Photo Credit- Social Media Pakistan Afganistan War: पाकिस्तानच्या सीमेवर तालिबानी सैनिक; केव्हाही सुरू होऊ शकते युद्ध
इस्लामाबाद: मागील काही वर्षांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाद धुमसत चालले असून आता या वादचे उग्र रूप धारण केले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर हा तणाव वाढला होता. दिवसेंदिवस हा तणाव आता अधिकच वाढत चालला आहे. अशातच, तालिबानचे 15 हजार सैनिक पाकिस्तानच्य दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. तर पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दलाने पेशावर आणि क्वेटा येथून सैन्य तैनात केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचेही युद्ध सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या काही तुकड्या अफगाणिस्तानच्या सीमेवर पोहोचल्या आहेत. तर मीर अली सीमेजवळ तालिबानी सैनिकही अफगाणिस्तानच्या सीमेवर पोहोचले आहेत. सध्या तरी फायरिंगची कोणतीही चिन्हे आढळून आलेली नसली तरी, सीमांवर दोन्ही बाजू्च्य सैनिकांची तैनाती वाढवण्यात आली आहे. याशिवाय अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही काबूलमधील पाकिस्तानी दूतावासाच्या प्रभारींना समन्स बजावले आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाफिज झिया अहमद यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि हा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने नुकतेच वझिरीस्तानच्या माकिन भागात 30 पाकिस्तानी लष्करी सैनिकांना ठार केला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानेही एअरस्ट्राईक करत आमच्या सैनिकांच्या हत्यांना सडेतोड उत्तर दिले, जाईल असे दाखवून दिले होते. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढला आहे. तालिबानकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दुर्गम भागात लपण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे AK-47, मोर्टार, रॉकेट लाँचर यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा मोठा साठा आहे. याशिवाय तालिबानी सैनिक डोंगर-दऱ्यांमधूनही हल्ले करतात, ज्याची पाकिस्तानी लष्करालाही कोणतीही माहिती नाही.
पाकिस्तानचे शेहबाज शरीफ सरकार आधीच आर्थिक संकट, CPEC प्रकल्पाला होणारा विलंब आणि बलुचिस्तानमधील फुटीरतावाद यांसारख्या समस्यांशी झुंजत आहे. या मुद्द्यांमुळे सरकार आणि लष्कर दोन्हीही कमजोर झाले आहेत. आता तालिबानसोबतच्या संघर्षामुळे हे संकट आणखी वाढणार असल्याची चिन्हेही निर्माण झाली आहेत.
आपण कोणत्याही मोठ्या लष्करी शक्तीपुढे झुकणार नाही, हे तालिबानने दाखवून दिले आहे . त्याने अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांना वर्षानुवर्षे आव्हान दिले आणि शेवटी त्यांना अफगाणिस्तानातून परत जाण्यास भाग पाडले. तालिबानला तोंड देण्याची लष्करी ताकद किंवा आर्थिक क्षमता पाकिस्तानकडे नसल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताविरुद्ध रचला जातोय मोठा कट? 250 किलो RDX आणि 100 AK47 पाकच्या
मीर अली सीमेवर वाढत्या हालचालींमुळे पाकिस्ताननेही आपल्या लष्कराला सतर्क केले आहे. सीमावर्ती भागात सैन्याची तैनाती वाढवण्यात आली आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या परिस्थितीमुळे मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. तणाव वाढत असताना, पाकिस्तान आणि तालिबानमधील हा संघर्षाचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अफगाणिस्तानातून रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला उत्तर पाकिस्तानमध्ये तालिबानचा उदय झाला. पश्तो भाषेत, तालिबान म्हणजे विद्यार्थी, विशेषत: ते विद्यार्थी जे कट्टर इस्लामिक धार्मिक शिकवणींनी प्रेरित आहेत. कट्टरपंथी सुन्नी इस्लामिक विद्वानांनी धार्मिक संस्थांच्या मदतीने पाकिस्तानात आपला पाया घातला होता, असे म्हटले जाते. तालिबानवर देववंडी विचारसरणीचा पूर्ण प्रभाव आहे. तालिबानच्या स्थापनेसाठी सौदी अरेबियाकडून येणारी आर्थिक मदत जबाबदार मानली जात होती.
इस्लामिक भागातून परकीय राजवट संपवणे आणि त्याठिकाणी शरिया कायदा आणि इस्लामिक राज्य स्थापन करणे हे तालिबानचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर सरंजामदारांचे अत्याचार आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने तालिबानमधील मसीहा पाहिला आणि अनेक भागात आदिवासींनी त्यांचे स्वागत केले पण नंतर धर्मांधतेमुळे तालिबानची लोकप्रियताही संपुष्टात आली पण तोपर्यंत तालिबान इतके शक्तिशाली झाले होता.
जानेवारी महिन्यात इतके दिवस राहतील बॅंका बंद; वाचा… सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
तालिबानी इतके शक्तिशाली आहेत की ते अफगाणी सैन्यावरही मात करत आहेत. पण ‘तालिबानचा लवकरच खात्मा होईल. त्यांच्याकडे सुमारे 80 हजार सैनिक आहेत आणि अफगाण सैन्यात 5 ते 6 लाख सैनिक आहेत. याशिवाय अफगाणिस्तानकडे हवाई दल आहे जे तालिबानला पराभूत करेल. तथापि, या दाव्यानंतरही, तालिबान जमिनीवर मजबूत असल्याचे सिद्ध करणारे अनेक तथ्य आहेत.
तालिबानचे मनुष्यबळ स्त्रोत आदिवासी भागात स्थायिक झालेल्या जमाती आणि त्यांचे लढवय्ये आहेत. याशिवाय कट्टरतावादी धार्मिक संस्था आणि मदरसेही त्यांच्या कल्पनेला पाठिंबा देत आहेत. मात्र पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयची गुप्त मदत तालिबानसाठी उपयोगी ठरत आहे. अमेरिकन इंटेलिजन्सच्या ग्राउंड परिस्थितीनुसार, अमेरिकन सैन्यात्या माघारीच्या 6 महिन्यांच्या आत अफगाण सरकारचे वर्चस्व संपेल आणि तालिबान राजवट येऊ शकते, अस म्हटले आहे.