचा मुख्य रस्ता देखील मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. हा रस्ता नालासोपारा रेल्वे स्थानकापासून वसई आणि मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक 48 ला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. पावसाळ्यात डांबरीकरण करता येत नसल्याने महानगरपालिकेकडून खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये टाकलेले मटेरियल रस्त्यावर पसरले असून, मोठ्या प्रमाणात खडी आणि रेतीसदृश मटेरियल संपूर्ण रस्त्यावर विखुरलेले पाहायला मिळत आहे.
12 Aug 2026 12:49 PM (IST)
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था समोर आणणाऱ्या तीन शाळकरी मुलींशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
यावेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी फोनवरून मुलींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. व पुढील कोणत्याही मदतीसाठी आदित्य ठाकरे व युवासेना सोबत असल्याचे आश्वासन दिले.
12 Aug 2026 12:37 PM (IST)
भाईंदर : भाईंदर ते नायगावदरम्यान खाडीवरील रेल्वे पुलावर काही तरुण जीव धोक्यात घालून स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे रेल्वेच्या अतिसंवेदनशील परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्हायरल व्हिडिओबाबत तो तयार करणाऱ्यांकडून हा व्हिडिओ AIच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की बनावट, याची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे.
12 Aug 2026 12:26 PM (IST)
प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ₹२ स्वच्छता अधिभार आकारला जात असताना अलिबाग आगारातून धावणाऱ्या एसटी बसच्या स्वच्छतेचा मात्र बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. अलिबाग-शेगाव मार्गावर धावणाऱ्या बसच्या चिखलाने माखलेल्या काचा, अस्वच्छ आतील भाग आणि पावसाळ्यात बसमधून प्रवाशांच्या अंगावर उडणारा काळा चिखल यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप रायगड एसटी प्रेमी संघटनेने केला आहे.
यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ संबंधित एसटी अधिकाऱ्यांना पाठवूनही त्यावर केवळ ‘Noted’ असे उत्तर मिळत असल्याने, ‘नोटेड करण्यापलीकडे प्रत्यक्ष कारवाई कधी होणार?’ असा संतप्त सवाल आता एसटी प्रेमी संघटनेने उपस्थित केला आहे.
12 Aug 2026 12:16 PM (IST)
भात लागवडीचा हंगाम सुरू असतानाच रायगड जिल्ह्यात युरिया खताच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. भात लागवड पूर्ण करून पिकाला आवश्यक खताची गरज असताना अनेक ठिकाणी युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी रायगड जिल्हा कृषी विभागाला थेट इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, मेहनत करून भाताची लागवड केली आहे. आता पिकाला युरियाची गरज असताना बाजारात आणि उपलब्ध वितरण केंद्रांवर युरिया मिळत नसेल, तर शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी उपस्थित केला.
12 Aug 2026 12:08 PM (IST)
आषाढी अमावस्येच्या निमित्ताने मांसाहाराचा मनसोक्त आस्वाद घेण्याची परंपरा असल्याने गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला मटण, चिकन आणि मासळीच्या बाजारात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा मटणाच्या दरात मोठी वाढ झाल्याने खवय्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. सध्या मटण मिक्सचा दर सुमारे ९०० रुपये किलो, तर पिव्वर मटणाचा दर १००० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी असली तरी गटारीच्या दिवशी हजारो बोकड फस्त होण्याची शक्यता आहे.
आषाढी अमावस्या संपल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावणात अनेक जण मांसाहार टाळतात किंवा मांसाहाराचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी गटारी अमावस्येच्या दिवशी मांसाहार करण्याला खवय्यांमध्ये विशेष महत्त्व आहे. यामुळे या दिवशी मटण, चिकन आणि मासळीला मोठी मागणी असते.
12 Aug 2026 11:50 AM (IST)
अनेक विद्यार्थी दहावीचे शिक्षण पूर्ण केल्याबरोबरच सरकारी नोकरीच्या शोधात लागतात. आनंदाची गोष्ट म्हणजे, फक्त दहावी पास केल्यानंतरही सरकारच्या अनेक विभागांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. या नोकऱ्यांमध्ये केवळ चांगला पगारच मिळत नाही, तर नोकरीची सुरक्षा आणि शासकीय सुविधांचा लाभही मिळतो. दहावी पास केल्यानंतर कोणत्या सरकारी नोकऱ्या मिळवता येऊ शकतात, याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
12 Aug 2026 11:45 AM (IST)
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपायला अजून दोन दिवस बाकी आहेत. गेल्या १७ दिवसांत संसदेत १२ नवीन विधेयके सादर करण्यात आली आहेत, त्यापैकी ७ विधेयके लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी मंजूर केली आहेत. यापैकी केवळ २ विधेयकांवर सभागृहात चर्चा झाली, तर उर्वरित विधेयके विरोधी पक्षांच्या गदारोळात आणि आंदोलनांमध्ये मंजूर करण्यात आली.
12 Aug 2026 11:35 AM (IST)
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराडच्या उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही तो वाहतुकीसाठी खुला करण्याची घाई करण्यात आली. पुलावरील पथदिव्यांची प्रकाशयोजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही, तसेच काही कामे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम पूर्ण झाल्याचा अधिकृत हिरवा कंदील मिळाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला करणे योग्य ठरले असते, अशी स्पष्ट नाराजी पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
12 Aug 2026 11:25 AM (IST)
मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता ‘धडपड’ या आगामी मराठी चित्रपटातून ग्रामीण जीवन, शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांमधील गुंतागुंत आणि स्वप्नांसाठीची जिद्द रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे सुरुवात झाली आहे. स्त्रीप्रधान विषय असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
12 Aug 2026 11:15 AM (IST)
श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या महान लावणी आणि तमाशा लोककलाकार विठ्ठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी ‘ईठा’ची रिलीज डेट पुढे ढकलली असून, आता हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.






