Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट

Greenland Controversy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत केलेल्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की अमेरिका ग्रीनलँड ताब्यात घेईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 15, 2026 | 11:23 AM
trump greenland takeover plan putin xi jinping neighbor threat cash offer 2026

trump greenland takeover plan putin xi jinping neighbor threat cash offer 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • शी जिनपिंग-पुतिन यांना इशार
  • ९० लाख रुपयांची ‘ऑफर’
  • जगाचा विरोध

Trump Greenland takeover 2026 update : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना एका रात्रीत सत्तेवरून खेचून कैद केल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प (Donald trump)यांनी आता आपला मोर्चा आर्क्टिक क्षेत्रातील ग्रीनलँडकडे वळवला आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “ग्रीनलँडच्या (Greenland) लोकांना हवे असो वा नसो, अमेरिका या बेटावर नियंत्रण मिळवेल,” असे सांगत त्यांनी रशिया आणि चीनला थेट इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या या ‘डॉन-रो डॉक्ट्रीन’ मुळे जागतिक राजकारणात नवा तणाव निर्माण झाला आहे.

“आम्ही रशिया-चीनला शेजारी बनू देणार नाही!”

ट्रम्प यांच्या या घाईचे मुख्य कारण म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे शी जिनपिंग यांचा आर्क्टिकमधील वाढता हस्तक्षेप. ट्रम्प म्हणाले, “जर आम्ही आता ग्रीनलँड ताब्यात घेतले नाही, तर लवकरच तिथे रशियन आणि चिनी जहाजांचा वावर वाढेल. आम्ही या महासत्तांना आमच्या घराच्या इतक्या जवळ शेजारी म्हणून कधीच सहन करणार नाही.” त्यांच्या मते, ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेसाठी (Missile Defense) अत्यंत संवेदनशील आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर

प्रत्येक नागरिकासाठी ‘कॅश’ प्लॅन: ९० लाख रुपयांची लालूच?

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प केवळ लष्करी बळाचा विचार करत नसून ‘आर्थिक गाजर’ दाखवण्याच्या तयारीतही आहेत. व्हाईट हाऊसचे अधिकारी ग्रीनलँडच्या अंदाजे ५७,००० नागरिकांना थेट आर्थिक मदत देण्याची योजना आखत आहेत. या योजनेनुसार, प्रत्येक नागरिकाला १०,००० ते १,००,००० डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे ९ लाख ते ९० लाख रुपये) दिले जाऊ शकतात. हा पैसा ग्रीनलँडच्या रहिवाशांना डेन्मार्कपासून वेगळे होऊन अमेरिकेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वापरला जाणार आहे. यावर एकूण ६ अब्ज डॉलर्स खर्च होण्याचा अंदाज आहे.

Washington’s ready to pay Greenlanders money to join the United States US officials are reportedly discussing cash payments of up to $100,000 per person to lure the Arctic island away from Denmark. It wouldn’t be the first time America expanded its map with money.… pic.twitter.com/5KNHG8E2zU — TRT World (@trtworld) January 9, 2026

credit : social media and Twitter

युरोपातील ७ देशांचा ट्रम्पना ‘नो’!

ट्रम्प यांच्या या विस्तारवादी धोरणामुळे युरोपमध्ये संतापाची लाट आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, स्पेन, ब्रिटन आणि डेन्मार्क या देशांनी एक संयुक्त निवेदन जारी करून ट्रम्प यांना सुनावले आहे. “ग्रीनलँड ही काही रिअल इस्टेटची वस्तू नाही जी खरेदी करता येईल. ग्रीनलँडच्या भविष्याचा निर्णय केवळ तिथले लोक आणि डेन्मार्कच घेऊ शकतात,” असे या देशांनी स्पष्ट केले आहे. डेन्मार्कने तर आपला लष्करी तळ हाय-अलर्टवर ठेवला असून, ग्रीनलँडवर आक्रमण झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protests: तेहरानमध्ये रक्ताचा पूर! 200 मृत्यूंनंतर खामेनेईंचे ‘शूट-ॲट-साईट’चे आदेश; इराणमध्ये पेटली क्रांतीची मशाल

पुढचा निशाणा: क्युबा आणि मेक्सिको?

ट्रम्प यांची ही आक्रमक भूमिका केवळ ग्रीनलँडपुरती मर्यादित नाही. त्यांचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी क्युबावरही कठोर निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, मेक्सिकोमधील ड्रग कार्टेल्सना संपवण्यासाठी तिथे लष्करी कारवाई करण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या या ‘डॉन-रो डॉक्ट्रीन’ मुळे अमेरिका आता ‘जगाचा पोलीस’ बनण्याऐवजी ‘जगाचा मालक’ बनू पाहत असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प ग्रीनलँडच्या लोकांना पैसे का देऊ इच्छितात?

    Ans: ग्रीनलँडच्या नागरिकांनी डेन्मार्कपासून वेगळे होण्यासाठी आणि अमेरिकेशी हातमिळवणी करण्यासाठी 'आर्थिक प्रोत्साहन' म्हणून १०,००० ते १००,००० डॉलर्स देण्याचा विचार सुरू आहे.

  • Que: रशिया आणि चीनचा या वादात काय संबंध?

    Ans: ट्रम्प यांना भीती आहे की जर अमेरिकेने ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवले नाही, तर रशिया आणि चीन तिथे लष्करी तळ बांधून अमेरिकेच्या अगदी जवळ पोहोचतील.

  • Que: डेन्मार्क आणि युरोपीय देशांची भूमिका काय आहे?

    Ans: डेन्मार्कने स्पष्ट केले आहे की "ग्रीनलँड विक्रीला नाही." फ्रान्स, जर्मनीसह ७ देशांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे.

Web Title: Trump greenland takeover plan putin xi jinping neighbor threat cash offer 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • international news
  • Vladimir Putin
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

US Iran Tenison : इराणने ट्रम्प यांना दाखवला इंगा! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही सरकारविरोधी आंदोलनकर्त्याला देणार फाशी?
1

US Iran Tenison : इराणने ट्रम्प यांना दाखवला इंगा! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही सरकारविरोधी आंदोलनकर्त्याला देणार फाशी?

Narendra Modi Israel Visit: इस्रायलच्या संसदेत मोदींचे भाषण धोक्यात? मुख्य न्यायाधीशांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक
2

Narendra Modi Israel Visit: इस्रायलच्या संसदेत मोदींचे भाषण धोक्यात? मुख्य न्यायाधीशांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव
3

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ
4

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.