India Russia Deal : रशियाचे 'ब्रह्मास्त्र' भारताच्या हाती? ६,००० किमीवरून क्षेपणास्त्र टिपणाऱ्या 'वोरोनेझ-एम' रडारचा भारताला प्रस्ताव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Voronezh M Radar India : जागतिक भू-राजकारणात भारत आणि रशियाची (India Russia Deal) संरक्षण भागीदारी पुन्हा एकदा एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला केवळ सुखोई-५७ (Su-57) स्टेल्थ फायटर जेट्स, एस-४०० (S-400) क्षेपणास्त्र प्रणाली आणि अकुला-क्लास (Akula-class) अणु-पाणबुडीचा प्रस्ताव दिलेला नाही, तर आपल्या शस्त्रागारातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ‘वोरोनेझ-एम’ (Voronezh-M) या धोरणात्मक पूर्वसूचना रडार प्रणालीचीही ऑफर दिली आहे. संरक्षण वर्तुळात या रडार प्रणालीला रशियन हवाई संरक्षणाचे ‘ब्रह्मास्त्र’ म्हटले जाते, कारण यामुळे शत्रूच्या कोणत्याही हालचाली हजारो किलोमीटर दूरवरूनच उघडकीस येतात.
‘द प्रिंट’ आणि ‘युरेशियन टाईम्स’च्या वृत्तानुसार, रशियाच्या अल्माझ-अँटे (Almaz-Antey) या नामांकित कंपनीने विकसित केलेले हे रडार कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे बसवण्याच्या करारावर प्रगत पातळीवर चर्चा सुरू आहे. सुमारे ४ अब्ज डॉलर्सचा हा करार झाल्यास भारताला अंतराळातील व अवकाशातील धोक्यांची अगोदरच माहिती देणारी एक अद्भूत ताकद प्राप्त होणार आहे.
वोरोनेझ रडार प्रणालीची खरी ताकद तिच्यामध्ये वापरल्या गेलेल्या अत्याधुनिक ‘फेझ्ड-अरे’ (Phased-Array) तंत्रज्ञानात दडलेली आहे. जुन्या पिढीतील ‘ड्नेपर’ (Dnepr) किंवा ‘दार्याल’ (Daryal) सारख्या रडार प्रणालींमध्ये मोठ्या यांत्रिक उपकरणांची गरज भासत असे. मात्र, वोरोनेझ प्रणाली इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सेकंदाच्या काही भागात आपली नजर पूर्ण दिशांमध्ये फिरवू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Modi-Xi Jinping Meeting: सीमेवर शांतता अन् संबंधांत संतुलन; मोदी-शी जिनपिंग बैठकीतील 7 मोठे खुलासे
हे रडार आकाराने अत्यंत संक्षिप्त, कमी वीज वापरणारे आणि कमी कालावधीत उभारता येणारे आहे. याची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण क्षमता म्हणजे ६,००० ते ८,००० किलोमीटरपर्यंतचा प्रचंड पल्ला. हे रडार एकाच वेळी शेकडो लक्ष्यांचा (Targets) मागोवा घेऊ शकते. मग ते अंतराळातील उपग्रह असोत, उंचावरून जाणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे असोत वा जमिनीलगत उडणारी क्रूझ क्षेपणास्त्रे असोत, हे रडार क्षणात त्यांचा माग काढते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia Ship Missing: भीषण दुर्घटना! इंडोनेशियात 240 लोकांना घेऊन जाणारे प्रवासी जहाज बेपत्ता; जावा समुद्रात शोधकार्य सुरू
भारतीय हवाई दलाचे माजी वैमानिक आणि विमानचालन तज्ज्ञ विजयेंद्र के. ठाकूर यांच्या विश्लेषणानुसार, वोरोनेझ रडार प्रणाली भारताच्या दक्षिण भागात म्हणजेच कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे स्थापित केली तरी ती संपूर्ण पाकिस्तानचे हवाई क्षेत्र आणि चीनचा अर्ध्याहून अधिक भूभाग आपल्या निगराणीखाली आणेल.
चीन आणि पाकिस्तानकडून अचानक होणाऱ्या संभाव्य बॅलिस्टिक किंवा हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हल्ल्यांची पूर्वसूचना (Early Warning) भारताला काही मिनिटे आधीच मिळेल. यामुळे भारताच्या एस-४०० (S-400) आणि देशी ‘अॅडव्हान्स एअर डिफेन्स’ (AAD) क्षेपणास्त्र यंत्रणांना शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासाठी पुरेसा वेळ (Reaction Time) मिळेल. याशिवाय, अमेरिकेच्या ‘पॅव्हे पॉझ’ (PAVE PAWS) प्रणालीप्रमाणे ही यंत्रणा हिंदी महासागरातील सागरी हालचालींवरही करडी नजर ठेवण्यास मदत करेल.






