(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तैवान-व्यापार-युद्ध… तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प-जिनपिंग यांची चर्चा; लवकरच येणार आमने-सामने
अमेरिकेच्या व्हाइट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी एका कायदेशीर कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी देखील केली आहे. हे अमेरिकेच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासित पाऊल मानले जात आहे. याची तुलना अपोलो स्पेस मिशन आणि मॅनहॅटन प्रोजेक्टसारख्या मोठ्या सरकारी योजनांशी देखील केली जात आहे.
व्हाइट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, या मिशनअंतर्गत अमेरिकेच्या सरकारी संशोधन संस्थांमधील डेटा, सुपरकॉम्प्युटर्स, राष्ट्राप्रयोगशाळा आणि खासगी कंपन्या संयुक्त केल्या जाणार आहेत. यामुळे वैज्ञानिकांना त्यांच्या संशोधनासाठी लागणारी माहित सहज उपलब्ध होईल. यामुळे संशोधनाला गती मिळेल. तसेच सर्व प्रयोग काही महिन्यात आठवड्यात पूर्ण करता येतील. या मिशन अंतर्गत आरोग्य, ऊर्जा, औद्योगिक उत्पादन, बायोटेक्नॉलॉजी. अंतराळ संशोधन, क्वांटम प्रोजेक्ट आणि मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्ष्य केंद्रित करता येईल. कारण या क्षेत्रातील संशोधनांसाठी वेळ आणि पैसा अधिक लागतो. पण एआयच्या मदतीने सर्व काम सोपे होईल.
या मिशनचे नेतृत्व हे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाकडे (DOE) असणार आहे. यासाठी एक विशेश अमेरिकन सायन्स अँड सिक्योरिटी प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. यामध्ये हाय क्वालिटीचे सुपरकॉम्प्युटर्स, तसेच डेटासेट्स, ऑटोमेटेड संशोधन प्रक्रिया आणि एआय एजंट्सचा समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ६० दिवसांमध्ये ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० सर्वोत्कृष्ट वैज्ञानिकांची यादी तयार केली आहे. यानंतर राष्ट्रीय प्रयोगशांळांची तपासणी केली जाणार आहे. तसेच एका वैज्ञाविक समस्येवर प्रत्यक्ष कार्य सुरु केले जाणार आहे.या मिशनमुळे अमेरिकेच्या वैज्ञानिक क्षेत्राला नवी गती मिळणार आहे.
सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण
Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Genesis Mission एआय तंत्रज्ञानावर आधारित योजना सुरु केली आहे. याच्या मदीतने वैज्ञानिक संशोधनाला गती मिळावी आणि त्याचा चांगल्या पद्धतीने वापर व्हावा असा याचा उद्देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Ans: Genesis Mission चे नेतृत्व हे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाकडे (DOE) असणार आहे.






