युक्रेनने ११०० किलो स्फोटके लावून क्रिमिया पूल उडवलं; रशियाला पुन्हा डिवचलं
युक्रेनच्या सैन्याने मंगळवारी क्रिमियन पुलावर तिसऱ्यांदा हल्ला केला. पुलाच्या पाण्याखालील स्फोटके लावून पूड उडवून देण्यात आला. यात पुलाचा बराचस भाग कोसळला आहे. पुलाखाली 1,100 किलो टीएनटी स्फोटके लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेनने दोनच दिवसांपूर्वी रशियाची ४० बॉम्बर विमाने उडवून दिली होती. त्यानंतर पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर क्रिमिया पुलावर स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:44 वाजता हा स्फोट घडवून आणला.
या ऑपरेशनमध्ये १,१०० किलो टीएनटी स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, युक्रेनच्या वेळेनुसार पहाटे ४:४४ वाजता हा स्फोट झाला. एसबीयूने म्हटले आहे की ही विशेष ऑपरेशन करण्यासाठी अनेक महिने कठोर परिश्रम करावे लागले. हा हल्ला क्रिमिया पुलाच्या बुडालेल्या खांबाला लक्ष्य करून पुलाचा तळ कमकुवत करण्याच्या रणनीतीचा एक भाग होता, असं सांगितलं जात आहे
क्रिमिया पूल, ज्याला केर्च ब्रिज असेही म्हटलं जातं. रशिया आणि क्रिमियाला जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आणि रेल्वे पूल आहे. २०१४ मध्ये क्रिमियाचं रशियात विलिन केल्यानंतर हा पूल उभारण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. हा पूल रशियासाठी अनेक प्रकारे महत्त्वाचा आहे, विशेषतः युद्धादरम्यान, कारण याच मार्गाने रशियाने युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि सैन्य पाठवलं आहे, परंतु युक्रेनचे नियोजन आता रशियासाठी एक मोठी समस्या बनली आहे.
हा हल्ला क्रिमियन पुलावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी, ८ ऑक्टोबर २०२२ रोजी, या पुलावर एका ट्रकचा स्फोट झाला, ज्यामुळे मोठी आग लागली. जुलै २०२३ मध्ये आणखी एक हल्ला झाला, ज्यामध्ये पुलाचे दोन भाग उद्ध्वस्त झाले. त्यावेळी एसबीयू प्रमुख वासिल मलिक यांनी पुष्टी केली की या ऑपरेशनमध्ये ‘सी बेबी’ या समुद्री ड्रोनचा वापर करण्यात आला होता.
युक्रेन जगाच्या नकाशावरुन नामशेष होणार? पुतिनची प्राणघातक हल्ला करण्याची नवी रणनीती आली समोर
युक्रेनचा एका आठवड्यात दुसरा मोठा हल्ला आहे. एसबीयूने त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर म्हटले आहे की, “युक्रेनच्या सुरक्षा सेवेने एक नवीन विशेष ऑपरेशन केले आणि क्रिमियन पुलाला लक्ष्य केले.” या हल्ल्यापूर्वी, रविवारी, एसबीयूने रशियाच्या अणु-सक्षम स्ट्रॅटेजिक बॉम्बर फ्लीटवर हवाई हल्ले देखील केले. मात्र आतापर्यंत या दाव्यावर रशियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. हल्ल्यानंतर लगेचच ब्रिज ऑपरेटरने टेलिग्रामद्वारे पुलावरील वाहतूक सेवा स्थगित केली असली तरी, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत झाली. नुकसानीचे नेमके प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही.