Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : युद्ध चिघळले! अमेरिकेच्या नव्या कारवाईनंतर इराण आक्रमक; खाडी देशांमध्ये तणाव शिगेला

US Iran War Update : अमेरिका-इराण संघर्ष अधिकच चिघळत चालला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तरदाखल आखाती देशांमध्ये अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 10:39 AM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  •  इराणवर अमेरिकेचे नवीन हवाई हल्ले
  • अमेरिकन लष्करी तळांवर IRGC ची प्रत्युत्तरादाखल कारवाई
  • युद्ध अधिक चिघळण्याची शक्यता
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका-इराणमधील संघर्ष चिघळत चालला असून सलग चौथ्या दिवशीही  दोन्ही देशांत हवाई हल्ले सुरुच आहेत. अमेरिकेने इराणच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणन देखील आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. यामुळे मध्यपूर्वेतील वातावरण अस्थिर झाले आहे.

India UK FTA : भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार आजपासून लागू; व्हिस्कीपासून ते लक्झरी कारपर्यंत अनेक ब्रिटिश वस्तू होणार स्वस्त

हल्ले-प्रतिहल्ले सुरुच

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी जहाजांवरील हल्ले करण्याची इराणची क्षमता कमी करण्यासाठी आणि आखाती देशांतील सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने जॉर्डन, बहरीन, आणि कुवैतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक गडद झाला आहे.

इराणच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले

इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हेंगाम बेट, बंदर अब्बास, अहवाज आणि केशम बेटावर जोरदार स्फोट झाले आहेत. याशिवाय अमेरिकने काही दिवांसपूर्वी बुशेहर आणि चाबहारसह काही किनारी भागांमध्येही हवाई हल्ले केले होते. अमेरिकेने मध्यपूर्वेत २० हून अधिक युद्धनौका आणि शेकडो लढाऊ विमाने तैनात केली असून इराणला सतत लक्ष्य केले जात आहे.

अमेरिकन लष्करी तळांवरही हल्ले

दुसरीकडे इराणने देखील अमेरिकन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. IRGC ने बहरीनमधील शेख ईसा एअर बेस आणि जॉर्डनमधील अजराक एअरबेसवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागल्याचा दावा केला आहे.

कुवैतमधील अली अल सलेम एअर बेसला लक्ष्य करण्यात आले अशून अमेरिकेचे एमक्यू-९ ड्रोन लॉन्च पॅडही पाडले असल्याचे इराणने म्हटले. अमेरिकेचे हल्ले जोपर्यंत सुरु राहतील तोपर्यंत इराणही कारवाई सुरुच ठेवले असे IRGC ने म्हटले.

होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव कायम

याच वेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतही तणाव कायम आहे. आतापर्यंत तीनहून अधिक व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आले असून यातील एका जहाजावरील हल्ल्यात एक भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. यावर भारताने नाराजी व्यक्त केली असून तातडीने हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे.

तर इराणने होर्मुझमध्ये अमेरिकी लष्कराची उपस्थिती कायम राहिल्यास तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला आहे.

US Iran War : चीन-रशियाला मोठा धक्का? अमेरिकेने उडवला इराणमधील सर्वात महत्त्वाचा पूल

Web Title: Us iran war iran retaliates after us military strikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
1

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
2

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
3

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
4

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.