Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Strike Oman : ओमानच्या आखातात अमेरिकेची मोठी कारवाई; इराणच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावर हल्ला

US Strike Oman : ओमानच्या आखातात अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी नाकेबंदी तोडल्याचा आरोपावरुन एका व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आले. जहाजाला वारंवार इशारा देऊनही दिशा आणि वेग बदलण्यात आला नाही. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 09:28 AM
US Strike Oman

US Strike Oman

Follow Us
Follow Us:
  • ओमानच्या आखातात अमेरिकेचा व्यापारी जहाजावर हल्ला
  • सागरी नाकेबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप
  • जाणून घ्या नेमकं काय घडलं?
US Strike Oman: वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील तणावच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या आखातात एका व्यापारी जहाजावर अमेरिकेने हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गँबियाचा झेंडा असलेले जहाज इराणच्या दिशेने जात होते आणि वांरवार इशारे देऊनही थांबले नाही. यामुळे अमेरिकेने ही कारवाई केली असल्याचे म्हटले.

SU-57 Deal : आता पाकिस्तानची खैर नाही! भारताला रशियाची ‘सुपरपॉवर’ ऑफर; चीनचीही उडाली झोप

काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, गँबियाचा झेंडा असलेले जहाज इराणच्या दिशेने वेगाने सरकत होते. आंतरराष्ट्रीय नाकेबंदीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच जहाजाला २० वेळा थांबण्याचा इशारा दिला. परंतु जहाज न थांबता तसेच वेगाने पुढे सरकत होते. यामुळे अमेरिकने M/V Liam Star या जहाजावर कठोर कारवाई केली.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, जहाज आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात रडारवर आढळले होते. जहाजाला रेडिओ संदेश पाठवून वारंवार थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, जहाजाने दिशा आणि वेग बदलला नाही. यामुळे अमेरिकेने तातडीने पावले उचलत कारवाई केली.

जहाजाचे इंजिन रुम उद्ध्वस्त

माहितीनुसार, अमेरिकन सैनिकांनी जहाजाच्या इंजिन रुमला लक्ष्य करत हेलफाय मिसाईल डागले. या हल्ल्यामुळे जहाजाचे इंजिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. जहाज समुद्राच्या मध्यभागीच अडकले आहे.

अमेरिकेचा कडक इशारा

दरम्यान अमेरिका इराणमध्ये युद्धबंदी लागू असली तर होर्मुझ आणि आसपासच्या सागरी क्षेत्रातील नाकेबंदी कायम असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय असलेल्या जहाजांवर बारकाईने लक्ष्य ठेवले जात आहे. अमेरिकन सैन्याने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे.

आतापर्यंत अमेरिकन लष्कराने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ व्यापारी जहाजांना निकामी केले आहे. नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल ११६ जहाजांना रोखून धरले आहे. व्यापारी जहाजांच्या आडून इराणला गुप्तपणे मदत पोहचवली जात असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

अमेरिका इराण तणाव

२८ फेब्रुवारी पासून सुरु झालेला अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) काही थांबण्याचे नाव घेईना. या संघर्षामुळे पुन्हा जागतिक बाजारपेठेत इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.

🇺🇸 US forces fired a missile at a ship in the Gulf of Oman after it allegedly ignored warnings and attempted to bypass the US naval blockade. pic.twitter.com/SNz1mZ4zfA — Ebrahim Zolfaghari (@Irantimes01) May 31, 2026


UN Blacklist : दहशतवादी संघटनांच्या यादीत रशिया-इस्रायल? UN च्या ‘या’ निर्णयाने जग हादरलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने ओमानच्या आखातात हल्ला का केला?

    Ans: अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सागरी नाकेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जहाजावर ओमानच्या आखातात हल्ला केला.

  • Que: अमेरिकने किती जहाजांवर कारवाई केली आहे?

    Ans: अमेरिकन लष्कराने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ व्यापारी जहाजांना निकामी केले आहे. नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल ११६ जहाजांना रोखून धरले आहे.

Web Title: Us strike oman iran bound ship in gulf of oman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • America
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
1

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
2

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
3

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

US Financial Crisis : अमेरिकेतील धक्कादायक वास्तव समोर! मोठं आर्थिक संकट, 53% नागरिकांकडे Emergency Fund च नाही
4

US Financial Crisis : अमेरिकेतील धक्कादायक वास्तव समोर! मोठं आर्थिक संकट, 53% नागरिकांकडे Emergency Fund च नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.