Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naval War : होर्मुझमध्ये युद्धाचा भडका! अमेरिकेन कार्गो शिप जप्त केल्याने इराण संतप्त; ट्रम्प यांना बदला घेण्याचा इशारा

US Iran War Update : पश्चिम आशियातील युद्धाने आता भयंकर रुप धारण केले आहे. होर्मुझवरील नियंत्रणावरुन मोठा वाद पेटला आहे. नुकतेच अमेरिकेने इराणचे जहाज जप्त केले आहे. यामुळे इराण पेटून उठला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 09:33 AM
इराण-अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसणार; तब्बल 30000000 लोक गरीब होणार

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा फटका बसणार; तब्बल 30000000 लोक गरीब होणार

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेने कार्गो शिप जप्त केल्याने इराण पेटून उठला
  • ट्रम्प यांना इराणची थेट
  • होर्मुझमध्ये युद्ध पेटणार?
Iran Military Warns US Over Seizure Cargo Ship : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण युद्धाने (US Iran War) आता तीव्र पेट घेतला आहे. ओमानच्या आखातात इराणचे एक मालवाहू जहाज अमेरिकेने जप्त केले आहे. यामुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. इराणच्या हजरत खातम अल-अनबिया लष्करी मुख्यालयाने याची पुष्टी केली आहे. इराणने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेघ केला आहे. याचा सूड घेण्याची धमकीही इराणने अमेरिकेला दिली आहे.

Naval War: चर्चेआधीच रणशिंग फुंकलं! USने इराणचे ‘Tuska Ship’ गोळीबार करून केले जप्त; ट्रम्प म्हटले, ‘धडा तर शिकवणारच’

नाकेबंदीच्या उल्लंघनामुळे जहाज जप्ती

मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे एक मालवाहू जहाज उत्तर अरबी समुद्रातून बंदर अब्बासच्या दिशेने जात होते. यावेळी अमेरिकेच्या सेंटकॉमने या जहाजावर नाकेबंदीच्या उल्लंघनाचा आरोप  करत जहाज जप्त केले. अमेरिकेन नौदलाने इशारा देऊनही जहाज आपला मार्ग बदलत नव्हते. यामुळे अमेरिकेच्या युद्धनौका USS Spruance इराणच्या इंजिन रुमवर निशाणा साधला. यानंतर ३१ व्या मरीन एक्सपेडिशनरी युनिटच्या सैनिकांनी जहाजावर ताबा घेतला.

इराणचा सूड घेण्याचा इशारा

कार्गो शिपच्या जप्तीमुळे इराण पेटून उठला आहे. इराणच्या लष्करी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने जहाजाच्या डेकवर उतरुन नेव्हिगेशन सिस्टम निकामी केली आहे. याला इराणने युद्धविरामाचे उल्लंघन संबोधत आंतरराष्ट्रीय नियमांना पायदळी तुडवल्याचा आरोप अमेरिकेवर केला आहे.

अमेरिकेची ही कारवाई सागरी दरोडेथखोरीचा इराणने निषेध करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना थेट इशारा दिला आहे. या कृत्याचा लवकरच बदला घेतला जाईल असे इराणने स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया 

दुसरीकडे ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करत सैन्याचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकन सैन्याने नाकेबंदी तोडणाऱ्या जहाजावर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. ही कारवाई अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. आतापर्यंत इराणच्या निर्बंध लादलेल्या १५ जहाजांना अमेरिकेच्या सैन्याने माघारी धाडले आहे.

शांतता चर्चेला धक्का 

ही घटना अशा वेळी घडली आहे. जेव्हा इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र होर्मुझ
(Hormuz) च्या सामुद्रधुनीतील तणावामुळे पुन्हा एकदा शांततेच्या प्रयत्नांना धक्का पोहोचला आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

इराण युद्ध केवळ एक नाटक? Kamala Harris यांचा मध्यपूर्वेतील संघर्षावरुन खळबळजनक दावा, Trump यांच्यावर गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने इराणचे जहाज जप्त का केले?

    Ans: अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या मते, इराणचे मालवाहू जहाज होर्मुझ समुद्राजवळ लागू केलेल्या सागरी नाकेबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकेने वारंवरा इशारा देऊनही जहाजाने आपला मार्ग बदलला नाही. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

  • Que: अमेरिकेने इराणच्या जहाजावर ताबा कसा मिळवला?

    Ans: अमेरिकेने इराणी जहाजाला वारंवार इशारा देऊनही जहाज थांबले नाही. यामुळे अमेरिकेच्या युद्धनौका USS Spruance इराणच्या इंजिन रुमवर निशाणा साधत जहाजामध्ये छेद केला. यानंतर ३१ व्या मरीन एक्सपेडिशनरी युनिटच्या सैनिकांनी जहाजाच्या डेकवर उतरुन संपूर्ण ताबा मिळवला.

  • Que: अमेरिकेच्या कार्गो शिप जप्तवर इराणने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: अमेरिकेच्या कार्गो शिप जप्तीचा इराणने तीव्र निषेध केला असून याचा सूड घेण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Strait of hormuz crisis naval war blockade iran warns us over seizure cargo ship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
2

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
4

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.