विमान अपघातांचे सत्र सुरुच; अमेरिकेतील सिएटलमध्ये दोन विमानांची जोरदार टक्कर, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये आणखी एक विमान अपघाताची घटना घडली आहे. वॉशिंग्टनमधील सर्वात मोठे शहर सिएटल-टाकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी( 5 फेब्रुवारी) जपान एअरलाइन्सचे विमान आणि डेल्टा एअरलाइन्सच्या विमानांची टक्कर झाली. जपान एअरलाइन्सच्या विमानाने डेल्टाच्या 1921 च्या मागील बाजूस दोरदार धडक दिली. या घटनेच्या वेळी जपानच्या विमानात 185 प्रवासी तर डेल्टात 142 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
ही टक्कर अशा वेळी घडली. जेव्हा टोकियोच्या नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सिएटलला जपान एअरलाइन्स्चे बोईंग विमान 787 येत होते. जपान एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा उजव्या बाजूच्या पंखाच्या पाती डेल्टा विमानाच्या मागील बाजूस जोरात आदळल्याने हा अपघात झाला. यावेळी जपानचे बोईंग 737 देखील विमानतळावर होते. या घटनेशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायर होत आहेत आहेत.
EXCLUSIVE: A passenger on the Japan Airlines flight which hit a Delta plane at SeaTac Airport shared footage of the moment of impact.
He says he started recording because he could tell the Japan Airlines plane wouldn’t clear the Delta plane and would hit it.
Wild.
Why do these… pic.twitter.com/uer5Wzcwa3
— Libs of TikTok (@libsoftiktok) February 5, 2025
कोणतीही जीवितहानी नाही
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांना त्वरित सुरक्षितपणे विमानतून बाहेर काढण्यात आले आहे. विमानतळ कर्मचारी आणि क्रू मेंबर्स घाबरलेल्या स्थितीत होते, परंतु कोणतेही गंभीर हानी झाली नसल्याची माहिती विमातळावरील अधिकाऱ्यांनी दिली. डेल्टा विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, टक्कर झाल्यानंतर विमान मागे-पुढे हलले परंतु आम्ही सर्व शांत राहिलो आणि सुरक्षितपणे उतरवून आम्हाला टर्मिनलवर आणण्यात आले.
FAA चौकशी करणार
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने या घटनेचा तापास सुरु केला आहे. या धडकीचा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामाकाजावर कोणताही गंभीर परिणाम झाला नसल्याचे FAA ने म्हटले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित अपघातग्रस्त विमान टॅक्सीवेववरुन हटवले आहे.
डेल्टा एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात, धडक झालेले विमान मेक्सिकोतील प्वेर्टो व्हॅलार्टा येथे उड्डाण करणार होते. मात्र, धडक झाल्याने फ्लाइट उड्डाण करणार नाही. तसेच 142 प्रवाशांना नवीन विमानात सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. ही घटना विमानतळाच्या डांबरी कामांमधील आव्हाने अधोरेखित करते आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत.
यापूर्वीही झाला होता अपघात
अमेरिकेत यापूर्वीही दोन भयानक अपघाताच्या घटना घडल्या होत्या. यामुळे विमानतळांर आणि प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. एक आठवड्यापूर्वी, वॉशिंग्टन डीसीच्या रेगन राष्ट्रीय विमानतळावर विमान उतरत असताना एक अपघात घडला होता, ज्यामध्ये 67 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर फिलाडेल्फियामधे देखील एक विमान रस्त्यावर कोसळले आणि त्याचा स्फोट झाला होता. यामधील सर्व प्रवाशी आणि कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.