अमेरिकन संसदेत पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या गाडीचा फोटो दाखवण्यात आला; एका महिला खासदाराने केला हल्लाबोल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
डेमोक्रॅटिक सदस्य कमलागर-डोव्ह यांनी संसदेत मोदी आणि पुतिन यांच्या कारमधील फोटोचे पोस्टर सादर केले आणि म्हटले की, “भारत हा अमेरिकेचा एक मजबूत सहयोगी भागीदार (Strong Ally) आहे, परंतु ट्रम्पच्या सदोष टॅरिफ धोरणांमुळे भारत मॉस्कोच्या जवळ आला आहे.” पुतिन यांची अलीकडील भारत भेट याच धोरणांचे उत्तम उदाहरण आहे. डोव्ह यांच्या मते, या फोटोमुळे अमेरिकन सरकारला चिंता वाटली पाहिजे. त्यांनी हे पोस्टर ‘हजार शब्दांचे’ असल्याचे सांगत, ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणातील त्रुटी स्पष्ट केल्या. अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच पुतिन भारताला भेट देत आहेत आणि त्यांना तिथे मोठा पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: जागतिक व्यापार युद्धाचे नवे पर्व! अमेरिकेनंतर आता ‘या’ देशानेही लावला भारतावर 50% Tariff; ‘हा’ नवा नियम लागू होणार
During a US House Foreign Affairs hearing, Congresswoman Sydney Kamlager-Dove held up a poster of PM Modi & Russian President Putin’s car selfie, declaring it a symbol of “Trump’s failed foreign policy”. pic.twitter.com/yGBPpkc9o9 — Sidhant Sibal (@sidhant) December 11, 2025
credit : social media and Twitter
कमलागर-डोव्ह यांनी या वादग्रस्त फोटोचा वापर करून ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize) मोहिमेवरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “तुम्ही आपल्या मित्रांना आपल्या शत्रूंच्या हाती देऊन नोबेल शांतता पुरस्कार जिंकू शकत नाही.” डोव्ह यांनी ट्रम्प यांना त्यांचे परराष्ट्र धोरण त्वरित बदलण्याचे आवाहन केले. जर ट्रम्प यांनी त्यांची भूमिका बदलली नाही, तर त्यांना “भारत गमावणारे अमेरिकन अध्यक्ष” (American President who lost India) म्हणून लक्षात ठेवले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. डोव्ह व्यतिरिक्त, इतर अनेक सदस्यांनी ट्रम्प प्रशासनावर टीका केली. एका कायदेकर्त्याने म्हटले की, “ट्रम्प प्रशासनाने चीनपेक्षा भारतावर जास्त शुल्क (Tariff) लादले आहे. तुम्ही कुठे जात आहात हे मला समजत नाही.” ट्रम्प प्रशासनाचे चीनवरील धोरण भारताच्या तुलनेत नरम असल्याची टीका त्यांनी केली. या घटनेमुळे भारत-रशियाचे दृढ संबंध आणि अमेरिका-भारत यांच्यातील तणावपूर्ण व्यापारी धोरणे पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहेत.
Ans: डेमोक्रॅटिक सदस्य कमलागर-डोव्ह (Kamalagar-Dov).
Ans: टॅरिफ धोरणांमुळे भारत रशियाच्या जवळ गेल्यावर.
Ans: दिल्लीत (पालम विमानतळ ते पंतप्रधानांचे निवासस्थान).






