रशिया Nuclear attack साठी तैनात करणार 'Satan 2'; ब्रिटनला नष्ट करू शकतो एका स्फोटात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मॉस्को : रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धात आपल्या सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक असलेल्या ‘शैतान’ला उतरवण्याच्या तयारीत आहे. युक्रेनमधून अमेरिकन आणि ब्रिटनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर या योजनेवर विचार सुरू झाल्याचे मानले जात आहे. पाश्चात्य देशांना उत्तर देण्यासाठी पुतिन यांनी अण्वस्त्र हल्ल्याची तयारी केली आहे. रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र युक्रेनला ज्या आक्रमकतेने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे पुतिन यांचा संताप शिगेला पोहोचला आहे.रशियाच्या राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन युद्धभूमीवर एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र तैनात करण्याचा विचार करत आहेत जे अमेरिका आणि युरोपवर आण्विक हल्ले करण्यास सक्षम आहे.
रणांगणात ‘Satan’चा प्रवेश!
वृत्तानुसार, रशिया युक्रेनविरुद्ध युद्धभूमीत आपला ‘सैतान’ उतरवण्याचा विचार करत आहे. ‘Satan 2’ या नावाने ओळखले जाणारे रशियाचे RS-28 सरमत क्षेपणास्त्र हजारो मैल दूरवर अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र अनेक अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे, अहवालानुसार ते इतके शक्तिशाली आहे की ते एकाच स्फोटात संपूर्ण ब्रिटनला उद्ध्वस्त करू शकते. 2016 मध्ये व्लादिमीर पुतिन यांनी प्रथमच RS-28 सरमत जगासमोर सादर केले. मात्र, या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या चाचणीत हे क्षेपणास्त्र सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर तज्ञांनी त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काश्मीरबाबत पाकिस्तानने केले ‘असे’ विधान; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
नाटो देशांना प्रत्युत्तर देण्याची तयारी?
मिळालेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी रशियाच्या नवीन आण्विक धोरणावर नुकतीच स्वाक्षरी केल्यावर सरमत क्षेपणास्त्र युद्धभूमीवर तैनात करण्याची योजना सुरू झाली. खरे तर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून युक्रेन अमेरिकेच्या ATACMS आणि ब्रिटनच्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राने रशियावर सातत्याने हल्ले करत आहे. मॉस्कोने युक्रेन आणि त्याच्या सहयोगी नाटो देशांना या हल्ल्यांबाबत ठोस सूड कारवाईचा इशारा दिला आहे.
‘Satan 2’ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशातील ISKCONला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
पुतीन यांचा पाश्चात्य देशांना ‘अण्वस्त्रांचा इशारा’
देशाच्या आण्विक धोरणात बदल करताना पुतिन यांनी पाश्चात्य देशांचे एखादे क्षेपणास्त्र रशियाच्या भूमीवर पडल्यास अण्वस्त्रे वापरण्याचा विचार करू शकतो, असे स्पष्ट केले होते. पुतीन यांच्या या इशाऱ्यानंतर सरमत क्षेपणास्त्र तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.