US Iran War : अमेरिका-इराण युद्ध थांबणार? पाकिस्तानची मध्यस्थी अन् 'तो' १० कलमी प्रस्ताव जगाला वाचवणार? (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इराणचे राजदूत रझा अमिरी मोगद्दम यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनीपाकिस्तानचे शांतता प्रयत्न आता एका निर्णयाक वळणावर येऊन पोहचले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, पाकिस्तान(Pakistan) ने मध्यस्थीचे घेतलेले प्रयत्न आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील वळणावर येऊन पोहोचले आहे. अधिक तपशीलांसाठी संपर्कात रहा असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. परंतु नेमकं काय घडतं आहे, याची अतिरिक्त माहिती दिलेली नाही. परंतु युद्ध टाळण्यासाठीचे पाकिस्तानचे प्रयत्न यशस्वी होत असल्याच यातून स्पष्ट होत आहे.
ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. इराणने होर्मुझ मार्ग खुला करावा आणि अमेरिकेशी शांतता करार करावा असे ट्रम्प यांनी म्हटले होते. अन्यथा इराणच्या रेल्वे, पूल, वीज प्रल्पांवर हल्ल्याची धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली होती. अगदी आक्रमकपणे रागात येऊन शिवागाळ करतही ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती. शिवाय ट्रम्प यांनी इराणला एकाच रात्रीत उद्ध्वस्त करु असेही त्यांनी म्हटले होते.
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणने आक्रमकपणे आखाती देशांमध्ये हल्ले सुरु केले होते. तसेच इस्रायलवरही क्षेपणास्त्रे डागली. परंतु याच वेळी इराणी राजदूताच्या या दाव्याने शांततेची आशा निर्माण झाली आहे. इराणने केवळ तात्पुरती शस्त्रसंधीसाठीच नाही, तर कायमस्वरुपी शांततेसाठी प्रस्ताव मांडला आहे.






