US Iran War : फक्त ४८ तास...! ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; जगाची धाकधूक वाढली, आता युद्ध अटळ?
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, इराणला अमेरिकेशी वाटाघाटी करुन करार करावा किंवा धोरणात्मकदृष्टीने महत्त्वाचा व्यापारी मार्ग होर्मुझ सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय वाहतूकीसाठी खुली करावी असे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी यासाठी इराण(Iran) ला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. यानंतर इराणवर नरक कोसळले अशा शब्दात ट्रम्प यांनी हल्ल्याची धमकी दिली आहे. यापूर्वी त्यांनी १० दिवसांची मुदत दिली होती, जी आता संपली आहे. यामुळे सध्या संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे.
सध्या ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणवरील कारवाई आता अटळ असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. परंतु खरेच अमेरिकेकडे हल्ला करण्याची ताकद आहे का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण युद्धभूमीवरची परिस्थिती विपरीत आहे. एकीकडे ट्रम्प इराणची लष्करी शक्ती संपल्याचा दावा करत आहेत. मात्र दुसरीकडे इराणने इराणने अमेरिकेचे एक अत्याधुनिक F-15E लढाऊ विमान पाडले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याच वेळी ट्रम्प यांचा हा इशारा मूर्खपणाचा असल्याचे सांगत इराणने फेटाळून लावला आहे. तसेच कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचा पवित्रा स्पष्ट केला आहे. सध्या येते ४८ तास संपूर्ण जगासाठी निर्णयाक ठरणार आहेत. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधन आणि उर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Remember when I gave Iran ten days to MAKE A DEAL or OPEN UP THE HORMUZ STRAIT. Time is running out – 48 hours before all Hell will reign down on them. Glory be to GOD!: US President Donald Trump pic.twitter.com/ILIqCesQTI — IANS (@ians_india) April 4, 2026
Trump Oil Strategy : व्हेनेझुएला तेलामुळे अमेरिका तर सेफ; भारताला मोठा फायदा होणार?
Ans: ट्रम्प यांनी इराणला एक अंतिम इशारा देत म्हटले आहे की, त्यांच्याकडे केवळ आता वाटाघाटी करण्यासाठी किंवा होर्मुझ मार्ग खुला करण्यासाठी ४८ तास आहेत. यानंतर इराणवर भीषण लष्करी कारवाई केली जाईल असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.
Ans: इराणने ट्रम्प यांच्या धमकीला मूर्खपणाचा इशारा म्हटले आहे. तसेच कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही हेही स्पष्ट सांगितले आहे.






