Iran Drone Attack : 'हे खपून घेणार नाही' , UAE वरील हल्ल्यात भारतीय जखमी झाल्याने सरकार संतप्त, इराणला थेट सुनावलं (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यूएईमधील हल्ल्याचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र निषेध केला आहे. या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे की, निष्पाप नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे कोणत्याही परिस्थिती स्वीकारले जाणार नाही.
Our statement on the attack on Fujairah ⬇️ 🔗 https://t.co/01Nz7g06FR pic.twitter.com/KQAr8R9ciQ — Randhir Jaiswal (@MEAIndia) May 5, 2026
याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील यूएईवर इराणने केलेल्या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये इराणच्या कृत्याचा निषेध करत म्हटले की, आम्ही यूएईसोबत खंबीरपणे उभे आहोत. यामध्ये भारतीयांवर झालेला हल्ला दुर्दैवी आहे. पंतप्रधान मोदींनी हा हल्ला प्रादेशिक अस्थिरतेसाठी घातक असल्याचे म्हटले आहे.
Strongly condemn the attacks on the UAE that resulted in injuries to three Indian nationals. Targeting civilians and infrastructure is unacceptable. India stands in firm solidarity with the UAE and reiterates its support for the peaceful resolution of all issues through… — Narendra Modi (@narendramodi) May 5, 2026
याच वेळी भारताने होर्मुझवरही मोठे भाष्य केले आहे. भारताने स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Hormuz) च्या नाकेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर होणाऱ्या परिणांमाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जागतिक उर्जा सुरक्षा आणि समुद्री व्यापारासाठी होर्मुझ महत्त्वाचा असून हा मार्ग खुला करण्याची मागणी भारताने केली आहे.
तसेच भारताने संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि राजनैतिक प्रयत्नांचा सल्ला दिला आहे. पश्चिम आशियात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारत मध्यस्थी किंवा शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यास तयार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Ans: भारताने इराणच्या यूएईवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. नागरिक आणि पायाभूत सुविधांवरील हल्ले अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच तणाव कमी करण्याची मागणी केली आहे.
Ans: सोमवारी (०४ मे) इराणने संयुक्त अरब अमिराती(UAE) च्या फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत.






