रात्री ८ वाजता...!" ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याची वेळ ठरवली? महाविनाशाचा काऊंटडाऊन सुरू; संपूर्ण जग युद्धाच्या छायेखाली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Donald Trump Truth Social post Iran 8 PM : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर (US-Israel Iran War) उभे आहे की काय, अशी भीती वाटावी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता केवळ धमक्यांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष विनाशाच्या वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नमवण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘अल्टिमेटम’ दिला असून, इराणवरील संभाव्य हल्ल्याची वेळही निश्चित केल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे संपूर्ण मध्य-पूर्वेसह जागतिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशली’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अत्यंत खळबळजनक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे, “मंगळवार, रात्री ८:०० वाजता ईस्टर्न टाईम!” भारतीय वेळेनुसार ही वेळ बुधवार सकाळ (८ एप्रिल) असेल. ही केवळ एक वेळ नसून इराणसाठी दिलेला मृत्यूचा इशारा असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, जर मंगळवार संध्याकाळपर्यंत इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली नाही, तर अमेरिका आपले सर्वात घातक पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: क्षणात घडवून आणेल विध्वंस! अमेरिकेने इराणवर डागले सर्वात घातक ‘स्टेल्थ’ क्षेपणास्त्र; काय आहे ‘JASSM-ER’ ची ताकद?
एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. ते म्हणाले की, तेहरानकडे विचार करण्यासाठी पुरेसा वेळ होता, पण आता सहनशीलतेचा अंत झाला आहे. जर इराणने तडजोड केली नाही, तर अमेरिका केवळ हल्लेच करणार नाही, तर इराणचे वीज प्रकल्प, दळणवळणाचे पूल आणि संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करेल. ट्रम्प यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरत इराणला “नरकात ढकलले जाईल” असा इशारा दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, जिथून जगाचा मोठा तेल पुरवठा होतो, ती खुली करणे हाच अमेरिकेचा मुख्य अजेंडा आहे.
BREAKING: US President Donald Trump sets a deadline for Iran to reopen the Strait of Hormuz by Tuesday at 8:00 PM EST, warning that “all hell” will break loose if negotiations fail. pic.twitter.com/bOco4EKeDF — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 5, 2026
credit – social media and Twitter
ट्रम्प यांच्या या धमक्यांना इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकेर कलिबाफ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “ट्रम्प, तुमची ही बेजबाबदार कृत्ये इराणला नाही, तर अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला जिवंत नरकात ढकलत आहेत. तुम्ही इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या आदेशाचे पालन करत संपूर्ण प्रदेशाला आगीच्या खाईत लोटत आहात.” कलिबाफ यांनी स्पष्ट केले की, युद्ध गुन्हे करून अमेरिका काहीही साध्य करू शकणार नाही आणि इराणी जनतेच्या हक्कांचा आदर करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bahrain Bapco: इराणने बहरीनमध्ये घातला धुमाकूळ! ‘घातक’ हल्ल्यामुळे तेल उत्पादन ठप्प, कुवेतमध्ये अंधार; पाहा धक्कादायक VIDEO
जर खरोखरच ट्रम्प यांनी सांगितलेल्या वेळेनुसार कारवाई झाली, तर त्याचे परिणाम जागतिक स्तरावर भीषण असतील. इराणने आधीच सौदी अरेबियातील तेल सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. जर होर्मुझची सामुद्रधुनी युद्धाचे मैदान बनली, तर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील, ज्याचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसेल. सध्या तरी संपूर्ण जगाचे डोळे मंगळवारच्या त्या ‘रात्री ८’ वाजण्याच्या वेळेकडे लागले आहेत. ही शांततेची शेवटची संधी आहे की विनाशाची नांदी, हे लवकरच स्पष्ट होईल.
Ans: ट्रम्प यांनी इराणला मंगळवार, रात्री ८ वाजेपर्यंत (ईस्टर्न टाईम) होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचा आणि करारावर स्वाक्षरी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
Ans: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानुसार, इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते.
Ans: इराणने हा इशारा फेटाळला असून, अमेरिकेच्या या कृतीमुळे अमेरिकन नागरिकच संकटात येतील आणि हा प्रदेश युद्धाच्या आगीत जळेल, असे प्रत्युत्तर दिले आहे.






