Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Typhoon Bavi : चीन-फिलिपिन्समध्ये बावी चक्रीवादळाचा हाहा:कार; आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू

Typhoon Bavi Update : 'बावी' चक्रीवादळामुळे आणि मुसळधारपावसामुळे फिलिपिन्स आणि चीनमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. फिलिपिन्समध्ये १८ जणांचा मृत्यू झाला असून चीनच्या झेजियांग प्रांतात सर्वात शक्तिशाली वादळाचा १९४९ नंतर सर्वात मोठा तडाखा बसला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 04:45 PM
Typhoon Bavi

Typhoon Bavi

Follow Us
Follow Us:
  • चीन-फिलिपिन्समध्ये बावी चक्रीवादळाचा हाहा:कार
  • आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू
  • चीनमध्ये १९४९ नंतरची भीषण आपत्ती
Typhoon Bavi News in Marathi : बीजिंग/मनिला : फिलिपिन्स आणि चीनमध्ये बावी चक्रीवादळाने प्रचंड कहर माजवला आहे. मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्सखनामुळे जनजीवन विस्कळीत झाल आहे. फिलिपिन्समध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून झेजियांग प्रदेशात १९४९ नंतर आलेली सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे.

Israel Election 2026 : इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला; नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?

फिलिपिन्समधील परिस्थिती

फिलिपिन्सच्या ऑफिस ऑफ सिव्हिल डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार, बावी चक्रीवादळ आणि सक्रिय नैऋत्य मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसाचा तडाखा अनेक भागांना बसला असून अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

अचानक आलेल्या पुरात बुडून अनेकांचा मृत्यू झाला असून १२ जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम बचाव पथके करत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरातील ५.६२ लाख नागरिकांवर परिणाम झाला आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी लोकांना हलविण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पूर आणि भूस्खलनाची भीतीही वाढली आहे.

चीनमधील परिस्थिती

या बावी चक्रीवादळाने चीनमध्येही प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे. याचा सर्वाधिक फटका चीनच्या झेजियांग प्रांताला बसला आहे. बावी चक्रीवादळाने शनिवारी (११ जुलै) रात्री झेजियांग प्रदेशात दोन वेळा जोरदार धडक दिली. यानंतर हे वादळ हळूहळू  पुढील भागांकडे सरकले असून याची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

चीनच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९४९ नंतर जुलै महिन्यात पहिल्यांदाच झेजियांगवर ही सर्वात शक्तिशाली नैसर्गिक आपत्ती आली. या वादळामुळे गेल्या २४ तासांता मध्य आणि दक्षिण भागात ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.

या चक्रीवादळामुळे चीनच्या समुद्रात लाटा उसळल्या असून किनारी भागांसह पूर, भूस्खलन आणि पाणी साचल्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन्ही देशांत युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. खराब हवामानामुळे यामध्ये अडथळा येत असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Bangkok Pub Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना! पबमध्ये लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Web Title: Typhoon bavi china philippines death toll 18 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • China
  • Cyclone
  • Philippines Earthquake
  • World news

संबंधित बातम्या

Egypt Tombs: सोन्याच्या जिभा, दुसऱ्या जगाचा दरवाजा, देवांशी संबंध; इजिप्तमध्ये सापडल्या 2000 वर्षे जुन्या प्राचीन रहस्यमयी 18 कबरी
1

Egypt Tombs: सोन्याच्या जिभा, दुसऱ्या जगाचा दरवाजा, देवांशी संबंध; इजिप्तमध्ये सापडल्या 2000 वर्षे जुन्या प्राचीन रहस्यमयी 18 कबरी

Nuclear Program : इराणच्या अणुकार्यक्रमावरून जागतिक राजकारणात भडका; फ्रान्सचा थेट इशारा, तर इराणची पण ‘अशी’ धमकी
2

Nuclear Program : इराणच्या अणुकार्यक्रमावरून जागतिक राजकारणात भडका; फ्रान्सचा थेट इशारा, तर इराणची पण ‘अशी’ धमकी

India China ISR Gap : LAC वर चीनचे 300 उपग्रहांचे जाळे, भारताकडे फक्त 15; कशी तोडली जाईल चिनी ‘किल चेन’?
3

India China ISR Gap : LAC वर चीनचे 300 उपग्रहांचे जाळे, भारताकडे फक्त 15; कशी तोडली जाईल चिनी ‘किल चेन’?

Russia Japan Espionage : जपान रशियाचा नवा गुप्तहेर तळ; युक्रेन युद्धासाठी पाश्चात्य निर्बंधांना ‘असा’ दिला जातोय चकवा
4

Russia Japan Espionage : जपान रशियाचा नवा गुप्तहेर तळ; युक्रेन युद्धासाठी पाश्चात्य निर्बंधांना ‘असा’ दिला जातोय चकवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.