Delhi Famous Street Food Matar Kulche Recipe In Marathi
दिल्लीच्या पदार्थाला आणा तुमच्या स्वयंपाकघरात, घरीच बनवा चटपटीत ‘मटार कुलचे’, चव अशी की सर्वच होतील खुश
Matar Kulche Recipe : दिल्लीची रस्त्या रस्त्यांवर तुम्हाला मटर कुलचे पाहायला मिळतील. मऊ कुलचे आणि चटपटीत मटर यांची चव फार अप्रतिम लागते. तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
याची चटपटीत चव खाद्यप्रेमींना नेहमीच खुश करुन जाते.
दिल्लीच्या गल्ल्यांत फिरताना ज्या स्ट्रीट फूडचा सुगंध लगेच भूक वाढवतो, त्यात मटर कुलचे हे नाव हमखास घेतलं जातं. मसालेदार, हलकीशी आंबट-तिखट चव असलेली उकडलेली मटर आणि त्यासोबत तव्यावर गरम केलेले मऊ कुलचे हा पदार्थ उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या रेसिपीमध्ये फारसा तेलकटपणा नसतो, त्यामुळे ती चवदार असण्यासोबतच तुलनेने हलकीही वाटते. घरच्या घरी योग्य मसाल्यांचा वापर केला तर अगदी दिल्लीसारखी चव सहज मिळू शकते. ही रेसिपी तुम्ही नाश्ता, दुपारचे हलके जेवण किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता.
सर्वप्रथम भिजवलेले मटर प्रेशर कुकरमध्ये घ्या. त्यात मीठ आणि पाणी घालून 4–5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. मटर मऊ पण पूर्ण मॅश न होता शिजलेली असावी.
कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर आलं आणि हिरवी मिरची घालून परतवा. त्यानंतर कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतवा.
आता टोमॅटो घालून मिश्रण मऊ होईपर्यंत शिजवा. हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड घालून तेल सुटेपर्यंत परतवा.
उकडलेले मटर आणि थोडं पाणी घालून चांगलं मिसळा. 8–10 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
गॅस बंद करण्याआधी आमचूर पावडर, चाट मसाला आणि लिंबाचा रस घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
एका भांड्यात मैदा, दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, मीठ आणि तेल एकत्र करा. थोडं पाणी घालून मऊ पीठ मळा. ओलसर कपड्याने झाकून किमान 2 तास बाजूला ठेवा.
पीठाचे मध्यम गोळे करून लाटून घ्या. गरम तव्यावर बटर लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी डाग येईपर्यंत भाजा.
गरमागरम कुलचे आणि मसालेदार मटर एका प्लेटमध्ये सर्व्ह करा. वरून थोडा कांदा, हिरवी मिरची आणि लिंबाची फोड दिली तर अगदी दिल्ली स्टाईल अनुभव मिळतो.
Web Title: Delhi famous street food matar kulche recipe in marathi