Photo Credit- X@NASA
स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन इतर अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहेत.गेल्या वर्षी जूनमध्ये फक्त आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले हे दोन्ही अंतराळवीर नऊ महिन्यांनंतर परत येऊ शकले आहेत.बोईंगचे स्टारलाइनर अंतराळयान जे त्यांना पृथ्वीवर परत आणणार होते ते बिघाडामुळे बंद पडले, त्यामुळे त्यांना इतका वेळ वाट पहावी लागली.त्यांनी अखेर एलोन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरवले.
Welcome home, #Crew9@NASA_Astronauts Nick Hague, Suni Williams, Butch Wilmore, and cosmonaut Aleksandr Gorbunov splashed down off the coast of Florida at 5:57pm ET (2127 UTC), concluding their scientific mission to the @Space_Station: https://t.co/DFWxQIiz6O pic.twitter.com/VQu3DhpTUJ
— NASA (@NASA) March 19, 2025
फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगन कॅप्सुल उतरल्यानंत उत्सुक डॉल्फिनच्या एका गटाने कॅप्सूलभोवती घिरट्या घातल्या. अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी १७ तासांचा वेळ लागला. भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता, चार अंतराळवीरांना घेऊन जाणारे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात उतरले. समुद्राच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर, नियंत्रण केंद्राने अंतराळवीरांचे स्वागत केले, “निक, अॅलेक, बुच, सुनी… स्पेसएक्समधून घरी परतण्याचे स्वागत आहे.” असे म्हणत त्यांचे स्वागत केले. तर कमांडर निक हेग यांनीदेखील “कॅप्सूल सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदित आहोत. असे सांगत त्यांना उत्तरही दिले.
सुनीता विल्यम्सच्या अडचणी काही थांबेना! लॅंडिंगवेळी पृथ्वीवर येताना
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) पासून पृथ्वीपर्यंतचा प्रवास अंदाजे १७ तासांचा होता. ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ताशी १७,००० मैल वेगाने प्रवास करत होता. त्यानंतर कॅप्सुलचा वेग मिनिटांत कमी झाला. मंगळवारी, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी इतर दोन अंतराळवीर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्यासह उर्वरित अंतराळवीरांना निरोप दिला. निक हेग आणि गोर्बुनोव्ह गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलवरून सहा महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आयएसएसवर पोहोचले.
ड्रॅगन कॅप्सुलसाठी हा प्रवास तितका सोपाही नव्हता. कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात शिरताच नियंत्रण कक्षाशी त्यांचा संपर्क तुटला. पण अगदी काही मिनिटातच म्हणजे पहाटे ३:२० वाजता पूर्ववत झाला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर, अंतराळयानाच्या प्लाझ्मा शील्डचे तापमान १९२७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, परंतु हीट शील्डने इतक्या तीव्र उष्णतेपासून अंतराळवीरांचे संरक्षण करण्यास मदत केली.
NASA सुनीता विल्यम्स यांना किती पगार देतो? 9 महिन्यांच्या ओव्हरटाईम मिळणार का?
पहाटे ३:२१ च्या सुमारास अंतराळयान स्वायत्त झाले, म्हणजेच अंतराळवीर त्यावर नियंत्रण ठेवत नव्हते. या काळात, तो त्याच्या समोरील टच स्क्रीनवर सर्व हालचाली पाहू शकत होता.पहाटे ३:२४ च्या सुमारास, पहिल्या ड्रॅगन कॅप्सूलचे दोन पॅराशूट उघडले, ज्यामुळे त्याचा वेग आणखी कमी झाला. या दरम्यान, एक जोरदार धक्का बसला आणि कॅप्सूलचा वेग आणखी मंदावला. यानंतर आणखी दोन पॅराशूट उघडले.
कॅप्सूल समुद्रात उतरताच डॉल्फिन माशांचा एक गट कॅप्सूलभोवती घिरट्या घालताना दिसून आले. त्यानंतर कॅप्सुलच्या मदतीसाछी तिथे उपस्थित असलेल्या एका बोटीतील पथकाने सुरक्षेची तपासणी करत पॅरॉशुट काढून टाकले. स्पेसएक्सचे रिकव्हरी व्हेसल आले, जे लँडिंग साइटपासून फक्त दोन मैल अंतरावर थांबवण्यात आले होे. जेव्हा अंतराळयान परत येत होते तेव्हा आकाश पूर्णपणे निळे होते. यानंतर, दोरीच्या मदतीने कॅप्सूल सेफ्टी बोटमध्ये आणण्यात आले.