Photo Credit- Social Media
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुखांच्या आरोपीला तातडीने अटक करावी, आणि कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. इतकेच नव्हे तर, संतोष देशमुखांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास लागावा यासाठी बीडमधील रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. रेणापूरमधील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय या मार्गावरून काढण्यात आलेल्या या मोर्चात संतोष देशमुख यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही सहभागी झाले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
संतोष देशमुखांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. संतोष देशमुख्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तसेच, आरोपीना पाठिशी घालणाऱ्या आणि त्यांचा बचाव करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही बडतर्फ करा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, संतोष देशमुख यांच्या कुटुबियांची जबाबदारी शासनाने घ्यावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशीही मागणी एका आंदोलकाने केली आहे. “संतोष देशमुख यांच्यासारख्या सरपंचाचा बेदम मारहाण करुन निर्घृण खून करण्यात येतो, मग आमच्यासारख्या सर्ववसामान्यांच काय? असा प्रश्न उपस्थित करत एका आंदोलकाने देशमुखांच्या आरोपींवर मोक्का अतंर्गत कारवाई करुन त्याला शिक्षा द्यावी” अशी मागणी केली.
Former PM Manmohan Singh’s Resume : आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचे आर्किटेक्ट
तर दुसरीकडे “संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन आज 18 दिवस झाले. पण पोलीस यंत्रणेला साधा आरोपी सापडत नाही, त्यातून प्रशासनाचा हलगर्जीपणाच जनतेसमोर दिसून येत आहे. त्यामुळेच आज जनता रस्त्यावर उतरली आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत हे आंदोलन महाराष्ट्रभर होत राहणार, राज्य सरकारलाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागणार, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, हे आज महाराष्ट्र बघत आहे, कानाकोपऱ्यात गुंडगिरी माजली आहे. पण आरोपी प्रशासनाला सापडत नसतील, तर महाराष्ट्रातली जनता हा कायदा हातात घेईल” अशी आक्रमक प्रतिक्रीया एका आंदोलकाने व्यक्त केली.
या आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्यावी अशी मागणी जनसमुदायाने केली आहे. तसेच तहसीलदार कार्यालयामध्ये शांततेमध्ये हा मोर्चा दाखल झाला. या मोर्च्याच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आलेयावेळी आंदोलकांच्या हातामध्ये न्याय मिळावा या आशयाचे फलक होते. मुख्य आरोपींसह कटाचा सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच हे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसयंत्रणा ॲक्शन मोडमध्ये,रस्त्यावर फिरून नशाखोरांवर कडक
तसेच सदरील संतोष देशमुख यांच्या पिडीत कुटूंबियांना व दहशती खाली असणाऱ्या मस्साजोग येथील ग्रामस्थांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. संतोष देशमुख यांच्या कुटूंबियातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समावून घेण्यात यावे. सदरील खुन प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत मुंडे कुटुंबाकडे असलेल्या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा. सदरील घटनेचा गुन्हा नोंद करुन घेण्यास टाळाटाळ करून व विलंब करुन आरोपीस मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करुन, त्यांना या खुनामध्येसह आरोपी करण्यात यावे. परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आक्रोश मोर्चामध्ये करण्यात आली आहे.