Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: इराणसमोर महासत्ता हतबल! जॉर्डनसह 5 देशांतील अमेरिकन एअरबेस उडवले; ‘पॅट्रियट’ सिस्टीम फेल, 13 सैनिक जखमी

US Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला. इराणने जॉर्डनसह अनेक देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे, तर अनेक अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 18, 2026 | 05:56 PM
us iran war jordan bases attacked patriot air defense failed american troops wounded 2026

us iran war jordan bases attacked patriot air defense failed american troops wounded 2026

Follow Us
Follow Us:
  • भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला
  • अमेरिकन हवाई सुरक्षा अपयशी
  • पेंटागॉनकडून जखमी सैनिकांना दुजोरा

पश्चिम आशिया म्हणजेच मध्यपूर्वेमध्ये (Middle East) सुरू असलेला अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष (US-Israel Iran War)आता अत्यंत भीषण आणि अनियंत्रित वळणावर पोहोचला आहे. सलग सातव्या रात्री दोन्ही देशांनी एकमेकांच्या सामरिक प्रतिष्ठानांना लक्ष्य करत प्रचंड बॉम्बवर्षाव केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणशी संबंधित लष्करी तळ, निगराणी केंद्रे आणि भूमिगत शस्त्रसाठ्यांवर हल्ले केल्याचा दावा केला असतानाच, इराणने त्याला अत्यंत विनाशकारी प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) जॉर्डन, सीरिया, कुवेत, ओमान आणि बहरीन या ५ ते ६ देशांमध्ये पसरलेल्या अमेरिकेच्या बलाढ्य लष्करी तळांवर एकाच वेळी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनद्वारे भीषण हल्ला चढवला आहे.

या हल्ल्यामुळे अमेरिकन लष्कराचे अपरिमित नुकसान झाले असून महासत्तेची अत्याधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणा इराणसमोर पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र आहे. या ऐतिहासिक लष्करी कारवाईमुळे जागतिक स्तरावर तिसऱ्या महायुद्धाची (World War 3) भीती वर्तवली जात आहे.

अमेरिकेची ‘पॅट्रियट’ संरक्षण प्रणाली फेल; १३ सैनिक जखमी!

या संपूर्ण संघर्षातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या अमेरिकन हवाई संरक्षण यंत्रणेवर (Air Defence System) जगाचा विश्वास होता, ती इराणच्या क्षेपणास्त्रांसमोर पत्त्यांसारखी कोलमडली. जॉर्डन आणि आखाती प्रदेशात तैनात असलेल्या अमेरिकेच्या अत्याधुनिक ‘पॅट्रियट’ (Patriot) बॅटऱ्या इराणच्या वेगवान बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेत रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या. इराणची क्षेपणास्त्रे ही सुरक्षा भेदून थेट अमेरिकन तळांवर आदळली.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (पेंटागॉन) अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार, या थेट क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये किमान १३ अमेरिकन लष्करी कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत, ज्यामध्ये १० लष्करी जवान आणि ३ नौसैनिकांचा (Sailors) समावेश आहे. जखमींची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात असून, अमेरिकन छावण्यांमध्ये सध्या प्रचंड घबराट पसरली आहे.

⚡️ A scene documenting the moment the Iranian Revolutionary Guard Corps bombed the American Muwaffaq Salti Air Base in Jordan last night. pic.twitter.com/vaxk0yfZOO — Middle East Observer (@ME_Observer_) July 18, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: अघटित घडणार! इस्रायलमध्ये अमेरिकेच्या 60 हून अधिक युद्धनौका, विमानांचा खडा पहारा; रडारवर 3 मोठी अणू ठिकाणे

‘मुवफ्फाक सॉल्ट’ हवाई तळावर क्षेपणास्त्रांचा थेट मारा

इराणच्या आयआरजीसीने (IRGC) जॉर्डनमधील अत्यंत संवेदनशील आणि अमेरिकेचा मुख्य कणा मानल्या जाणाऱ्या ‘मुवफ्फाक सॉल्ट हवाई तळाला’ (Muwaffaq Salti Air Base) मुख्य लक्ष केले होते. हा तळ मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लढाऊ विमाने, प्रगत ड्रोन आणि गुप्तचर मोहिमांचे प्रमुख केंद्र आहे. इराणच्या क्षेपणास्त्रांनी या तळावरील कमांड सेंटर्स, विमानांचे निवारे (Hangers), दारूगोळा डेपो आणि प्रगत ‘HIMARS’ रॉकेट लाँचर्सचा थरकाप उडवला.

स्फोटांचे आवाज इतके प्रचंड होते की, जॉर्डनच्या सीमेपलीकडे असलेल्या इस्रायलच्या ताब्यातील प्रदेशातही भूकंपासारखे धक्के जाणवले आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले. जॉर्डनच्या लष्कराने त्यांचे हवाई दल वापरून १० इराणी क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला असला, तरी इराणच्या मुख्य हल्ल्याची तीव्रता रोखणे कोणालाही शक्य झाले नाही. जॉर्डनमध्ये सध्या ३,००० ते ४,००० अमेरिकन सैनिक तैनात असून, ते सर्व आता इराणच्या रडारवर आले आहेत.

पाच देशांतील अमेरिकन तळांवर एकाच वेळी नरक कोसळला!

इराणची ही लष्करी मोहीम केवळ एका देशापुरती मर्यादित नव्हती. हा एक सुनियोजित बहुआयामी (Multi-Phase) हल्ला होता.

  • सीरिया: सीरियामधील ‘अल-तन्फ’ (Al-Tanf) भागात असलेल्या अमेरिकेच्या विशेष मोहीम कमांड सेंटरवर इराणने थेट मारा करून तिथली रडार यंत्रणा आणि हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त केले.
  • कुवेत अन् बहरीन: कुवेत आणि बहरीनमधील ‘अल-साखीर हवाई तळावर’ (Al-Sakhir Air Base) इराणच्या नौदलाने आणि ड्रोन पथकाने हल्ला करून अमेरिकेची पी-८ सागरी गस्ती विमाने (P-8 Maritime Aircraft) आणि इंधन साठे जळू दिले.
  • ओमान: ओमानच्या आखाताजवळ असलेल्या अमेरिकन सहाय्यक केंद्रांवरही क्षेपणास्त्रांचा मारा करून तिथली ट्रॅकिंग यंत्रणा निकामी करण्यात आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: इस्रायली भूदलाचे चक्रव्यूह, 1,000 मरीन कमांडो; अमेरिकन अजगर चारी बाजूंनी आता ‘असे’ गिळणार इराणला

अमेरिका आणि इराणच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत; जागतिक संकट गडद

या भीषण युद्धानंतर दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. इराणचा दावा आहे की, त्यांच्या अचूक हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून अनेक अमेरिकन कमांडर्स मारले गेले आहेत. तर दुसरीकडे, अमेरिका केवळ १३ सैनिक जखमी झाल्याचे सांगून हानीची तीव्रता लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यात सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, या संघर्षामुळे ‘हॉर्मुजची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पूर्णपणे ठप्प झाली असून जागतिक तेल पुरवठा आणि व्यापारी जहाजांची वाहतूक गोठली आहे. जर हा तणाव असाच राहिला, तर जगात इंधनाचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण होऊन जागतिक अर्थव्यवस्था कोलमडू शकते, ज्यामुळे भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

Web Title: Us iran war jordan bases attacked patriot air defense failed american troops wounded 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
1

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
2

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
3

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO
4

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.