Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Switzerland : ग्रीनलँड आणि टॅरिफ मुद्यावरुन पेटला वाद; World Economic Forum मध्ये जागतिक नेत्यांचा ट्रम्पवर हल्लाबोल

World Economic Forum 2026 : डोनाल्ड ट्रम्प दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. परंतु त्यांच्या येण्यापूर्वीच जागतिक नेत्यांनी अमेरिकेवर हल्ला केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 21, 2026 | 02:46 PM
World Economic Forum 2026

World Economic Forum 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आजोजन
  • जागतिक नेत्यांनी अमेरिकेवर केला हल्लाबोल
  • ग्रीनलँड आणि टॅरिफच्या मुद्यावरुन पेटला वाद
World Economic Forum 2026 : दावोस : स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये ५६ व्या वार्षिक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान ही परिषद पार पडणार असून यामध्ये अनेक जागतिक नेत्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये भारताने देखील उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान अमेरिकाही या परिषदेत सामील झाली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) बुधवारी (२१ जानेवारी २०२६) या परिषदेत पोहचण्याची अपेक्षा आहे. पण त्यांच्या येण्यापूर्वीच जागतिक नेत्यांनी अमेरिकेवर हल्लाबोल केला आहे.

‘America Frist’ धोरणाचा पुन्हा नारा! ट्रम्पचे ग्रीनलँड, पनामा कालवा आणि नाटोवर वादग्रस्त विधाने, जगात खळबळ

ग्रीनलँड अन् टॅरिफ मुद्यांवरुन अमेरिका जागतिक कठघऱ्यात

या फोरममध्ये अमेरिकेवर जागतिक नेत्यांनी तीव्र टिका केली आहे. ग्रीनलँड आणि टॅरिफच्या मुद्यावरुन अमेरिकेला आंतरराष्ट्रीय टीकांचा सामना करावा लागत आहे. युरोपियन युनियन, नाटो सदस्य देश, आणि अनेक जागतिक नेत्यांनी अमेरिकेला जगाच्या कठघऱ्यात उभे केले आहे. ट्रम्पच्या ग्रीनलँडवरील नियंत्रणाला आणि टॅरिफच्या धोरणाला तीव्र विरोध या फोरममध्ये केला जात आहे.

ग्रीनलँड आणि टॅरिफ वाद

ट्रम्प यांनी ग्रीनलँड (Greenland) अमेरिकेत सामील करुन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र याला डेन्मार्कसह अनेक युरोपीय देशांनी तीव्र विरोध केला आहे. यामुळे ट्रम्प यांनी त्यांना विरोध करणाऱ्या देशांवर टॅरिफ (Tarrif) लागू केले आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील एक स्वायत्त देश असून त्यावर अमेरिकेचे नियंत्रण युरोपीय देशांना मान्य. यामुळे ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १० टक्के टॅरिफ लादले असून हे २५% पर्यंत वाढवण्याची धमकी दिली आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॅन डेरे यांनी देखील ट्रम्प यांच्या टॅरिफला तीव्र विरोध केला असून युरोपीय देशांच्या एकजुटीचा संदेश दिला आहे. तसेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देखील नाटो आणि युरोपीय देशांची ग्रीनलँडच्या समर्थनार्थ एकत्र असल्याचे म्हटले आहे. तसेच कॅनडाने देखील ट्रम्प किंवा अमेरिकेचा प्रत्यक्षात उल्लेख न करता यामुळे जागितक व्यवस्था धोक्यात येत असल्याचे म्हटले आहे.

तसेच अनेक जागतिक तज्ज्ञांनी देखील ट्रम्पच्या टॅरिफ धोरणावर टीका केली आहे. तज्ज्ञांच्या मते, टॅरिफमुळे केवळ जागतिक अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होईल असे म्हटले आहे.

भारताच्या उपस्थितीने वेधलं जगाचे लक्ष

दरम्यान या परिषदेत भारतानेही उपस्थिती दर्शवली आहे. भारताने AI, तंत्रज्ञान आणि 5th इंडस्ट्रियल रिव्होल्शनूवर आपली भूमिका मांडली आहे. भारताने समावेळ, कमी खर्चिक आणि जास्त फायदा देणाऱ्या तंत्रज्ञानावर भर दिला आहे.जागतिक स्तरावर भारताला विश्वासक भागीदार म्हणून पाहिले जात आहे. भारताच्या वतीने या परिषदेचे नेतृत्व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव करत आहेत. तसेच १०० हून अधिक वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधी, कंपन्यांचे सीईओ देखील उपस्थिता आहेत.

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या Air Force One विमानात तांत्रिक बिघाड; अमेरिकेत खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रीनलँडवरुन जागतिक नेत्यांनी अमेरिकेवर काय टीका केली आहे?

    Ans: ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला युरोपीय नेत्यांनी तीव्र विरोध केला असून डेन्मार्कच्या समर्थनार्थ एकता दर्शवली आहे.

  • Que: भारताने World Economic Forum मध्ये कोणते मुद्दे मांडले आहेत?

    Ans: भारताने AI, तंत्रज्ञान आणि 5th इंडस्ट्रियल रिव्होल्शनूवर World Economic Forum मध्ये आपली भूमिका मांडली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी ग्रीनलँडला विरोध करणाऱ्या देशांवर किती टॅरिफ लादले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १० टक्के टॅरिफ लागू केले आहे. परंतु ग्रीनलँडसोबत करार न झाल्यास ट्रम्प यांनी १ जून २०२६ पासून युरोपीय देशांवर २५ टक्के टॅरिफ शक्यता आहे.

  • Que: टॅरिफवरुन तज्ज्ञांनी काय म्हटले आहे?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, टॅरिफमुळे केवळ जागतिक अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होईल.

  • Que: कॅनडाने अमेरिकेवर काय टीका केली आहे?

    Ans: कॅनडाने अमेरिकेचे नाव न घेता यामुळे जागितक व्यवस्था धोक्यात येत असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Switzerland global leaders target trump at world economic forum over greenland and tariff dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता
1

India EU trade deal: अमेरिका-युरोप टॅरिफ वॉरमध्ये भारताला सुवर्णसंधी; मोठ्या ट्रेड डीलची शक्यता

Bangladesh Election : बांगलादेशात भारतीयांना धोका? निवडणूकीपूर्वी हिंसाचारामुळे डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय
2

Bangladesh Election : बांगलादेशात भारतीयांना धोका? निवडणूकीपूर्वी हिंसाचारामुळे डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय

Tariff War : ‘तर अब्जावधी डॉलर्स परत करावे लागतील!’ सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफवरील निर्णयापूर्वी ट्रम्पची धाकधूक वाढली
3

Tariff War : ‘तर अब्जावधी डॉलर्स परत करावे लागतील!’ सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफवरील निर्णयापूर्वी ट्रम्पची धाकधूक वाढली

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या Air Force One विमानात तांत्रिक बिघाड; अमेरिकेत खळबळ
4

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्या Air Force One विमानात तांत्रिक बिघाड; अमेरिकेत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.