लाल समुद्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्सीखेच; 'हुथींविरुद्ध' लढण्याच्या नावाखाली मोठे तेल क्षेत्र ताब्यात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
UAE Seizes Yemen Oil Fields : मध्य पूर्वेत (Middle East) शक्ती आणि वर्चस्वासाठी सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात शांतपणे चेकमेटचा खेळ (Game of Checkmate) सुरू आहे. एकेकाळी हुथी बंडखोरांविरुद्ध (Houthi Rebels) एकत्र लढणारे हे दोन्ही देश आता येमेनमध्ये एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. सौदी अरेबियाने सुदानमधील (Sudan) गृहयुद्धात अमेरिकेचा सहभाग वाढवून युएईवर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आता युएईने सौदी अरेबियाच्या शेजारी असलेल्या येमेनमध्ये तेलाच्या बाबतीत मोठी खेळी केली आहे.
बीबीसी अरेबिकच्या मते, युएईने सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (STP) या मिलिशियाच्या माध्यमातून येमेनमध्ये स्वतःहून पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीपीने प्रथम येमेनचा एक अब्ज बॅरलचा अंदाजित साठा असलेल्या हद्रामौत (Hadhramaut) या मोठ्या तेल क्षेत्रावर कब्जा केला आहे. यामुळे सौदी अरेबियातील तणाव वाढला असून, युएईच्या या युक्तीला सौदी अरेबियाने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हद्रामौत (ज्याला येमेनची तेल विहीर म्हणून ओळखले जाते) ताब्यात घेतल्यानंतर, युएई समर्थित एसटीपी लढाऊ (STP Fighters) आता राजधानी सानाकडे पुढे सरकत आहेत. साना सध्या हुथी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे.
येमेन मॉनिटरच्या मते, एसटीपी लढाऊ दोन मुख्य कारणांमुळे हुथींवर विजयाची आशा बाळगून आहेत:
UAE join the chat! As Gaza’s ceasefire holds and Saudi-Israel talks simmer, a new game-changer is unfolding in Yemen’s shadows. On December 3, UAE-backed Southern Transitional Council (STC) forces brilliantly swept into Seiyun, capturing the presidential palace, airport, and… pic.twitter.com/Tljndu1mT4 — Avi Avidan (@avavidan) December 5, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: जागतिक व्यापार युद्धाचे नवे पर्व! अमेरिकेनंतर आता ‘या’ देशानेही लावला भारतावर 50% Tariff; ‘हा’ नवा नियम लागू होणार
युएईची ही कृती सौदी अरेबियासाठी मोठा धक्का का आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Trump : Modi Putin यांच्या Car Photoने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले; अमेरिकन संसदेत त्यावरून वादावादी, ट्रम्प सापडले कचाट्यात
या दोन्ही देशांमधील शांतपणे सुरू असलेला हा संघर्ष मध्य पूर्वेतील भू-राजकीय समीकरणे बदलू शकतो.
Ans: सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (STP) द्वारे.
Ans: हद्रामौत (Hadhramaut).
Ans: लाल समुद्रावर (Red Sea).






