US will drop Ukraine-Russia peace efforts if no progress within days
वॉशिंग्टन: गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांत संघर्षविरामासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. दरम्यान अमेरिकेने रशिया आणि यूक्रेनला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, रशिया आणि युक्रेन शांतता करार करण्यास मनाई केली तर अमेरिका लवकरच या करारातून बाहेर पडेल.
ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, रशिया-यूक्रेन शांतता करारातून अमेरिका बाहरे पडू शकते, त्यांनी म्हटले आहे की, रशिया किंवा युक्रेन या करारासाठी तयार नसेल तर ते एक मूर्खपणाचे पाऊल असेल आणि आम्ही शांतता करारातून बाहेर पडू. त्यांच्या या व्यक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे आहे.
यापूर्वी देखील अमेरिकेते परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इशारा दिला होता की, रशिया आणि यूक्रेनने युद्ध संपवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल न उचल्यासा अमेरिका शांतता प्रयत्नात सहभागी होणार नाही. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेऊन 90 दिवस पूर्ण झाले आहेत. या 90 दिवसांच्या कालावधीत संघर्षविरामासाठी अमेरिका आणि रशियामध्ये, तसेच अमेरिका आणि युक्रेनमध्ये अनेक चर्चा झाल्या. मात्र ट्रम्प यांनी दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यात फारसे यश मिळाले नाही.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉटफ यांनी गुरुवारी (17 एप्रिल) पॅरिसमध्ये युरोपीयन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांची भेट घेतली. ट्रम्प प्रशासनाने रशिया-यूक्रेन युद्धसंपवण्याच्या प्रयत्नांसाठी ही बैठक केली होती. या बैठकीत अमेरिकेने दोन्ही युद्धग्रस्क देशांमध्ये शांततेसाठी एक योजना मांडली.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, या योजनेचे सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. परंतु अद्याप योजनेबद्दल कोणतीही माहिती अधिकृत रित्या जाहीर करण्यात आलेली नाही. मार्को रुबियो यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, एक ठोस आणि महत्वपूर्ण करारावर पोहोचण्यासाठी पॅरिस दौऱ्यावर आले होते. जर करार मान्य झाला नाही, तर लवकरच अमेरिका शांतता प्रयत्नांमधून बाहेर पडेल.
याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूक्रेनकडे नैसर्गिक खनिजांची मागणी केली होती. ही मागणी यूक्रेनने मान्य केली असून लवकरच अमेरिका आणि यूक्रेनमध्ये खनिज करार होण्याची शक्यता आहे. यूक्रेन अर्थमंत्री युलिया स्विरिडेन्को यांनी सांगितले आहे की, कीव आणि वॉशिंग्टनमध्ये खनिज संपत्तीच्या कराराबाबत एक सामंजस्य करारा करण्यात आला आहे. अमेरिकेने रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला 350 अब्ज डॉलर्सची शस्त्र मदत पुरवली होती. या मदतीच्या बदल्यात ट्रम्प प्रशासनाने यूक्रेनकडे मौल्यवान खनिजांची मागणी केली.