Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Peace Deal : शांतता करार की पोकळ दावा? अमेरिका-इराण करारावर ट्रम्प यांची घोषणा, इराण मात्र मौन

US-Iran Peace Deal : ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता कराराची घोषणा केली आहे. पाकिस्तानने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, इराणकडून किंवा देशाच्या कोणत्याही नेतृत्त्वाकडून याबाबत अधिकृत विधान न आल्याने कराराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 10:07 AM
US Iran Peace Deal

US Iran Peace Deal

Follow Us
Follow Us:
  • शांतता करार की पोकळ दावा?
  • अमेरिका-इराण करारवर ट्रम्प यांची घोषणा
  • इराण मात्र मौन
US-Iran Peace Deal News in Marathi : मध्यपूर्वेत गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका(America)-इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. अखेर हा संघर्ष संपवण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली. त्यांनी जगातील महत्त्वाचा व्यापारी वाहतूकीचा समुद्री मार्ग होर्मुझही कोणत्याही शुल्काशिवाय खुला केल्याचे म्हटले. आपल्या सैन्याला तातडीने नाकेबंदी हटवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा करार झाल्याचे सांगितले जात आहे. पण इराणने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे करार झाला का नाही याबाबत शंका कायम आहे.

Ebola Outbreak : आफ्रिकेत इबोला विषाणूचा झपाट्याने प्रसार; मृतांचा आकडा १०० पार, WHO कडून गंभीर इशारा

काय म्हणाले ट्रम्प ?

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर इराणसोबतच्या शांतता कराराची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत शांतता करार पूर्ण झाला आहे. सर्वांचे अभिनंदन. मी घोषणा करतो की होर्मुझची सामुद्रधुनी(Strait of Hormuz) सर्वांसाठी टोल फ्री सुरु होईल आणि अमेरिकन नौदलाल नाकेबंदी हटवण्याचे आदेश देत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन पुरवठा पूर्ण करण्यासाठी जगभरातील जहाजांनी आपली इंजिन सुरु करावीत.

पाकिस्तानची प्रतिक्रिया

या करारात पाकिस्तानने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) या नेतृत्त्वाच्या मध्यस्थीने अमेरिका-इराण शांतता करार झाला असल्याचे सांगितले जाते. याबाबत माहिती देताना पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी देखील वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये सर्व मुद्द्यांवर, लेबनॉनमधील लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष मिटवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य करणाऱ्या देशांचे आभारही पाकिस्तानने मानले.

Following intensive talks, we are pleased to announce that the Peace Deal between the United States of America and Islamic Republic of Iran has been REACHED. Both sides have declared the immediate and permanent termination of military operations on all fronts, including in… — Shehbaz Sharif (@CMShehbaz) June 14, 2026

इराणचे मौन कायम

अमेरिका आणि पाकिस्तानकडून अमेरिका-इराण (Iran) शांतता कराराची घोषणा करण्यात आली आहे. परंतु अद्याप इराणने याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही. शिवाय इराणने यापूर्वी पाकिस्तानच्या मध्यस्थीला नकार दिला होता. यामुळे हा शांतता करार किती मजबूत आहे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. इराणच्या कोणत्याही नेतृत्त्वाकडून याबाबत तपशील समोर आलेला नाही. तसेच दोन्ही देशांमध्ये नेमक्या कोणत्या अटींवर सहमती झाली हे देखील अधिकृतपणे स्पष्ट नाही. यामुळे कराराबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

US-Iran Peace Deal : जगासाठी मोठा दिलासा? अमेरिका-इराण शांतता करारानंतर होर्मुझ शुल्कमुक्त होणार?

Web Title: Us iran peace deal trump announcement iran silent hormuz deal questions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Pakistan News
  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
1

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

India At UN: भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला संयुक्त राष्ट्र जिनेव्हाची शान; 45 वर्षांनंतर पुन्हा भारताने दिले 5 ‘सुंदर मोर’
2

India At UN: भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला संयुक्त राष्ट्र जिनेव्हाची शान; 45 वर्षांनंतर पुन्हा भारताने दिले 5 ‘सुंदर मोर’

Typhoon Dolphin: डॉल्फिन चक्रीवादळाचा चीनला तडाखा! शांघायमध्ये 1300 उड्डाणे रद्द, 4 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर
3

Typhoon Dolphin: डॉल्फिन चक्रीवादळाचा चीनला तडाखा! शांघायमध्ये 1300 उड्डाणे रद्द, 4 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर

Badakhshan Gold Mines: अफगाणिस्तानचा ‘गोल्ड रश’! तालिबानचा ‘स्वप्नवत प्रकल्प’, शेतकऱ्यांसाठी बनला आहे एक दुःस्वप्न
4

Badakhshan Gold Mines: अफगाणिस्तानचा ‘गोल्ड रश’! तालिबानचा ‘स्वप्नवत प्रकल्प’, शेतकऱ्यांसाठी बनला आहे एक दुःस्वप्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.